Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

११ वी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर | 11th admission second round date 2023

११ वी प्रवेशप्रक्रिया दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर  | 11th admission second round date 2023


मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांसाठी)

CAP - 2 प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (केंद्रीय प्रवेशाच्या CAP जागांसाठी) जाहीर झाले असून विद्यार्थ्यांनी आपला दुसरा राउंड साठी आपले प्रेफरन्स व आपली इतर ही माहिती चेंज करून अपडेट करू शकता त्याचे वेळापत्रक खाली दिलेली आहे . आपण सेकंड राउंड साठी 27 जून 2023 पासून ते 29 जून 2023 पर्यंत आपला अर्ज अपडेट करू शकता दुसऱ्या राउंड मध्ये करावयाची प्रोसिजर याची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत



♎️ Join our Whatsapp Group

➡️  Click Here


11th Admission 2nd round Timetable



11th Admission 2nd Round Timetable (toc)




💥 11th Admission 2023 : 2nd Round Start Date दुसऱ्या राउंड चे वेळापत्रक


1) 11th Admission 2023 CAP Round - 2 Start Date 


दि. २७-०६-२०२३. स.१०:००वा पासून दि. २९-०६-२०२३.


  1. प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदविणे, म्हणजे नियमित फेरी-२ साठी पसंती अर्ज भाग-२ ऑनलाईन सादर करणे.  विद्यार्थ्यांना भाग-२ मध्ये किमान एक व कमाल १० पसंतीक्रम / विद्यालये नोदविता येतील.
  2. नवीन विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी करुन अर्ज भाग-१ भरून तो प्रमाणित करून घेऊ शकतात. रात्री १०:००वा पर्यंत अर्ज सादर करणे
  3. विद्यार्थ्यांना त्यांचा अर्ज भाग-१ मध्ये दुरुस्ती करता येईल, फक्त अर्ज वेळेत लॉक करणे अनिवार्य राहील. टीपर. केवळ भाग-१ पडताळणी झालेले विद्यार्थी भाग २ भरू शकतात.

टीप -  फक्त पसंतीक्रम भाग-२ लॉक असलेले अर्ज अलॉटमेंटसाठी विचारात घेतले जातील.

  • सदर प्रवेश फेरीमध्ये विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलता येतील अन्यथा मागील फेरीचे पसंतीक्रम कायम राहतील.  (१. प्रवेश घेतलेले, २. फेरी-१ मध्ये प्रथम पसंतीक्रम मिळालेले (प्रवेश न घेतलेले तसेच रद्द केलेले) अर्ज या फेरीसाठी प्रतिबंधित आहेत)
  • यासोबत इच्छुक विद्यार्थी, कोटा प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदवू शकतात. (Apply for Quota ) प्रवेशित विद्यार्थी, दिलक्षी विषय प्रवेशासाठी ऑनलाईन पसंती नोंदवू शकतात. (Apply for Bifocal)
  • (कोटा तसेच दिलक्षी प्रवेशासाठीचे वेळापत्रक स्वतंत्रपणे संलग्न आहे



💥 ११वी प्रवेश प्रक्रिया पहिली मेरीट लिस्ट जाहीर


2) DATA PROCESSING 


 दि. ३०-०६-२०२३ ते दि.०२-०७-२०२३


DATA PROCESSING (back-end activities)

पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करणे तसेच विभागीय CAP समित्यांकडून Allotment चे पूर्व परीक्षण. 


3) 2nd Round Allotment /  Selection List 

दि.०३-०७-२०२३. स. १०:००वा.


  1. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी कनिष्ठ महाविद्यालय निवड यादी / तपशील पोर्टलवर प्रदर्शित करणे.
  2. विद्यार्थी लॉगीन मध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे. 
  3. संबंधित विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्याथ्यांची यादी कॉलेज लॉगीन मध्ये दर्शविणे.
  4. फेरीचे कट-ऑफ पोर्टलवर दर्शविणे. (विद्यार्थ्यांना संक्षिप्त संदेश / SMS देणे)
  5. कॉलेज लॉगीन मध्ये प्रवेश ऑनलाईन निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे तसेच प्रवेश नाकारणे या प्रक्रिया सुरु राहतील.



💥 4) 2nd Round Admission Process 


दि.०३-०७-२०२३. स.१०:००वा पासून दि.०५-०७-२०२३. सायं. ०६:००वा पर्यंत

  1. अलॉट झालेल्या उमावि / कमवि मध्ये आपला प्रवेश निश्चित करणे, (प्रवेशास जाण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे).
  2. अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यावयाचा असल्यास, प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करुन आपला प्रवेश तेथे निश्चित करावा
  3.  जर अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर असे विद्यार्थी पुढील फेरीची वाट पाहू शकतील (खालील टीपा बाचा).
  4. प्रवेश निश्चित करणे


टीपा: 

• जर विद्यार्थ्याला मिळालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉगिनमध्ये (Proceed for Admission) क्लिक करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि अलॉट झालेल्या विद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा. 

• जर एखाद्या विद्यार्थ्यांला अलॉट झालेल्या विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेन्यांसाठी थांबू शकतो. परंतु, ज्या विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचे विद्यालय अलॉट झालेले आहे, त्यांनी तेथेच प्रवेश घेणे अनिवार्य आहे. जर प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही किंवा प्रवेश नाकारला गेला, तर त्यांना पुढील एका नियमित फेरीसाठी प्रतिबंधित केले जाईल आणि त्या फेरीनंतरच प्रवेशासाठी त्यांचा विचार केला जाईल.

• जर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचा/तिचा निश्चित केलेला प्रवेश रद्द करायचा असेल, तर त्यासाठी संबंधित विद्यालयास विनंती करून आपला प्रवेश रद्द करून घेता येईल, असे प्रवेश रद्द केलेले विद्यार्थीही पुढील एका नियमित फेरीसाठी प्रतिबंधित होतील.



💥 5) 3rd Round Will Start 


दि. ०५-०७-२०२३. रात्री ०८:०० वा पर्यंत

पुढील फेरीसाठी नवीन विद्यार्थी नोंदणी आणि अर्ज भाग-१ भरणे सुरू राहील. (या कालावधीत फॉर्म भाग-१ मध्ये अनलोक / दुरुस्ती करता येणार नाही).

कोटांतर्गत प्रवेश तसेच द्विलक्षी विषयांसाठीचे प्रवेशाबाबत स्वतंत्र वेळापत्रकात दर्शविल्याप्रमाणे कर्यवाही करता येईल. प्रवेशित विद्यार्थ्याची स्थिती पोर्टलवर ऑनलाईन नोंदविणेसाठी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी वेळ. (रात्री ०८:०० वा. पर्यंत)

उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी कोट्यातील रिक्त जागा CAP कडे प्रत्यार्पित करण्यासाठी वेळ. (व्यवस्थापन आणि इनहाऊस कोटा) प्रढील फेरीसाठी रिक्त जागा जाहीर करणे. (CAP व कोटांतर्गत रिक्त जागांचा समावेश असेल.)


🔰 हे पण वाचा 

💥अकरावी ऑनलाइन प्रवेश 2023 24 भाग 2 कसा भरावा ?

⭐ सर्व कॉलेजची CutOff लिस्ट डाऊनलोड करा २०२३

💥११ वी प्रेवेश प्रक्रिया २०२३ २४ रजिस्ट्रेशन कसे करावे 

💥ज्यांनी अजून १ भाग भरला नाही त्यांनी क्लिक करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !