Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

पायाभूत चाचणी वेळापत्रक 2023 अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका pdf कधी मिळणार ? | Payabhut chachani 2023 prashn patrika syllabus

पायाभूत चाचणी वेळापत्रक 2023  अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका pdf कधी मिळणार ? Payabhut chachani 2023 prashn patrika syllabus 


STARS प्रकल्प अंतर्गत नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी आयोजनाबाबत. आज आपण या लेखांमध्ये पायाभूत चाचणी कधी घ्यायची आहे पायाभूत चाचणीचे वेळापत्रक , प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका कधी व कशा मिळतील याची संपूर्ण माहिती या लेखांमध्ये बघणार आहोत

 सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्यांचे (PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन चाचणी १ व संकलित मूल्यमापन चाचणी २ अशा तीन नियतकालिक चाचण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर चाचणी अंतर्गत प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या इयत्ता तिसरी से आठवीतील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळातील विद्यार्थ्या चाचणी होणार आहे.


पायाभूत चाचणी वेळापत्रक 2023



प्रत्येक विद्यार्थ्याने इनिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल. 

इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाही यामुळे विद्यार्थ्यांना याचा अतिरिक्त ताण देऊ नये. पाण्याचा मुख्य उदेशअध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृती- कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे हा आहे.


🔰 पायाभूत चाचणी उद्देश/ उपयोग फायदे :-


१) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पत्ती पडताळून पाहणे 

२) अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास मदत करणारी चाचणी असेल, ३) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण IAS मधील संपादणूक वाढवण्याच्या एष्टीकोनातून मदत होईल

४) अध्ययनात मागे असणा-या विद्याथ्यांना पुढे नेण्यच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अमलबजावणीस दिशा प्राप्त होईल.

इयत्ता विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची संपादक स्थिती समजण्यास मदत होईल.


🔰 पायाभूत चाचणीचे वेळापत्रक अभ्यासक्रम प्रश्नपत्रिका माहिती GR डाऊनलोड करा



🔰  तीन नियतकालिक मूल्यांकन चाचणी प्रकार व कालावधी


  1. पायाभूत चाचणी - माहे ऑगस्ट २०२३ शेवटचा आठवडा
  2. संकलित मूल्यमापन चाचणी  - सत्र १ - माहे ऑक्टोबर २०२३ तिसरा आठवडा माहे नोव्हेंबर पहिला आठवडा २०२३
  3. संकलित मूल्यमापन चाचणी  -  सत्र २ - माहे एप्रिल २०२४ पहिला दुसरा आठवडा


नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत पायाभूत चाचणी दि. १७ ते १९ ऑगस्ट २०२३ या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे.


🔰 पायाभूत चाचण्यांचे माध्यम व विषय

सदर चाचणी ही एकूण दहा माध्यमात होईल. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या तीन विषयाची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठीचे आयोजन करण्यात येणार आहे.


🔰 चाचणीचा अभ्यासक्रम 2023

मागील इयत्तेच्या अभ्यासक्रम अध्ययन निष्पत्ती / मुलभूत क्षमता यावर आधारित असेल.


🔰 पायाभूत चाचणीचे वेळापत्रक 2023

पायाभूत चाचणीचे वेळापत्रक 2023



🔰 पायाभूत चाचणी अंमलबजावणीबाबत सूचना


१. पायाभूत चाचणी ही शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यासाठी चा करण्यात येणार आहे.

२. पायाभूत चाचणीकरीता प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (इंग्रजी) या विषयांच्या चाचण्या राज्य स्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत विद्यार्थीनिहाय पुरविण्यात येणार आहेत. 

३. पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका सोबत शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूची विषयनिहाय शाळानिहाय व इयत्तानिहाय एक प्रत याप्रमाणे शाळांना पुरविण्यात येणार आहे.

४. सदर वेळापत्रक हे संबंधित सर्व शाळांच्या निदर्शनास येईल याची दक्षता घ्यावी. 

५. पायाभूत चाचणीच्या प्रश्नपत्रिका प्रत्येक जिल्ह्याच्या UDISE मधील विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक विषय व वर्गासाठी आपल्या तालुक्यामध्ये समक्ष पोहोच करण्यात आल्या आहेत. 

६. तालुकास्तरावर पोहचविण्यात आलेल्या/ येणाऱ्या सर्व प्रश्नपत्रिका सुरक्षित राहतील याची दक्षता घ्यावी, त्यासाठी तालुकास्तरावर एक सुरक्षित व स्वतंत्र खोली ताब्यात घ्यावी. या खोलीमध्ये प्राप्त प्रश्नपत्रिका ठेवाव्यात प्रश्नपत्रिका फाटणार नाहीत किंवा पावसाने भिजणार नाहीत याची दक्षता घ्यावी. 

७. तालुका स्तरावर साहित्य प्राप्त होताच संबंधित गटशिक्षणाधिकारी / प्रशासन अधिकारी यानी त्याचे स्तरावर केंद्र स्तरावर पोहचाव्यात व तेथून तात्काळ शाळास्तरावर पोहचाव्यात


🔰 पायाभूत चाचणी 2023 प्रश्नपत्रिका pdf 

पत्रपत्रिका वितरणा संदर्भात पुढील सूचनांचे गांभीर्याने पालन करावे..

  1.  इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थी संख्येनुसार पुरवठा झाला असल्याची खातरजमा तालुका समन्वयानी करावी
  2. केंद्रस्तरावर शाळाच्या पटसंख्याप्रमाणे चाचण्या व शिक्षक सूचनापत्र व उत्तरसूचीचे वितरण करावे. यासाठी तालुका समन्वयकांनी सदर प्रश्नपत्रिका समक्ष मोजूनच आवश्यकख्या चान्यात यावयाच्या आहेत. त्यामध्ये हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. 
  3. कोणत्याही परिस्थितीत प्ररपत्रिका अथवा इतर साहित्याचे झेरॉक्स काढण्यात येऊ नये झेरॉक्ससाठी तालुका समन्वयकांनी कोणत्याही पत्रपत्रिका अथवा इतर साहित्य बाहेर जाणार नाही याची दक्षता घ्यावी.
  4. शाळा स्तरावरील प्रश्नपत्रिका वेळापत्रकाप्रमाणे त्या दिवशी वापरल्या जातील याची दक्षता घ्याची


🇮🇳 हे पण वाचा - 

🆕  15 ऑगस्ट भाषण मराठी pdf 

🎯 माझा तिरंगा माझा अभिमान निबंध भाषण

🆕 हरतालिका व्रत मराठी माहिती

🆕  श्रावण सोमवार च्या हार्दिक शुभेच्छा संदेश

🆕 जागतिक आदिवासी दिन भाषण

🆕 पहिल्या श्रावण सोमवार ची पूजा कशी करावी 2022

🆕 15 ऑगस्ट मराठी अप्रतिम भाष

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !