Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

आरटीई प्रवेश 2023-24 महाराष्ट्र| rte admission 2023-24 maharashtra in marathi

आरटीई प्रवेश 2023-24 महाराष्ट्र | rte admission 2023-24 maharashtra in marathi | rte maharashtra 2023-24


📝 RTE ऑनलाइन प्रोसेस आज पासून सुरू झालेली असून दि. ०१/०३/२०२३  RTE चे फॉर्म भरता येणार आहे, तरी जास्तीत जास्त गरजू पालकांनी आपल्या पाल्याच्या मोफत शिक्षणाकरीता या योजनेचा लाभ घ्यावा.

दरवर्षी प्रमाणे सन २०२३-२४ या वर्षांची बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजनी विनाअनुदानित व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश प्रक्रिया  ( rte maharashtra 2023-24 ) ऑनलाईन राबविण्यात येत आहे. सन २०२३- २४ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेबाबत संचालनालया च्या पत्रान्वये सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेतर्गत पात्र शाळांची नोंदणी पुर्ण झालेली आहे. सबब, बालकाच्या पालकांकडून RTE 25% ऑनलाईन अर्ज मागविणेची प्रक्रिया दि. ०१/०३/२०२३ दुपारी ०३:०० ते दि. १७/०३/२०२३ रात्री १२:०० वाजेपर्यंत सादर करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियतर्गत आनलाईन अर्ज भरणे, प्रवेश प्रक्रियेकरीता आवश्यक कागदपत्रे आणि इतर अनुषंगिक बाबींबाबत सर्व समावेशक मार्गदर्शक सुचना खालीलप्रमाणे निर्गमित करण्यात येत आहेत.


Rte maharashtra 2023-24(toc)


✅ RTE 25 % 2023 -24 चे ठळक मुद्दे


  • RTE कायद्याअंतर्गत पूर्ण शिक्षण Nursery , Jr Kg, 1st ते 8th std पर्यंत मोफत
  • कुठलेही शुल्क नाही !
  • SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.
  • कोणत्याही प्रलोभनास बळी पडून, कोणत्याही मध्यस्थासोबत आर्थिक व्यवहार करू नये.
  • खुल्या वर्गासाठी ( आर्थिक दुर्बल गट OPEN ) वार्षिक उत्पन्न एक लाखाच्या आतील असावे.
  • SC, ST, OBC,NT 1,2,3 ( वंचित गट )  यांना वार्षिक उत्पन्न एक लाखाची अट लागू नाही म्हणजे वरील कॅटेगिरी च्या विद्यार्थ्यांना /पालक अर्ज करू शकता त्यांना 1लाख वार्षिक उत्पन्न दाखल्याची अट लागू नाही
  • Admissions seats प्रमाणे उपलब्ध होतील, ह्याची पालकांनी नोंद घ्यावी
  • R.T.E ( शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत ) तुमच्या पाल्याला इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या शाळेत मोफत प्रवेश* 📣
  • R.T.E (शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५% आरक्षित जागेवर आर्थिक व सामाजिक दुर्बल घटकांसाठी)



RTE 25% 2923 -24 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे - rte maharashtra 2023-24 document list

हिवाशी पुरावा यामध्ये खालीलपैकी कोणतेही एक तयार ठेवावे

आधार कार्ड

पासपोर्ट

निवडणुक ओळखपत्र

वीज बील

घरपट्टी

Tax पावती

पाणीपट्टी

वाहन चालवण्याचा परवाना

राष्ट्रीय बँक पासबुक

स्वतःच्या मालकीचे घर नसेल तर भाडे करार (नोत्री) ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वीचा असावा

पाल्याचा जन्माचा दाखला

पाल्याचे पासपोर्ट साईज़ रंगीत फोटो

वंचित गटातील पालकासाठी जातीचा दाखला (फक्त SC/ST OBC NT SBC)

आर्थिक दुर्बल पालकांसाठी एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला (OPEN)

अपंग गोट्यामधून फॉर्म भरत असाल तर 49 टक्के चे प्रमाणपत्र आवश्यक

घटस्पोटीत कोट्यातून अर्ज भरत असाल तर संबंधित कागदपत्रे लागतील

अनाथ बालक कोट्यातून फॉर्म भरत असाल तर अनाथ बालकाचे अनाथालयाचे प्रमाण पत्र आवश्यक

ज्या विद्यार्थ्यांचे पालक 01 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 मध्ये एक किंवा दोन्ही पालक कोविडमध्ये मृत्यू पावल्यास त्यांना सुद्धा वंचित गटात फॉर्म भरता येईल सदर पालकांचा कोविडमुळे मृत्यू झाल्याचे करून पत्र आवश्यक

तसेच एचआयव्ही धारक पालक किंवा अर्जदार तसेच घटस्फोटीत पालक विधवा पालक हे सुद्धा वंचित गटामध्ये अर्ज करू शकतात त्यासाठी सर्व कागदपत्रे आवश्यक आहे



RTE 25% 2023-24ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सुचना | rte maharashtra 2023-24 online apply website last date


1. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयंअर्थसाहीत शाळा, खाजगी विनाअनुदानीत व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये इ. १ ली किंवा पुर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता पालकांनी https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर -जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया विहित मुदतीमध्ये पूर्ण करावी. 

वंचित गटातील प्रवर्ग 

  • अनुसूचित जाती
  • अनुसूचित जमाती
  • विमुक्त जाती (अ)
  • भटक्या जमाती (ब)
  • भटक्या जमाती (क)
  • भटक्या जमाती (ड).
  • इतर मागास वर्ग ओ.बी.सी विशेष मागास वर्ग (एस.बी.सी)
  • दिव्यांग बालके
  • एच. आय. व्ही. बाधित किंवा एच. आय. ही प्रभावित बालके अनाथ बालके
  • कोव्हीड प्रभावित बालक (ज्याचे पालक एक किंवा दोन्ही यांचे निधन १ एप्रिल २०२० से ३१ मार्च २०२२ या कालावधीत कोव्हीड प्रादुर्भावामुळे झाले) 

वंचित गटातील बालकांच्या प्रवेशाकरीता वार्षिक कमाल उत्पन्नाची मर्यादा लागू नाही. 


आरटीई प्रवेश 2023-24 महाराष्ट्र वयोमर्यादा | rte maharashtra 2023-24 age limit

RTE महाराष्ट्र वयोमर्यादा 2023
 RTE महाराष्ट्र अर्ज 2023-2024 साठी विद्यार्थी 3 ते 14 वयोगटातील असणे आवश्यक आहे.

Click here to download Age limit circular


RTE 25 % 2023 24 फॉर्म भरत असतांना घ्यायची काळजी

  1. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो. 
  2. २५ टक्के प्रवेश प्रक्रियेकरीता विचारपुर्वक १० शाळांची निवड करण्यात यावी,
  3. पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेवून पालकांनी बलूनद्वारे निवास स्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरीता तो बलून जास्तीत जास्त ५ वेळाच निश्चित करता येईल यांची नोंद घ्यावी. त्यामुळे पालकांनी निवास स्थानाचे लोकेशन अचूक नमूद करावे.
  4. प्रवेश प्रक्रियेबाबत विहित मुदतीमध्ये परिपूर्ण अर्ज भरला जाईल याची दक्षता घ्यावी. अर्ज सादर करण्याच्या अंतिम कालावधीमध्ये इंटरनेट अथवा इतर तांत्रिक अडचणीमुळे परिपुर्ण अर्ज सादर करण्यामध्ये व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सबब, शक्य तितक्या लवकर परिपूर्ण अर्ज सादर केला जाईल याची दक्षता घेण्यात यावी. प्रवेश प्रक्रियेबाबत आपणास काही समस्या असल्यास आरटीई पोर्टल वरती मदत केंद्राची माहिती
  5. देण्यात आलेली आहे. त्यांच्याशी संपर्क करून समस्याचे निराकरण करण्यात यावे. Vit. पालकांनी ऑनलाईनन अर्ज करताना अबुक व खरी माहिती भरावी. (उदा. घरचा पत्ता, जन्म दिनांक, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, इतरा या बालकांनी यापूर्वी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकाला पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  6. यापूर्वी २५ टक्के प्रवेश प्रक्रियेतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकाचा चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद करण्यात येईल

RTE 25% 2023 24 निवड प्रक्रिया | rte maharashtra 2023-24 selection process

 ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर व्यापक प्रसिद्धी देऊन ऑनलाईन सोडत (Lottery) काढण्याकरीता दिनांक निश्चित केली जाईल. उक्त तारखेस ऑनलाईन पद्धतीने सोडत (Lottery) काढण्यात येईल. सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरीता आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी एकाच टप्यात लॉटरी काढली जाईल. तसेच शाळेत आरटीई अंतर्गत उपलब्ध जागांएवढी एक प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) तयार केली जाईल. लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी पुरेसा कालावधी देण्यात येईल. या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर पहिल्या प्रतिक्षा यादी (वेटींग लिस्ट) मधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज पाठविला जाईल. मगच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. या कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊन शाळेत जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतिक्षा यादी (बेटींग लिस्ट मधील अनुक्रमे विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा मेसेज एनआयसी द्वारे पाठविला जाईल. मग दुसऱ्या प्रतिक्षा यादीतील विद्याथ्र्यांनी अलॉटमेंट लेटर काढून विहित मुदतीत प्रवेश घ्यावा. अशा पद्धतीने आरटीई प्रवेश पात्र शाळांची प्रवेश क्षमता पूर्ण होईपर्यंत तिसन्या आणि चौथ्या प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना एनआयसी कडून मेसेज पाठविले जातील.
सोडत लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला आर.टी.ई. पोर्टलवर त्यांच्या लॉगीनला विद्यायांची नावे च मोबाईल क्रमांक दिले जातील विद्यार्थ्याच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलावले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे व एक छायांकित प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी, कागदपत्राची प्राथमिक तपासणी करून योग्य असल्यास विद्यार्थ्यांच्या नावापुढे ऑनलाईन नोंद करावी तसेच पालकाकडील अलॉटमेंट लेटर वर तात्पुरता प्रवेश दिला असे नोंद करावे व ची नोंद करुन पालकांना परत करावे तसेच पालकांकडून हमीपत्र भरून घ्यावे.
काही पालक मुळ गावी किंवा अन्य जागी स्थलांतर होण्याची शक्यता असते. त्यामुळे दिलेल्या तारखेस पालक आलेले नाही तर त्यांना पुन्हा दोन संधी देण्यात याव्यात. बालकांना प्रवेश घेण्याकरीता पालकांनी पडताळणी समितीशी संपर्क साधावा.

RTE Admission 2023-24 Maharashtra Last Date start date 

School Registration Starting Date23 January 2023
Last Date For School Registration25 February 2023
Notification Release28 February 2023
Online Admission Starting Date1 March 2023
Last Date For RTE 25 Admission Form17 March 2023
Lottery Result  1st Announcement14th April 2023(expected)
Lottery Result  2nd AnnouncementUpdate Soon
Selection List Announcement14th April 2023
Vacant Seat AnnouncementApril 2023
School Admission Starts From5th April to 20th April 2023

State Wise Tentative Schedule of RTE



RTE 25% 2023 -24 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !