Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

ऑगस्ट क्रांती दिन मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन फलक लेखन | 9 august kranti din marathi bhashan nibandh information in marathi 2022

९ ऑगस्ट क्रांती दिन मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन फलक लेखन |ऑगस्ट क्रांती दिन मराठी माहिती | 9 august kranti din marathi bhashan nibandh information in marathi 2022 PDF


भारताच्या इतिहासात ९ ऑगस्ट हा दिवस ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून ओळखला जातो.  भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक लहान-मोठ्या चळवळी झाल्या.  ब्रिटीशांना भारतातून हाकलून देण्यासाठी महात्मा गांधींनी आपले शेवटचे स्वातंत्र्य युद्ध भारत छोडो चले जावं  आंदोलनाच्या रूपात लढण्याची घोषणा केली होती.  जी आज ऑगस्ट क्रांती म्हणून ओळखली जाते.याच ऑगस्ट क्रांती दिनाची मराठी माहिती आपण आज बघणार आहोत त्याचा फायदा आपल्याला ९ ऑगस्ट क्रांती दिन मराठी भाषण सूत्रसंचालन देण्यासाठी तसेच ९ ऑगस्ट क्रांती दिन मराठी निबंध छोट्या मुलांसाठी तसेच शिक्षकांसाठी लिहिण्यासाठी नक्कीच फायदा होईल .चला तर ऑगस्ट क्रांती दिन भाषण सूत्रसंचालन निबंधाची सुरवात करूया !


ऑगस्ट क्रांती दिन मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन फलक लेखन |ऑगस्ट क्रांती दिन मराठी माहिती | 9 august kranti din marathi bhashan nibandh information in marathi 2022

9 ऑगस्ट क्रांती दिन निबंध भाषण सूत्रसंचालन

🎯 9 ऑगस्ट क्रांती दिनाचे सूत्रसंचालन डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

Download pdf💠 ऑगस्ट क्रांती दिन मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन फलक लेखन |ऑगस्ट क्रांती दिन मराठी माहिती | 9 august kranti din marathi bhashan nibandh | august kranti din marathi mahiti


 "आज सलाम आहे त्या वीरांना, 

ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला 

ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी 

जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला.'

क्रांतीची ज्वलंत धगधगती मशाल हातात घेऊन ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. ७ ऑगस्ट १९४२ रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर (क्रांती मैदान) राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ८ ऑगस्ट रोजी पंडित नेहरूंनी मांडलेला 'छोडो भारत' ठराव प्रचंड बहुमताने मंजूर झाला. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. महात्मा गांधीजींनी जनतेला 'करेंगे या मरेंगे' या भावनेने बलिदानास सिद्ध होण्याचे स्फूर्तिदायक आवाहन केले.

'चले जाव' चळवळीला सर्व थरातून पाठिंबा मिळाला. ज्यावेळी 'चले जाव' चळवळीचा जोर कमी होत आहे असे ब्रिटिश सरकारला वाटू लागले होते त्याचवेळी भूमिगत चळवळ आकारास येऊ लागली होती. बॉम्ब बनविणे, शस्त्रास्त्रे चालविण्याचे शिक्षण घेणे, गुप्त रेडिओ केंद्रे चालविणे इत्यादी कामे भूमिगत चळवळीतील नेत्यांनी केली. या चळवळीतील प्रमुख भूमिगत नेते म्हणून जयप्रकाश नारायण, डॉ. राममनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफअली, युसूफ मेहेरअली, सुचेता कृपलानी, एस.एम.जोशी, उषा मेहता इत्यादी नेत्यांचा उल्लेख करता येईल. सरकारी यंत्रणेला नुकसान पोहचविणे हे या चळवळीचे मुख्य सूत्र होते.

देशाच्या काही भागांत ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी करून तेथे लोकाभिमुख सरकारे स्थापन झाली. यालाच प्रतिसरकार असे म्हणतात. बंगालमधील मिदनापूर, उत्तर प्रदेशातील बालिया व आझमगड, बिहारमधील भागलपूर व पूर्णिया या जिल्ह्यांत प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रतिसरकार विशेष गाजले. कारण दीर्घकाळ अस्तित्वात राहिलेले आणि इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न दिलेले असे हे एकमेव प्रतिसरकार होते. ब्रिटिशांचे नीतीधैर्य खच्ची करण्यात प्रतिसरकारने महत्त्वाचा वाटा उचलला होता.

चले जाव' चळवळीने आंदोलनाचे स्वरूप धारण केले. स्वातंत्र्यप्राप्तीचे उ‌द्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लक्षावधी भारतीयांनी असीम त्याग केला. अनेकांनी आत्मबलिदान केले. आंदोलकांची संख्याच इतकी प्रचंड होती की, त्यांना डांबून ठेवायला देशातील तुरुंगही अपुरे पडले. साने गुरुजी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज इत्यादींच्या राष्ट्रभक्तीपर गीतांनी आंदोलकांचा उत्साह वाढवला. या राष्ट्रव्यापी आंदोलनाला 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हटले जाते.

'चले जाव' चळवळ म्हणजे परकीयांचे झू-जुगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळविण्याच्या रोखाने उचललेले एक भरभक्कम पाऊल होते. देशासाठी स्वप्राणाची 'चले जाव' चळवळ म्हणजे परकीयांचे झू-जुगारून टाकण्यासाठी भारतीयांनी स्वातंत्र्य मिळविण्याच्या रोखाने उचललेले एक भरभक्कम पाऊल होते. देशासाठी स्वप्राणाची बाजी लावण्याची लोकांच्या मनाची तयारी झाली होती.

भारतीय जनता आपल्या विरोधात गेली आपण भारत देशावर फार काळ राज्य करू शकणार नाही याची जाणीव ब्रिटिशांना झाली.  आपल्या भारत देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या सर्व अमर हुतात्म्यांना माझे कोटी-कोटी प्रणाम ! जय हिंद !


FAQ -

Q.क्रांती दिवस कधी असतो ?

ANS - 9 ऑगस्ट ला दर वर्षी आपण क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो !

Q. क्रांती दिवस का साजरा केला जातो ?

Ans - ब्रिटिश सत्तेच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली, अशा अमर हुतात्म्यांची आठवण तसेच नव्या पिढीला हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव रहावी यासाठी दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा केला जातो. 

Q. 'छोडो भारत' व 'करेंगे या मरेंगे' चा नारा कोणी दिला होता ?

Ans - आजच्या दिवशी 1942 साली महात्मा गांधीजींनी 'छोडो भारत' व 'करेंगे या मरेंगे' चा नारा दिला होता.


🇮🇳 हे पण वाचा - 

🆕  15 ऑगस्ट भाषण मराठी pdf 

🎯 माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण

🆕 हरतालिका व्रत मराठी माहिती

🆕  श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🆕 जागतिक आदिवासी दिन भाषण

🆕 पहिल्या श्रावण सोमवार ची पूजा कशी करावी 2022

🆕 15 ऑगस्ट मराठी अप्रतिम भाष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !