Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

11 वी प्रवेश प्रक्रिया 2024-25 महाराष्ट्र - 11th admission date 2024 -25 maharashtra mumbai pune nagpur nashik amravati aurangabad , 11thadmission.org.in

11 वी प्रवेश प्रक्रिया 2024-25 महाराष्ट्र - 11th admission date 2024 -25 maharashtra mumbai pune nagpur nashik amravati aurangabad , 11thadmission.org.in

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या लेखामध्ये इ अकरावीची प्रवेश प्रक्रिया 2024 -25 महाराष्ट्र मध्ये कशी असेल,  प्रवेश प्रक्रिया किती तारखेला सुरू होणार असून 11 वी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक 2024 मध्ये काय आहे ११ वी प्रवेश प्रक्रीये साठी आवश्यक असलेले कागतपत्रे कोणती या बाबत  संपूर्ण माहिती या लेखामध्ये बघणार आहोत.चला तर लेखाला सुरवात करूया .



💥11 वी प्रवेश प्रक्रिया 2024-25 महाराष्ट्र - 11th admission 2024 -25 maharashtra mumbai pune nagpur nashik amravati aurangabad , 11thadmission.org.in

नमस्कार इयत्ता दहावीच्या विद्यार्थी व  विद्यार्थ्यांच्या पालकांनो दहावीच्या परीक्षा 04 एप्रिल ला संपल्या असून विद्यार्थ्यांना आता सुट्ट्या लागलेल्या आहेत परंतु इयत्ता दहावी नंतर सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश ,  तुम्हाला माहीतच आहे दरवर्षी मुंबई पुणे नागपूर नाशिक अमरावती औरंगाबाद ,इत्यादी जिल्ह्यातील कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया 2024 या प्रक्रियेमध्ये सहभाग घेऊन त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये https://11thadmission.org.in/ या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून आपल्याला अर्ज करावा लागतो व त्यानंतरच आपल्याला इयत्ता अकरावी मध्ये पाहिजे त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेता येत असतो.

 परंतु या वर्षी इयत्ता 11वी प्रवेश प्रक्रिया 2024 महाराष्ट्र मध्ये कधी सुरू होणार हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांना पडले असून त्या सर्व प्रश्नांची उत्तर आज आम्ही त्या लेखातून आपण यांना सांगणार आहोत.


🎯 अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर 2024 -25 | 11th Admission start date 2024

मागील वर्षीच्या वेळापत्रकानुसार १ ते १४ मे दरम्यान प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याचा सराव व - १७ मे पासून प्रत्यक्ष अर्ज भरणे सुरु झाले होते  तर शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी २३ मे ते दहावीचा निकाल जाहीर होईपर्यंत सुरू होती . या हि वर्षी पुढील आठवड्यात म्हणजे साधारण १५ मे पासून प्रवेश अर्ज ऑनलाइन भरण्याचा सराव ( Demo ) सुरु होण्याची शक्यता आहे त्यापूर्वी आपण ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी लागणारे कागदपत्रे काढून ठेवावे .



💥11 वी प्रवेशप्रक्रिया 2022 साठी लागणारे कागदपत्रे 

11th Registration process step by step

विद्यार्थी मित्रांणो इ 11वी प्रवेशप्रक्रिया साठी सुरवातीला आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करावे लागते त्या साठी कुठलेही कागतपत्रे लागत नाहीत फक्त एक चालू असलेला मोबाईल क्रमांक व एक ईमेल अड्रेस जो की चालू असेल , त्या वरच आपल्याला ID व पासवर्ड येणार आहे .

11th admission part 1 form filling 

दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला आपले कागतपत्रे अपलोड करावे लागणार आहेत जसे की 
  1. शाळा सोडल्याचा दाखला (LC) , 
  2. १० वी मार्कशीट , 
  3. कास्ट मध्ये असाल तर कास्ट सर्टिफिकेट 
  4. नॅशनल सर्टिफिकेट, 
  5. डोमेसाईल सर्टिफिकेट 
एवढे कागतपत्रे आपल्याला लागणार आहेत ,हे सर्व आपल्या कडे नसतील तर आपल्याला एक हमीपत्र अपलोड करावे लागते ते उपलोड केल्यास आपल्याला सर्व कागतपत्रे कॉलेज मध्ये ऍडमिशन च्या वेळेस द्यावे लागतील .


अशी असते 11 वी प्रवेशप्रक्रिया 2024-25 | 11th Admission procedure 2024-25 maharashtra 11thadmission.org.in

पहिला टप्पा -  11th FYJC registration 2024-25 maharashtra

पहिला टप्पा हा विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचा असतो त्यामध्ये विद्यार्थ्यांना आपला सीट नंबर आपले नाव इत्यादी टाकून आपले रजिस्ट्रेशन करावे लागते व आपला यूजर आयडी व पासवर्ड तयार करावा लागतो व फिस भरावी लागते

दुसरा टप्पा - 11th FYJC Part 1 form filling 2024-25

दुसरा टप्पा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला आपली सविस्तर माहिती भरावी लागते त्याला FYJC part 1 असे सुद्धा म्हंटले जाते त्यात सर्व माहिती भरून आपली माहिती आपल्याला शाळेकडून तपासून घ्यावी लागते 

तिसरा टप्पा - 11th FYJC Part 2 form filling 2024-25

तिसरा टप्पा  कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी आपल्याला कॉलेजचा  पसंतीक्रम आपल्याला द्यावा लागतो व नंतर आपला ज्या कॉलेज ला लागला आहे त्या कॉलेज मध्ये  ॲडमिशन विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत ऍडमिशन घ्यायचे असतात 

सर्व विद्यार्थ्यांना माहीतच असेल की 11 वी प्रवेश प्रक्रिया चे एकूण तीन ते जास्तीत जास्त चार राऊंड होत असतात, विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांना त्या त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो ,  विद्यार्थ्यांना पहिला राउंड मध्ये जरी नंबर लागला नसता लागला नाही तर विद्यार्थ्याचा दुसरा राउंड मध्ये नंबर लागू शकतो याची सविस्तर माहिती आपण पुढील लेखामध्ये वाचणार आहोत त्यामुळे 11 वी प्रवेश प्रक्रिया 2024 कशी असेल त्याचा त्यासंदर्भात सर्व इत्थंभूत माहिती आपल्याला मराठी भाषण या वेबसाईटवर मिळणारच आहे त्यामुळे सदर वेबसाईटला बुकमार्क करून ठेवा त्यामुळे पुढील येणाऱ्या सूचना तुम्हाला तर लवकरच मिळतील



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !