Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ 11वी प्रवेश सामायिक परीक्षा CET टाईमटेबल आला ?असा असेल परीक्षेचे स्वरूप | 11th Admission procedure Schedule 2021-22 | Fyjc admission process 2021

इ 11वी सामायिक परीक्षा CET टाईमटेबल आला ? 11th Admission procedure Schedule 2021-22 | Fyjc admission process 2021 11th admission 2021 maharashtra Mumbai Pune Aurangabad | 11th CET Timetable Exam Pattern

11th admission 2021 maharashtra

11th admission.org.in pune mumbai Aurangabad Amravati Nagpur Nashik 2021

 इ. १० वीची परीक्षा रद केल्यामुळे सन २०२१-२२ या वर्षासाठी इ. ११ वी प्रवेशासाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये कार्यपध्दती विहीत करण्यात आली आहे. त्यानुसार ११ वी प्रवेशासाठी संपूर्ण राज्यामध्ये एक सामाईक प्रवेश परीक्षा (CET) घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. सदर सामाईक प्रवेश परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यास्तव अधिक खुलासा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याअनुषंगाने इ. ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेबाबत (CET) खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे:

🆕 1 जुलै चा पगार वाढ किती झाला चेक करा 5 सेकंदात11 वी प्रवेशप्रक्रिया बद्दल चा अधिकृत शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

11 वी प्रवेश शासननिर्णय (download)
अशी असेल 11 वी प्रवेशप्रक्रिया 2021 | 11th Admission mumbai pune procedure Schedule 2021-22

 1. सामाईक प्रवेश परीक्षा (CET) आयोजित करण्यासाठी, आयुक्त शिक्षण) यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात येत आहे.
 2. इ. ११ वी प्रवेशासाठी घेण्यात येणारी सामाईक प्रवेश परीक्षा (CET) ही महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या राज्य मंडळ, C.B.S.E.. (CI.S.CE..] सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येईल.


11th CET Timetable Exam Pattern 2021

 1. इ. ११ वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असेल. 
 2. सामाईक प्रवेश परीक्षा राज्य मंडळाच्या इ. १० वीच्या अभ्यासक्रमावर आधारीत असेल.. 
 3.  सदर परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेमध्ये इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी १२५ गुणांचे प्रश्न असतील, परीक्षा ऑफलाईन घेण्यात येईल. प्रश्न पत्रिकेचे स्वरूप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाचे (Multiple Choice Objective Type Questions) असेल. परीक्षा O.M.R. आधारीत असेल.
 4.  सदर सामाईक प्रवेश परीक्षेसाठी १०० गुणांची एकच प्रश्नपत्रिका/ पेपर असेल व परीक्षेचा कालावधी दोन तासांचा असेल.. 
 5. सामाईक प्रवेश परीक्षा आयुक्त शिक्षण यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ/ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ करण्यात येईल. 
 6. 11वी प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऐच्छिक असल्याने; इयत्ता १० वीचा निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ/ परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यासाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय (option) उपलब्ध करुन देण्यात येईल.
 7.  सन २०२० २१ या शैक्षणिक वर्षासाठी इ. १० वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांनी इ. १० परीक्षेसाठी परीक्षा शुल्क अदा केलेले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही. तथापि, C.B.S.E.. CI.S.C.E.. सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे, इत्यादी अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाकडून परीक्षा परिषदेकडून विहित करण्यात येणारे शुल्क अदा करावे लागेल.
 8. इयत्ता १० वीचा निकाल साधारणत: १५ जुलै दरम्यान घोषीत होण्याची अपेक्षा आहे. सामाईक प्रवेश परीक्षा इयत्ता १० वीच्या निकालानंतर २ आठवड्यांमध्ये सुमारे जुलै महिनाअखेर अथवा ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा आयोजित करण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षेसाठी प्रविष्ठ होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी सुरु करावी.
 9. इ. ११ वीची प्रवेश प्रक्रीया राबविताना सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्याथ्र्यांना सामाईक प्रवेश परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्राधान्य देण्यात येईल. म्हणजेच इ. ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या टप्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्याथ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्याने प्रवेश देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये रिक्त राहीलेल्या उर्वरित जागा ज्या विद्यार्थ्यांनी सामाईक प्रवेश परीक्षा दिलेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील व त्या जागांवर सामाईक प्रवेश परीक्षा न दिलेल्या विद्याथ्र्यांना इयत्ता १० वीच्या मुल्यमापन पध्दतीनुसार मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !