Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2023 | 1 may maharashtra din wishes quotes shayri charoli in marathi

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी | 1 may maharashtra din wishes quotes shayri charoli in marathi 2023


मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, 

प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा 


सर्वांना माझा नमस्कार..... १ मे. हा सोन्याचा दिवस, मराठी भाषिकांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस, महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस.. . महाराष्ट्रातील तमाम मावळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. आज आपण या लेखा मध्ये महाराष्ट्र दिनाचे शुभेच्छा संदेश आपण इतरांना देण्यासाठी व्हाट्सअप वर स्टेटस ठेवण्यासाठी इंस्टाग्राम महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा ( 1 may maharashtra din wishes quotes marathi ) चारोळी शायरी घेऊन आलो फायदा आपल्याला नक्कीच होईल तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य स्थापना झाली. म्हणूनच आजचा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो.१ मे या दिवशी महाराष्ट्र दिनाबरोबरच आंतरराष्ट्रीय कामगार दिनही साजरा केला जातो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्याच्या विकासाच्या पाया भरणीत अनेक थोर संत, महापुरुष व समाजसुधारकांचे योगदान आहे. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण या दिवशी केले जाते. आजचा हा दिवस मराठी माणसे मोठ्या उत्साहाने, आनंदाने आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करतात. आजच्या या दिवशी सर्व शाळा, महाविदयालये व शासकीय कार्यालयांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अशा या वैभवशाली महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आल्याचा, आपण महाराष्ट्रीयन असल्याचा आपल्याला गर्व असला पाहीजे. जय हिंद ! जय महाराष्ट्र ! धन्यवाद !!


महाराष्ट्र दिन शुभेच्छा 2023 (toc)


महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 2023

दगड झालो तर 'सह्याद्रीचा' होईन! माती झालो तर 'महाराष्ट्राची' होईन! तलवार झालो तर 'भवानी मातेची' होईन! आणि पुन्हा मानव जन्म मिळाला तर 'मराठीच' होईन!महाराष्ट्र दिन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!


maharashtra din wishes in marathi 2023

उत्सव हा बलिदानाचा असा साजरावा, जयजयकार तयांचा आसमंती गर्जावाः सांडिले रूधिर ज्यांनी महाराष्ट्रासाठी, जन्म तयांचा फिरूनी महाराष्ट्र देशीच व्हावा! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


1 may maharashtra din shubhechha in marathi

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा, नाजुक देशा,कोमल देशा, फुलांच्याही देशा  प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा......महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा


🚩 जय जय महाराष्ट्र माझा ( महाराष्ट्र राज्य गीत 2023 pdf )


1 may maharashtra din status in marathi 2023

दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


1 may maharashtra din quotes in marathi

सहयाद्रीच्या कडा गर्जुनी, गाती तुझे गुणगाण, सागराच्या अरबी लाटा तुलाच देती रेमान खास तुझी ही वीर माती, खास तुझी ही भाषा नाव तुझे ठाव जगा, जय महाराष्ट्र देशा !!


maharashtra din and kamgar din wishes in marathi 2023

लाख संकटे आली तरीही, ना कधी मानली हार, अन्याया विरोधी सदा उभा तू तारणहार, शौर्य, धैर्यच्या बळावर, उधळल्या दाही दिशा नाव तुझे ठाव जगा, जय महाराष्ट्र देशा !!


1 may maharashtra din wishes in marathi

काय तुझे शौर्याचे पोवाडे, जी काय तुझी वीर गाथा स्पर्ती चढे मनास माझ्या ऐकुनी वीर कथा। किती ऐकले, किती वाचले, ना पूर्ण हो अभिलाषा नाव तुझे ठाव जगा, जय महाराष्ट्र माझा!"


1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो २०२३

सहयाद्रीचा सिंह तुम्ही हो राजे आमची शान राष्ट्रावर जी नजर उठली, ती छाटून टाकली मान नाम मात्र बस स्पुर्ती येते, चढें विजयाची नशा नाव तुझे ठाव जगा, जय महाराष्ट्र देशा !!


महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms

जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र देशा नाव तुझे ठाव जगा, जय महाराष्ट्र देशी !जय हिंद, जय महाराष्ट्र !!


1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

माझा माझा महाराष्ट्र माझा मनोमनी वसला शिवाजी राजा वंदितो या भगव्या ध्वजा गर्जतो महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा!


maharashtra din charolya

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय रयतेचे छत्रपती आमचे शिवराय .... महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


1 may maharashtra din charoli

गर्जा महाराष्ट्र माझा भक्ती आणि शक्तीचा, ज्ञान व विज्ञानाचा, कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा!


maharashtra din shayri marathi

अभिमान आहे मराठी असल्याचा, माझ्या मातीचा, माझ्या महाराष्ट्राचा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


maharashtra din kavita marathi

म मराठीचा..म- माऊलीच्या म. मायेचा..म महात्मांच्या...म.माणुसकीचा..म-मावळाच्या ..म मर्दानगीचा ..म महाराजांच्या म महाराष्ट्राचा... अशा महाराष्ट्रादिनाच्या मनापासुन शुभेच्छा..!!


1 may maharashtra din kavita charolya shayari

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नमा , अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा ...महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


ज्ञानोबा आणि तुकोबांचा महाराष्ट्र जान, गती आणि प्रगतीचा महाराष्ट्र जागी सर्वश्रेष्ठ माझा महाराष्ट्र 1 मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


भावभक्तीच्या देशा, आणिक बुद्धीच्या देशा, शाहिरांच्या देशा, कर्त्यां मर्दाच्या देशा... जय जय महाराष्ट्र देशा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा


माझा महाराष्ट्र अतिशय सुंदर कविता


बोलक्या कविता, पारावरचा वड,

देवीचा गड आणि तमाशाचा फड 

म्हणजे माझा महाराष्ट्र .....


आंबा, फणस, साग,

आणि माणसातले वाघ 

म्हणजे माझा महाराष्ट्र .....


अंगणातली पवित्र तुळस,

आणि मंदिराचा उंच कळस

म्हणजे माझा महाराष्ट्र .....


कपाशी, तुर, ज्वारी, 

आणि पंढरीची वारी 

म्हणजे माझा महाराष्ट्र .....


इरसाल हस्ती, मातीतली कुस्ती,

आणि राजकारणातील मस्ती 

म्हणजे माझा महाराष्ट्र.


शिमगा, पोळा, होळी, 

आणि पुरणाची पोळी 

म्हणजे माझा महाराष्ट्र ....


मराठवाड्याचा मराठी बाणा,

आणि मावळयाचा ताठ कणा 

म्हणजे माझा महाराष्ट्र .....


कोकणच्या हापूसचा गोडवा, 

आणि खानदेशातील सप्तशृंगीचा जोगवा 

म्हणजे माझा महाराष्ट्र .....
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !