Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

छत्रपती संभाजी महाराज जयंती / पुण्यतिथी मराठी माहिती भाषण निबंध 2023 | Sambhaji Maharaj jayanti Punyatithi information in Marathi easy speech in marathi

छत्रपती संभाजी महाराज जयंती / पुण्यतिथी मराठी माहिती भाषण निबंध | Sambhaji Maharaj jayanti Punyatithi information in Marathi easy speech in marathi 2023


आजच्या या लेख मध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज जयंती पुण्यतिथी विषयी मराठी माहिती - Sambhaji Maharaj Punyatithi information in Marathi" 2023 या विषया वर चर्चा करणार आहोत. तर वेळेचा अपव्यय नाही करता आपण आजच्या आपल्या मुख्य विषया कडे वळू या - 


छत्रपती संभाजी महाराज माहिती (toc)


छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी मराठी माहिती इतिहास | Sambhaji Maharaj jayanti Punyatithi 2023 in Marathi


 छत्रपती संभाजी महाराज यांची 1 एप्रिल ला पुण्यतिथी आहे. तिथी अनुसार छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी हा दिवस "बलिदान दिवस" म्हणून महाराष्ट्रभर पाळला जातो. छ. संभाजी महाराज हे मराठा साम्राज्या (Maratha Empire) चे दुसरे छत्रपती होते. छत्रपती संभाजी महाराज यांची अनेक पराक्रमे इतिहास मध्ये नोंदनीत आहे. 

छ. संभाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 15 वर्षी एकूण 13 भारतीय आणि विदेशी भाषांचे ज्ञान घेतले होते. त्यात मराठी, संस्कृत, इंगजी, हिंदी आणि पोर्तुगिज या सारख्या भाषांचा समावेश आहे. छ. संभाजी महाराजांच्या स्मृती दिना निमित्त आपण आज त्यांच्या विषयी रंजक माहिती जाणून घेणार आहोत.

छ. शिवाजी महाराज यांचे मोठे सुपुत्र संभाजी राजे भोसले (Sambhaji Raje Bhosle) महाराज यांचा 1 एप्रिल ला  स्मृतिदिन आहे. धर्मवीर, शेर शिवा का छावा, अनेक भाषा वर आपले प्रभुत्व मिळवणारे, धर्म अभिमानी, संस्कृत पंडित, पराक्रमी, व्यासंगी, शूरवीर अशी अनेक विशेषज्ञ देऊन ही ज्यांची कीर्तीच वर्णन करताना शब्द अपुरे पडतात, असे छत्रपती संभाजीराजे भोसले.

लहान पणा पासूनच मोहिमा आणि राजकारणांच्या डाव-पेचांचे बाळ कडू मिळालेल्या छ. संभाजी महाराजांनी शिवाजी महाराज यांच्या नंतर स्वराज्याचे समर्थ आणि खंबीर पणे संरक्षण केले. आणि स्वराज्याचा विस्तारही केला. रणांगणा मध्ये शत्रूला अक्षरष झुंजवले. छ. संभाजी महाराजांनी अगदी गोव्यातील पोर्तुगीज यांनालाही वठणी वर आणून ठेवले होते. 

एखाद्या वादळा प्रमाणेच शत्रूवर चाल करण्याची संभाजी महाराज यांची पद्धत एकमेव अद्वितीय होती. राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि धर्मकारण अशा अनेक क्षेत्रात त्यांनी आपले नि:र्विवाद वर्चस्व गाजवणारे छ. संभाजी महाराज स्व:कीयांच्या फितुरी मुळे गनिमाच्या तावडी मध्ये सापडले. फाल्गुन अमावास्यला छ. संभाजी महाराजांची प्राणज्योत मावळली. छ. संभाजी महाराजांच्या कार्याचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा.


​संभाजी महाराजांचे लहानपण आणि आग्रा भेट - Sambhaji Maharaj's childhood and visit to Agra in Marathi

छ संभाजी राजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ले येथे झाला होता. छ. शिवाजी महाराजां सारख्या युग पुरुषाचे मोठे सुपुत्र असल्याने रणांगणा वरील मोहिमा आणि राजकारणा मधील डावपेच यांचे बाळ कडू त्यांना लहान पणा पासूनच शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ माता यांच्या कडून मिळाले होते. 

छ. संभाजी राजे अगदी लहान असतानाच त्यांची आई सईबाई (Saibai) यांचे निधन झाले. पुण्या जवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची महिला हि संभाजी महाराज यांची आई बनली. राजमाता जिजाऊ यांनी संभाजी महाराज यांचा सांभाळ केला. सुरुवातीच्या काळात त्यांची सावत्र आई सोयराबाई (Soyarabai) यांनी ही त्यांच्या वर खूप माया केली. 

अनेक ऐतिहासिक नोंदी प्रमाणे संभाजी राजे हे अत्यंत देखणे, पराक्रमी, चाणक्य आणि शूर होते. राजकारणा मधील बारकावे त्यांनी लवरच आत्मसात केले. छ. शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटी वेळी सोबत नेले. त्या वेळी संभाजीराजे हे अवघ्या ९ वर्षांचे होते. 

छ. शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदे मधून निसटल्या नंतर स्वराज्या पर्यंतची धावपळ हि संभाजी राजे यांना सोसली नसती आणि त्या मुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे असल्याने छ. शिवाजी महाराजांनी त्यांना मोरो पंत पेशवे यांचे मेहुणे यांच्या घरी मथुरेला ठेवले होते. मुघल सैन्याचा तपास थांबवण्याच्या उद्देशाने छ. शिवाजी महाराजांनी संभाजी राजेंचे निधनाची खोटी अफवा पसरवून दिली. आणि काही काळाने छ. संभाजीराजे सुखरूप पणे स्वराज्या मध्ये येऊन पोहोचले.


🎯 संभाजी महाराज जयंती शुभेच्छा व भाषण

🎯 छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेकेच्या शुभेच्छा


​संभाजी महाराज राजकारण्यांशी मतभेद - Sambhaji Maharaj disagreed with politicians in Marathi

छ. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होई पर्यंत छ. संभाजी राजे राजकारणा मधील बारकावे आणि रणांगणा मधील डाव-पेचां मध्ये कुशल आणि तरबेज झाले होते. संभाजी महाराज यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडा वर आलेल्या प्रतिनिधींना त्यांनी जिंकून घेतले. 

राजमाता जिजाबाई यांचे निधन झाल्या नंतर छ. संभाजी राजा कडे स्व;मायेने लक्ष देणारे कोणी हि राहिले नाही. छ. शिवाजी महाराज स्व: राज्याच्या राजकारणात व रणांगणा मध्ये गुंतले होते. सळ-सळत्या रक्ताच्या तरुण छ. संभाजी राजांचे छ. शिवाजी महाराजांच्या दरबारा मधील अनुभवी मानकर्‍यांशी अनेकदा मत-भेद होऊ लागले. 

छत्रपती संभाजी राजांचा अण्णाजी दत्तो यांच्या भ्रष्ट कारभाराला विरोध होता. छ. शिवाजी महाराजांनी अनेकदा मंत्री अण्णाजी दत्तो हे अनुभवी प्रशासक असल्यामुळे त्यांच्या भ्रष्ट कारभाराला अनेकदा दुर्लक्ष केले. पण छत्रपती संभाजी राजांना ते मान्य करणे कठीण होते. सोयराबाई व दरबारा मधील काही मानकरी छत्रपती संभाजी राजांना अपमानास्पद वागणूक देऊ लागल्या मुळे शिवाजी महाराजा बरोबर दक्षिणच्या मोहिमे वर त्यांना जाता आले नाही. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत छ. संभाजी राजांचे हुकूम पाळण्यास अष्टप्रधान मंडळाने नकार दिला. त्या मुळे शिवाजी महाराजांना कोकणा मधील शृंगारपूरचे सुभेदार म्हणून छत्रपती संभाजी राजेंना पाठवावे लागले. सोयराबाई व दरबारा मधील काही तथाकथित मानकर्‍यांनी संभाजी राजे हे बेजबाबदार प्रशासक आहेत व राज्याचे वारस म्हणून योग्य नाही, असा प्रचार केला. सोयराबाईंची अपेक्षा होती की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यांचे वारस म्हणून राजाराम राजे यांचे नाव जाहीर करावे.


छत्रपती संभाजीराजांचा राज्याभिषेक - The coronation of Sambhaji Raja in Marathi


१६ जानेवारी १६८१ मध्ये छत्रपती संभाजी राजेंचा राज्याभिषेक झाला. त्यांनी उदार अंतकरणाने अण्णाजी दत्तो व मोरोपंत पेशव्यांना माफ करुनी त्यांना अष्टप्रधान मंडळा मध्ये पुन्हा स्थान दिले. मात्र, काही काळा नंतर अण्णाजी दत्तो व सोयराबाईंनी पुन्हा संभाजीराजां विरुद्ध कट केले आणि त्यांना कैद करून राजाराम राजेंचा राज्याभिषेक करायचा घाट घातला. 

तेव्हा मात्र छत्रपती संभाजी राजांनी अण्णाजी दत्तो व त्यांच्या सहकार्‍यांना हत्तीच्या पायी मृत्य दंड दिले. नंतर औरंगजेबाने १६८२ मध्ये स्वराज्या वर हल्ला चढवला. औरंगजेबाचे सामर्थ्य सर्वच बाबतीत छत्रपती संभाजीराजा पेक्षा अधिक होते. तरीही छत्रपती संभाजी राजांच्या नेतृत्त्वा खाली मराठ्यांनी औरंगजेबाला हिमतीने लढा दिला. मराठ्यांच्या प्रबळ इच्छाशक्ती व झुंझार पणाचे ठळक उदाहरण म्हणजे नाशिक जवळील रामशेज किल्ल्याचा लढा. 

छत्रपती संभाजी राजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी व म्हैसूरचा चिक्कदेव राय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की, त्यांची छत्रपती संभाजी राजे विरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. 



संभाजी महाराज इतिहास मृत्यु - Betrayal and death to Sambhaji Maharaj in Marathi


१६८९ च्या सुरवातीला छत्रपती संभाजी राजांनी आपल्या महत्त्वाच्या सरदारांना घेउनी बैठकीसाठी कोकणा मधील  संगमेश्वर येथे बोलावले. हि बैठक संपवून छत्रपती संभाजी राजे रायगडा कडे रवाना होत असतानाच त्यांचा मेहुणा गणोजी शिर्के (Ganoji Shirke) आणि औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान (Mukarrab khan) यांनी संगमेश्वर वर हल्ला केला. या कारवाईसाठी शिर्के यांनी कमालीची गुप्तता बाळगली आणि सर्व कारवाईची आखणी खूपच काळजी पूर्वक केली. मावळ्यां मध्ये व शत्रूचे सैन्यात चकमकया सुरुवात झाली. मराठ्यांचे संख्या बळ कमी होते. प्रयत्‍नांची पराकाष्टा करून ही मराठे शत्रूनि केलेला हल्ला परतवून लावू शकले नाहीत. 

परिणामी शत्रूने छत्रपती संभाजी राजांना जिवंत पकडले. छत्रपती संभाजी राजे आणि त्यांचे राजकीय सल्लागार कवी कलश (Kavi Kalash) यांना बहादुरगड येथे औरंगजेबा पुढे आणण्यात आले. औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून धर्मांतर केल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला स्पष्ट नकार दिला. 

औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजे आणि कवी कलश यांच्या वर अनन्वित अत्याचार केले. तरीही संभाजी राजांनी शरणागती पत्करली नाही. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूर पणे अत्यंत हाल-हाल करून ठार मारायचा आदेश दिला. सुमारे ४० दिवसा पर्यंत असह्य यातना सहन करून ही छत्रपती संभाजी राजांनी स्वराज्य निष्ठा व धर्म निष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारत वर्षाने "धर्मवीर (Dharmaveer)" हि पदवी बहाल केली. 

औरंगजेबाने क्रूर अत्याचाराची परिसीमा गाठली, तरी छत्रपती संभाजी महाराजांच्या मुखातून आक्रोशाची लकेरही उमटली नाही. धर्म अभिमानी, शेर का छावा, लढवय्या आणि असामान्य शौर्य गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांची ११ मार्च १६८९ रोजी फाल्गुन अमावास्यला प्राणज्योत मावळली.


chhatrapati sambhaji maharaj punyatithi quotes in marathi

डोळे काढले... पण झुकले नाहीत, जीभ छाटली गेली. पण दयेची भीक मागीतली नाही, हात तुटले... पण मुजऱ्यासाठी झुकले नाही, पायही तुटले...पण गुडघे टेकले नाही, मान देऊन राखलं, मातीला गगनाला नेऊन टेकवलं, मनातल्या अंधाराला चेतवलं...धर्मवीर सभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन.


chhatrapati sambhaji maharaj jaynti quotes in marathi

जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता पण कुटुंबाला विसरून जनतेच्या पाठीवर मायेने हात फिरवणारा तो आपला शंभूराजा होता! छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त मानाचा मुजरा!


☸️ हे पण वाचा - 

🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध

🆕 छत्रपती शिवाजी महाराज जयंती भाषण मराठी


FAQ -

१. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला?

उत्तर -१४ मे १६५७

२.छत्रपती संभाज महाराजांचा जन्म कोठे झाला?

उत्तर - पुरंदरचा किल्ला

३. छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते?

उत्तर - येसूबाई


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !