Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

एकदम सोप्पी गौरी ची आरती मराठी lyrics [pdf] | Gauri ganpati chi aarti marathi lyrics

 गौरी ची आरती मराठी lyrics [pdf] | गौरी गणपतीची आरती मराठी lyrics [pdf]  महालक्ष्मीची आरती मराठी lyrics [pdf]


नमस्कार आज आपण जैष्ठा गौरी पूजन 2021 करण्यासाठी लागणारी गौरीची आरती मराठी, त्यालाच आपण महालक्ष्मीची आरती किंवा गौरी गणपतीची आरती मराठी असेही म्हणतो . सहज सोपी बोलता येईल ही आरती आज आपण बघणार आहोत.


गौरी आवाहन पूजन मुहूर्त कधी आहे 2021 ?

या वर्षी गौरी आवाहन / पूजनाचा मुहूर्त सकाळी 9.49 नंतर कधीही मांडू शकतो.

गौरी विसर्जन मुहूर्त 2021

या वर्षी गौरी विसर्जन मुहूर्त सकाळी 7.04 नंतर कधीही विसर्जन करू शकतो.


Gauri ganpati aarti marathi lyrics जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी ची आरती मराठी lyrics [pdf]

|| महालक्ष्मी ची आरती ||

जयदेवी जयदेवी जय महालक्ष्मी

वससी व्यापकरुपे तू स्थुलसुक्ष्मी ॥धृ॥


करविरपुरवासिनी सुरवरमुनिमाता

पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता

कमलाकरे‍ जठरी जन्मविला धाता

सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥१॥


मातुलिंग गदा खेटक रविकिरणीं

झळके हाटकवाटी पीयुषरसपाणी

माणिकरसना सुरंगवसना मृगनयनी

शशिकरवदना राजस मदनाची जननी ॥२॥


Gauri chi aarti marathi lyrics


तारा शक्ति अगम्या शिवभजकां गौरी

सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी

गायत्री निजबीजा निगमागम सारी

प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥३॥


अमृत भरिते सरिते अघदुरितें वारीं

मारी दुर्घट असुरां भव दुस्तर तारीं

वारी मायापटल प्रणमत परिवारी

हे रुप चिद्रुप तद्रुप दावी निर्धारी ॥४॥


चतुरानने कुत्सित कर्माच्या ओळी

लिहिल्या असतील माते माझे निजभाळी

पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी

मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥५॥

|| समाप्त ||


एकदम सोप्पी गौरीची किंवा गौरी गणपतीची आरती मराठी मध्ये वाचली आहे, माहिती कशी वाटली नक्की शेअर करा .

🆕 हे पण वाचा टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !