Type Here to Get Search Results !

महिला दिन भाषण २०२३ | जागतिक महिला दिन भाषण मराठी | निबंध कविता चारोळ्या | Jagtik mahila din bhashan marathi pdf | women's day speech in marathi 2023

महिला दिन भाषण २०२३ | जागतिक महिला दिन भाषण मराठी | महिला दिन निबंध|महिला दिन कविता चारोळ्या | Jagtik mahila din bhashan marathi pdf | women's day speech in marathi 2023


8 मार्च दोन हजार बावीस आंतरराष्ट्रीय महिला दिवस त्यालाच जागतिक महिला दिन 2023 असेही म्हटले जाते आजच्या या महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही जागतिक महिला दिन का साजरा केला जातो तसेच आपणासाठी काही "महिला दिन भाषण" pdf मराठी मध्ये ( women's day speech in marathi )  मुलांसाठी छोटी भाषण ( mahila diwas speech marathi ) मराठीमध्ये घेऊन आलो आहोत याचा फायदा विद्यार्थी शिक्षक घेऊ शकतात तसेच महिला दिवसाच्या कार्यक्रमासाठी कविता सूत्रसंचालन चारोळ्या फलक लेखन  यासाठीही सदरील वाचनाचा उपयोग होऊ शकतो तुम्हा सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा चला तर महिला दिनाचे भाषण मराठीमध्ये ( mahila din bhashan) थोडक्यात बघूया

महिला दिन 2023(toc)


✡️ जागतिक महिला दिन भाषण मराठी ( mahila din bhashan marathi pdf )

महिला दिन भाषण प्रस्तावित - 


"ज्याला स्त्री 'आई' म्हणून कळली, 

तो जिजाऊचा शिवबा झाला, 

ज्याला स्त्री 'बहिण म्हणून कळली 

तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला, 

ज्याला स्त्री 'मैत्रीण' म्हणून कळली, 

तो राधेचा श्याम झाला, आणि 

ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली, 

तो सीतेचा राम झाला !'


प्रत्येक महान व्यक्तींच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्रीशक्तीला प्रथम माझा मानाचा मुजरा !

आज च्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्र मैत्रिणींनो !

शिवरायांच्या हिंदवी स्वराज्य स्थापन करण्या मागील प्रेरणा असणाऱ्या माता जिजाऊ, स्वातंत्र्याची चेतना देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई आणि स्त्री शिक्षणा साठी झटणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रियांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुखात करतो. 

महिला दिन चारोळ्या कविता ( jagtik mahila din kavita charolya )

स्त्री म्हणजे वात्सल्य,

स्त्री म्हणजे मांगल्या

स्त्री म्हणजे मातृत्व,

स्त्री म्हणजे कर्तृत्व

8 मार्च रोजी सर्वत्र जगभरात महिला दिन साजरा होत आहे. आजचा दिवस प्रत्येक महिलेसाठी सन्मानाचा, अभिमानाचा अन् आनंदाचा दिवस आहे. आणि तो असणारच.... कारण आज अनेक ठिकाणी कर्तृत्ववान महिलांचे सत्कार होतात, पुरस्कार दिले जातात, महिलांच्या कार्याची दखल घेत सन्मान केला जातो, असा हा महिला दिन दरवर्षी आनंदात, उत्साहात साजरा केला जातो.

इतिहासाची पाने चाळली तर... मार्च १९०८ रोजी न्युयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रूटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता या मागण्या केल्या.१९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी किलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ (मार्च हा 'जागतिक महिला दिन' म्हणून स्विकाराव असा ठराव क्लारा झेटकिन यांनी मांडला, तो पास झाला आणि तेव्हापासून (मार्च यादिवशी जागतिक महिला दिन साजरा करण्यात येऊ लागला.जागतिक महिला दिन 2023 ची थीम मराठी 

 या वर्षासाठीच्या 'आंतरराष्ट्रीय महिला ( जागतिक महिला) दिन 2023 ची थीम मराठी मध्ये ही आहे, "“Innovation and technology for gender equality” म्हणजेच " लैंगिक समानतेसाठी नावीन्य आणि तंत्रज्ञान""

COVID- 19 साथीच्या काळात आरोग्यसेवा कामगार, इनोव्हेटर इत्यादी म्हणून जगभरातील मुली आणि स्त्रियांचे योगदान अधोरेखित करते.महिलांनी COLLCD-19च्या या संकटातसुद्धा किलेले कार्य नक्कीच गौरवास्पद आहे,  म्हणूनच म्हणावेसे वाटते, 

'तुझ्या उत्तुंग भरारी पुढे,

गंगनही ठेंगणे असावे.

तुझ्या विशाल पंखाखाली,

विश्व ते सारे विसावे!"

आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे सर्वात मोठे उद्दिष्ट म्हणजे महिला आणि पुरुषांमध्ये समानता निर्माण करण्यासाठी जागरूकता आणणे, तसेच महिलांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे होय.

आज पुरुषांबरोबर स्त्रियादेखील सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत, परंतु आजदेखील स्त्री सुरक्षित नाही, हे खेदाने बोलावेच लागेन. लैंगिक शोषण, अत्याचार, हुंडाबळी, भृणहत्या या गोष्टींमुळे स्त्रियांच्या मुलींच्या मनात भीतीची, असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मुलीचा जन्म झाल्या वर तिचा तिरस्कार केला जातो, स्त्रीयांचा अपमान किला जातो. स्त्री-पुरुष समानता ही आचरणात आणायला हवी, शेवटी एवढेच म्हणेन की, 

"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार 

"तुझ्या प्रयत्नांना मिळू दे, यशाची सोनेरी किनार, 

लक्ष दिव्यांनी उजळू दे, तुझा संसार : कर्तत्व आणि 

सामर्थ्याची ओढून ये नवी झालर, 

स्त्री शक्तीचा होऊ दे पुन्हा एकदा जागर !!"

एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र !
➡️ आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा !


➡️ https://youtu.be/RX822UOzNssआशा आहे की तुम्हाला जागतिक महिला दिनाची मराठी मध्ये (pdf)  भाषण नक्कीच आवडेल महिला दिनाचे भाषण तुम्ही तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्कीच शेअर करा या भाषणांमध्ये काही कविता चारोळ्या तुम्ही सूत्रसंचालनासाठी ही वापर करू शकता !✡️ महिला दिन प्रश्नमंजुषा मराठी

FAQ

Q. जागतिक महिला दिन केव्हा साजरा केला जातो?

Ans- जागतिक महिला दिन दर वर्षी 8 मार्च रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो

Q. पहिला महिला दिन कधी साजरा करण्यात आला ?

Ans- दिनांक 28 फेब्रुवारी 1909 ला न्यूयॉर्क मध्ये पहिला महिला दिन साजरा करण्यात आला

Q. महिला दिन भाषण निबंध मराठी मध्ये कुठे मिळेल ?

Ans- जागतिक महिला दिन भाषण marathibhashan.com वेबसाईटवर नक्की भेटेल!

Q. जागतिक महिला दिन का साजरा केला जातो ?

Ans- जगातील महिलांनी महिलांच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ 8 मार्च हा जागतिक महिला दिन साजरा केला जातो

Q. पहिली जागतिक महिला परिषद कुठे झाली ?

Ans- १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !