Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

11वी CET फॉर्म दुरुस्ती कशी करावी | How to Edit correction in 11th CET registration form

11वी CET फॉर्म दुरुस्ती कशी करावी | How to Edit correction in 11th CET registration form 2021 how to edit 11th cet application admission form 2021


 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण 11वी CET रजिस्ट्रेशन फॉर्म मध्ये दुरुस्ती कशी करावी या बद्दल माहिती बघणार आहोत . जर मोबाईल नंबर चुकला असेल तर , माध्यम चुकीचे निवडले असेल तर , परीक्षेचा पत्ता जर चुकीचा टाकला असेल तर किंवा प्रवर्ग SEBC निवडला असेल तर त्या मध्ये दुरुस्ती कशी करावी ते बघूया .

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत शासन निर्णय दिनांक २८ मे, २०२१ दिनांक २४ जून २०२१ नुसार इ. ११ वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचे (CET) आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार दिनांक २० व २१ जुलै रोजी तसेच दिनांक २४/७/२०२४ पासून आवेदनपत्र स्विकारण्याची कार्यवाही सुरु आहे. सदर आवेदनपत्रामध्ये माहिती भरताना विध्यार्थ्यांकडून काही चुका झाल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मागणी होत आहे. 

सदर परीक्षेची आवेदनपत्र सादर करताना संगणक प्रणालीमध्ये भरलेल्या माहितीमध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा (Edit Option) दिनांक ३१/७/२०२१ (सायंकाळी ५.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर सुविधा दिनांक ०२/८/२०२१ (रात्री ११.५९ पर्यंत) उपलब्ध असेल. यानुसार विद्याथ्र्यांना आवेदनपत्रात भरलेल्या माहितीत पुढीलप्रमाणे दुरुस्ती करता येईल.

अ) राज्य मंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ मध्ये उत्तीर्ण/प्रविष्ट शालेल्या विद्यार्थ्यांना आवश्यकता असल्यास संगणक प्रणालीतील खालील माहितीमध्ये बदल किया दुती करता येईल,

11वी CET अर्ज रजिस्ट्रेशन दुरुस्ती कशी करावी ? 

विद्याथ्र्यांना उपरोक्तप्रमाणे संगणक प्रणालीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांनी आपला आवेदनपत्र क्रमांक (Application No.) व संगणक प्रणालीमध्ये नोंदविलेला मोबाईक क्रमांक वापरून लॉग ईन (Log in) करावे व Edit Option क्लीक करून भरलेल्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात व दुस्तीफॉर्म कराव्या.ही सुविधा (Edit Option) दिनांक ३१/७/२०२१ (सायंकाळी ५.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर सुविधा दिनांक ०२/८/२०२१ (रात्री ११.५९ पर्यंत) उपलब्ध असेल. 

  1.  ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक
  2. परीक्षेचे माध्यम सेमी इंग्रजीचा विकल्प, सामाजिक शास्त्रे या विषयाच्या प्रश्नांचे माध्यम
  3. विद्यार्थ्याचा तात्पुरत्या / कायमच्या निवासस्थानाचा पत्ता व त्यानुसार परीक्षा केंद्रासाठी निवडलेला जिल्हा तालुका / शहराचा विभाग (WARD)
  4. इ.१० चे आदनपत्र भरताना SEBC प्रवर्गाची नोंद केलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत शासनाच्या सुधारित तरतुदीनुसार निश्चित केलेला प्रवर्ग (खुला अथवा EWS प्रवर्ग)
वरील माहिती च फक्त दुरुस्ती करता येणार आहे याची नोंद घ्यावी.



11वी CET अर्ज दुरुस्ती करण्याच्या पायऱ्या
11वी ऑफिशियल वेबसाईट वर जावे cet.11thadmission.org.in
मिळालेल्या ID आणि पासवर्ड ने लॉगीन करावे
क्लिक Edit फॉर्म 
आपल्याला करावयाचे दुरुस्ती करून submit वर क्लिक करा

 या माहिती व्यतिरिक्त इतर माहिती ही विद्यार्थ्याने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३.१० वी) परीक्षा सन २०२१ साठी शाळेमार्फत भरलेल्या आवेदनपत्रावरून घेण्यात आलेली आहे. त्यामुळे सदर माहीतीमध्ये बदल असल्यास विद्यार्थ्याने संबंधित शाळेशी स्वरित संपर्क साधावा. याबाबत शाळांना स्वतंत्रपणे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

ब) राज्यमंडळाची माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ पूर्वी उत्तीर्ण/ प्रविष्ठ झालेले विद्यार्थी आणि सीबीएसई, आयसीएसई व अन्य मंडळांचे विद्यार्थी यांनी संगणक प्रणालीमध्ये आवेदनपत्र सादर करताना भरलेल्या कोणत्याही माहितीमध्ये आवश्यकता असल्यास बदल किंवा दुरुस्ती करता येईल.

विद्याथ्र्यांना उपरोक्तप्रमाणे संगणक प्रणालीमध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास त्यांनी आपला आवेदनपत्र क्रमांक (Application No.) व संगणक प्रणालीमध्ये नोंदविलेला मोबाईक क्रमांक वापरून लॉग ईन (Log in) करावे व Edit Option क्लीक करून भरलेल्या माहितीमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात व दुस्तीफॉर्म कराव्या.

11 वी CET चे एका पेक्षा जास्त फॉर्म भरले असेल तर ?

काही विद्यार्थ्यांनी एका पेक्षा अधिक आवेदनपत्रे संगणक प्रणालीमध्ये भरल्याची बाबही निदर्शनास आली आहे. अशा विद्याथ्र्यांनी योग्य ते एकच आवेदनपत्र ठेवून जादाची आवेदनपत्रे Delete करण्याची सुविधा दिनांक ०९.०८.२०२९ (सकाळी ११.००) पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा विद्याथ्र्यांना अनावश्यक जादा भरलेले आवेदनपत्र Delete पर्यायाचा विकल्प वापरून रदद करता येतील. मात्र अशा विद्यार्थ्यांनी किमान एक योग्य आवेदनपत्र संगणक प्रणालीमध्ये असल्याची खातरजमा करावी. सदर सुविधादेखील दिनांक ०२.०८.२०२१ (रात्री ११.०१ पर्यंत) उपलब्ध असेल.

सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात विद्यार्थी, पालक व अन्य संबंधीत घटकांच्या यासंदर्भातील व अन्य शंकांचे निरसन करण्यासाठी मंडळामार्फत यापूर्वी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचा तपशिल मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच आवेदनपत्र भरण्याच्या संकेत स्थळावर तांत्रिक बार्बीसाठी उपलब्ध असलेल्या हेल्पलाईन तपशील उपलब्ध करून दिलेला आहे. तरी याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घेवून आवश्यक कार्यवाही करावी.

🔰 हे पण वाचा

🔴 Live बघा 11वी CET रजिस्ट्रेशन कसे करावे मोबाईल वरून फक्त 2 मिनिटांत !

🆕 11वी रजिस्ट्रेशन कसे करावे नवीन वेबसाईटवर !

🆕  शिष्यवृत्ती ३०० सराव प्रश्नपत्रिका संच pdf

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया अभ्यासक्रम (pdf)

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया सर्व माहिती एकाच ठिकाणी

🆕 11 वी प्रवेश प्रक्रिया रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप करा!

🆕  इ 11वी सामायिक परीक्षा CET टाईमटेबल आला ? 

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !