Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

8 मार्च जागतिक महिला दिन मराठी भाषण Jagtik mahila din speech in marathi language 2021

जागतिक महिला दिन मराठी भाषण 2021| mahila din speech in marathi language 2021 | Mahila din 2021 in marathi | women's day speech marathi 2021

mahila din speech in marathi

Jagtik mahila din bhashan marathi |Mahila din 2020 in marathi:

International women's day speech marathi 2021 introduction :

  • महिला दिन भाषण प्रस्तावना : 

इतिहास सांगतो आमुचा स्त्रीनेच शत्रू तुडवला!

लक्ष्मीबाईने झाशीचा किल्ला लढवला !!

जिजाऊने राजा शिवछत्रपती घडवला !!!

महाराणी ताराबाईने महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला !!

     आजच्या कार्यक्रमाचे सन्मा. अध्यक्ष - आदरणीय व्यासपीठ - वंदनीय गुरुजनवर्ग  जमलेल्या  माझ्या  सर्व  मित्र मैत्रिणींनो आणि महिला दिवस  साजरा करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम महिला भगिनीनो...!

    आज 8 मार्च !!  सर्व  जन आज  आपण येथे महिला दिवस  साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. सर्वप्रथम सर्व  महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणा-या राजमाता जिजाऊ.

"मैं मेरी झांशी कभी नही दुंगी" असे ठमकावून इंग्रजां सोबत  संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई तसेच  स्त्री शिक्षणाची महती ओळखून मुलीना स्त्रीयांना शिक्षणाची दारे खुली करून देणा-या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या सर्व स्त्रीयांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरवात करते.

  • महिला दिन का साजरा करतात ?  पहिली जागतिक महिला परिषद कुठे झाली ?

8 मार्च 1908  मध्ये  न्यूयॉर्क वस्त्रोद्योगातील हजारो स्त्रियांनी रुटगर्स चौकात जमून दहा तास काम  व काम करतो तिथे सुरक्षितता या मागण्या  साठी ऐतिहासिक निदर्शने केली. 

याचबरोबरच लिंग -वर्ण-मालमत्ता आणि सर्व प्रौढ स्त्रियांना -पुरुषांप्रमाणे  मतदानाचा हक्क मिळावा अशी  मागणी केली.

अमेरिकेतील कामगार स्त्रियांनी केलेल्याह्या  ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ-

क्लारा झेटकिन या कम्युनिस्ट कार्यकर्तीने  8 मार्च हा "जागतिक महिला-दिन" म्हणून स्वीकारून  साजरा करावा असा ठराव मांडला तो पासही  झाला.आणि तेव्हा पासून 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करतात .

8 मार्च महिला दिवस  जवळ आला की ह्या दिवसी  काय  करायचं याच्या तयारीला लागतात. 

-------------------------------------------------------------

हे ही वाचा ➡️

💥 महिला दिन सूत्रसंचालन pdf

💥 महिला दिन भाषण अप्रतिम आहे वाचा !

🆕  महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध

🆕 सावित्रीबाई फुले अप्रतिम मराठी निबंध माहिती


-------------------------------------–----------------------

  परंतु या दिवसाचा मुख्य हेतू हा महिला सबलीकरण करणे . परंतु तो  साध्य होतोय का ? आपल्या जवळची  कोणती स्त्री  सबल आहे का? आपण स्वत: ला  प्रश्न  विचारा आहोत का आपण सबल? थोडा विचार करा एखादा  दारु पिणारा नवरा तो बायकोला आजही रोज मारतो. कारण तिच्या पैशातून त्याला दारु पेऊन मजा करायची असते. पण आपण  जातोका तिच्या मदतीला कधी?  नवऱ्यानं सोडून दिलेल्या  बायकोला आपल्या  समाजात आहे का स्थान ? विधवा  झालेल्या स्त्रीला  मिळतो का कधी सन्मान? उलट आपणच तिच्याकडे  तिनेच तर मारले नसेल तिच्या नवऱ्याला अश्या नजरेने बघतो. दर वर्षी होणाऱ्या हळदीकुंकूवाला  एखाद्या विधवा स्त्री ला  बोलवण्याची हिम्मत  कोण करते का  ? अहो   घरात शुभकार्य असलं की अजूनही विधवा स्त्री ला बोलवावकी नाही यावर चर्चा होतात . एखाद्या स्त्रीचा  विनयभंग किवा बलात्कार, अँसिड  हल्ला झालेल्या मुलीला आपण सन्मान कधी  देऊ ? 

स्त्रियांच्या  बाबतीत समाजाची मानसिकता आजही बदलेली नाही. महिला दिवस  साजरा करण्याचा मूळ हेतूच अजून पर्यंत  यशस्वी झालेला नाही  . उलट ज्या स्त्रियांना हा महिला दिवस  साजरा करायचा त्यांनी स्वत:च्या सोयीने  त्या दिवसाचा अर्थ काढलाय हे खरच खूप  भयंकर आहे . 

एखादी स्त्री असून आपण दुसऱ्या स्त्रीच्या भावना कधीच समजू शकत नाही का ?  तिच्या अडचणीत  त्या  स्त्रीला मदत  करू शकत नसूतर  हा दिवसच का  साजरा करायचा ?  आंतरराष्ट्रीय महिला दिवस  हा मौजमजा मस्ती  करण्यासाठी असतो अशी  अशी जर तुमची समजूत असेल तर का करायचा हा दिवस साजरा ?  . 

पुरुषा पेक्षा आणि  पुरुषा शिवाय पण महिला समर्थपणे नाहीतर  त्याच्यापेक्षा उत्तमरितीनं कुटुंब चालवतात हे मी स्वतः बघितले आहे .

खरच अशा महिलांकडे पाहिलं की मनात  वाटतं जागतिक महिला दिनाचं उद्दिष्ट थोडं का होईना साध्य झाल आहे आणि होत आहे .

  • महिला दिन भाषण शेवट   :

शेवटी एवढेच म्हणेन......

स्त्री म्हणजे जन्मदाती,

 स्त्री म्हणजे संस्कृती,

स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, 

स्त्री म्हणजे घराच घरपण,

स्त्री म्हणजे महान कार्य, 

अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.

माझ्या आयुष्या मधील सर्व  महिला - स्त्री वर्गाला तसेच माझे आयुष्य प्रेमाने फुलवून मायेची , सुरक्षिततेची पांघरण घालून माझेहे आयुष्य सुंदर बनवल्या बद्दल शत्शत् नमन करते........

धन्यवाद माझ्या सर्व महिला भगिनींनो .

जय हिंद || जय महाराष्ट्र||


🔰 हे ही वाचा 👉 

⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण

⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण

⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण

⏭️ 28 मार्च - होळी सण मराठी भाषण

आंतराष्ट्रीय महिला दिवस 2021 भाषण कसे वाटले ?

भाषण आवडल्यास व्हाट्सएपवर नक्की च शेअर करा 👇


🚩 महाशिवरात्री मराठी महिती 2021 
👉 https://www.marathibhashan.com/2021/03/2021-mahashivratri-puja-vidhi-2021.html

Q : International Women's Day 2021  kab manate hain?
Ans : 8 mach 2021 ko International Women's Day manate hai.
Q : women's day kab hai 2021?

Ans : 8 mach 2021 ko women's dayhai.
Q : Mahila din 2020 in marathi kadhi aahe ?

Ans : 8 mach 2021 mahila din 2021 la aahe.

महिला दिन विशेष मराठी कविता

स्त्री म्हणजे जन्मदाती,

 स्त्री म्हणजे संस्कृती,

स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, 

स्त्री म्हणजे घराच घरपण,

स्त्री म्हणजे महान कार्य, 

अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा.

 मराठी भाषण वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे 

आमच्या whatsapp ग्रुप मध्ये जॉईन व्हायचे असेल तर 

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !