Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

पृथ्वी दिवस मराठी माहिती | वसुंधरा दिन 2021 मराठी माहिती|Pruthvi Divas 2021 marathi mahiti nibandh

पृथ्वी दिवस मराठी माहिती | वसुंधरा दिन 2021 मराठी माहिती|Pruthvi Divas 2021 marathi mahiti nibandh 


22 एप्रिल वसुंधर दिन त्यालाच पृथ्वी दिवस म्हणतात.पृथ्वीची आज स्थिती खरोखरच दयनीय झाली आहे. सर्व बाजूंनी सुरू असलेल्या निसर्गाचा ह्यास, प्रचंड प्रमाणात वाढवणारी लोकसंख्या वाढत्या औद्योगिकीकरणाचा परिणाम यामुळे पर्यावरणाची घडीच विस्कटून गेली आहे.

पृथ्वी दिवस वसुंधरा दिन मराठी माहिती.webp


पृथ्वीचे एक नाव आहे क्षमा आहे आणि तिच्या क्षमाशील वृत्तीचा विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मानवाने फार मोठा गैरफायदा घेतला आहे. 21 व्या शतकात वाटचाल करणाऱ्या आणि राहणीमानात स्वतःला प्रगत म्हणवणाऱ्या मानवाने सृष्टीचे स्वरूपच बदलून टाकले आहे. आज हवा, पाणी, ध्वनी, जमिनीच्या प्रदूषणामुळे सजीवांचा जीवच धोक्यात आला आहे. आज मनुष्य तऱ्हे तऱ्हेने निसर्गाचे शोषण करत आहे

वनस्पती, प्राणी, नैसर्गिक साधन संपत्ती आणि जैविक विविधता यांनाच आज मानवाने आपले लक्ष केले आहे. अणुबॉम्बच्या चाचण्या, शेतीवरील कीटकनाशकांची फवारणी, अनु स्पोट, फ्रीज मधून बाहेर पडणारा वायु आणि त्यामुळे पृथ्वीच्या बाहेरील कवचातील होणारे जल, वायूप्रदूषण, जमिनीची होणारी धूप यामुळे पृथ्वीमाता जर्जर झाली आहे.


🆕  अहिल्याबाई होळकर जयंती मराठी भाषण


🔘 बौद्ध पौर्णिमा मराठी माहिती व व्हाट्सएप शुभेच्छा !


औद्योगिक करणामुळे आम्ल पावसाचा धोका वाढतो आहे. प्रदूषणाचा फास गळ्याभोवती अवळायला लागल्याने लोकांचा जीव घुसमटायला लागला आहे. पृथ्वी भोवती असणाऱ्या ओझोनच्या थराला भगदाड पडत आहेत. त्यामुळे पृथ्वीवरील तापमानात सातत्याने वाढ होत आहे.

प्रदूषणाच्या विलख्यामुळे निसर्ग आपले काम चोख बजावेल अशा काही खुणा दृष्टीपथात येऊ लागल्या आहेत. पृथ्वीचे वाढते तापमान, त्यातून बर्फ वितळवून जलप्रलय होण्याचा धोका, ओझोन वायूचा विरळ होत जाणारा थर, भूकंप, ऍसिड रेन, ही संकटे मानवाच्या डोक्यावर लटकत्या तलवारीप्रमाणे घोंगावत आहेत.

या सर्व प्रश्नांवर विचार करण्यासाठी जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र संघ युनो च्या वतीने ब्राझीलमध्ये पृथ्वी परिषद भरविण्यात आली. सर्व राष्ट्रांचे लक्ष या वसुंधरेच्या ह्यासाकडे वेधण्यात आले. ह्या परिषदेत महत्त्वाचा प्रश्न असा होता की स्वतःच्या राष्ट्राचा विकासाबरोबर पर्यावरणाचा नाश होणार नाही याची प्रत्येक राष्ट्राने खबरदारी घ्यावी.  

आज विकासाच्या नावाने जेवढा विनाश व उधळपट्टी होत आहे. त्याला प्रतिबंध घातला नाही, थांबवले नाही तर सर्व सजीवांच्या दुःख दैना अधिकच वाढतील. सर्वात मोठी चिंतेची बाब म्हणजे शहरीकरण, औद्योगिक करण व शेतीचे रासायनिक करण, वाढती लोकसंख्या यामुळे हवा, पाणी व अन्न साखळी कमालीची प्रदूषित झाली आहे. त्यासाठी पर्यावरण नियोजनाची आज गरज भासू लागली आहे.

वृक्षलागवड वृक्षारोपण पर्यावरणातील उष्णतेचा उंच उच्चंक कमी करतो. अनु चाचण्या कमी करणे, खजिन साठा, जलसंपत्तीचा काटकसरीने वापर करणे, लोकसंख्या कमी करण्याचे उपायांचा वापर करणे गरजेचे झाले आहे.

अक्षरशा आपण बॉम गोळ्यांवर बसलेलो आहोत या वास्तवाचा प्राधान्यक्रमाने व गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच वसुंधरा दिनी पर्यावरणाचे संतुलन राखण्याची प्रतिज्ञा करूया.

पृथ्वी दिवस मराठी माहिती | वसुंधरा दिन 2021 मराठी माहिती|Pruthvi Divas 2021 marathi mahiti nibandh 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !