Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन rajarshi shahu maharaj punyatithi vinamra abhivadan

राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन  rajarshi shahu maharaj punyatithi vinamra abhivadan


नमस्कार मित्रांनो आज छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी निमित्त आज आपण शाहू महाराजां विषयी काही त्यांचे प्रेरणादायी विचार मेसेज व्हाट्सअप स्टेटस फोटो hd इंस्टाग्राम फेसबुक यावर तुम्ही नक्कीच शेअर करू शकता.

shahu maharaj punyatithi quotes massage in marathi

शाहू महाराजांचा जन्म २६ जून इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे जयसिंगराव (आप्पासाहेब), आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते,  शाहू महाराजांना 'राजर्षी ही उपाधी कानपूरच्या कुम क्षत्रिय समाजाने दिली.

६ मे १९२२ - छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे निधन. शाहू महाराजांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजी राजांच्या अकाली मृत्यूनंतर १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. शाहू महाराजांनी १९१७ साली आपल्या संस्थानात सक्तीचा मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि अंमलात आणला. तसेच शाहू महाराजांनी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व इंग्लंडमधील उच्च शिक्षणासाठी त्यांना अर्थसहाय्य केले. मुंबई येथे वयाच्या ४८व्या वर्षी शाहू महाराजांचे हृदयविकाराने झाले.


छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी 2022 quotes
छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी 2022 quotes


शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूती स्थान, श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांना, त्रिवार मानाचा मुजरा. छत्रपती शाह महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन..!

shahu maharaj punyatithi quotes in marathi

ओम बोलल्याने मनाला शक्ती मिळते, साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते, राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते, जय शाहू जी बोलल्याने आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते.शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!



🎯 shahu maharaj punyatithi massage in marathi

राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सर्वोत्तम उदाहरण घालून देनारे आदर्श शासनकर्ते आणि बहुजनांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करणारे द्रष्टे समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!

शाहू महाराज पुण्यतिथी स्टेटस मराठी

माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही! पण माणसाला माणुसकीपासून वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे.शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!

शाहू महाराज पुण्यतिथी मॅसेज मराठी

माझा खजिना रिता झाला तरी मला त्याची पर्वा नाही! पण माणसाला माणुसकीपासून वंचित करणारी रुढी मला मोडायची आहे.शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!



🎯 shahu maharaj jayanti / punyatithi massage in marathi

आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रु. दंड ठोकणारा राजा, कला, संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन सन्मान कारणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा.... शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!

shahu maharaj punyatithi massage in marathi

बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवं जीवन देणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!

shahu maharaj jayanti / punyatithi photo

संपूर्ण महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत, दीन-शोषितांचे तारणहार, थोर समाजसुधारक , राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांना मानाचा मुजरा !शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!




🎯शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!

"शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती नाही, असे इतिहास सांगतो. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मत्सुद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची भारताला अत्यंत गरज आहे."- राजर्षी शाहू महाराज


जातीभेद निर्मुलन, अस्पृश्यता निवारण, स्त्रियांचा उद्धार, बहुजनांचा शैक्षणिक विकास, औद्योगिक प्रगती, शेतीचा विकास इत्यादी क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली. आपली राजसत्ता खन्या अर्थाने अपेक्षित, • वंचित समाजासाठी वापरणारे आरक्षणाचे प्रणेते...शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!


अंधाराला कराया नष्ट, जया सूर्य होतो प्रविष्ठ, तसे मानवास करण्यास पुष्ठ, शाहूरायांनी वेचले कष्ट राजर्षी छत्रपती शाहू महाराज विनम्र अभिवादन




🎯 राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!

माणसांच्या ओळखीचा, माणसांचा राजा ! माणसात माणुसकी, मानणारा राजा !! राजा म्हणावं की तुला, माय बाप म्हणू! माया दिली पोटातल्या, पोरावानी जणू !! एकदाच देवदूत, धाडला देवानी ! पुन्हा नाही राजा असा, पाहिलाच कुणी !!शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!


📮 मदर डे च्या हार्दिक शुभेच्छा संदेश व इतिहास


वसा घेतला समाजसुधारणेचा ठाव घेतला बहुजनांच्या मनाचा प्रतिकार केला दुष्ट जातीभेदाचा अभिमान वाटतो महान आमच्या राजाचा , शिक्षणाचे महत्त्व जाणूनी त्यांनी बहुजनांना शिक्षित केले अज्ञानाच्या काळ्या छायेतूनी ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेले ,शेतीला दिले सर्वोच्च प्राधान्य दीनदुबळ्यांची दूर केली लाचारी रयतेचे शोभतात राजे खरे बहुजनांचे खरे कैवारी...!!!शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!


तळागाळातील लोकांसाठी लढणाऱ्या, बहुजनांना ज्ञानाचा अधिकार मिळवून देणाऱ्या, अंधश्रद्धा आणि जातीभेदावर कडाडून प्रहार करणाऱ्या, शेतीला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी विविध उपाययोजना राबवणाऱ्या अशा या रयतेच्या महान राजाला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!!!


राजर्षी शाहू छत्रपती ही एक अष्टपैलू महान व्यक्ती होती विविध कला आणि खेळ यांचा ते मोठा आधारस्तंभ होते. स्वतःच्या जीवास आणि राज्यास धोका पत्करून क्रांतीकारक सामाजिक सुधारणा घडवल्या. त्यांनी अजस्त्र धरणे तसेच कालव बांधले आणि सहकारी संस्था काढून ते भारतातील हरितक्रांतीचे अग्रदूत ठरले. समाजातील उच्च-नीचभेदभाव नष्ट केला. त्यांनी केलेल्या विशेष सामाजिक क्रांतीमुळे शाहूमहाराजांना 'महाराजांचे महाराज' ही बिरुदावली प्राप्त झाली होती.शाहू महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!!


📮 या पोस्ट पण वाचा ⤵️

🎯 छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !