Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

जागतिक जल दिन मराठी माहिती भाषण निबंध सूत्रसंचालन | jagtik jal din 2021 information speech in marathi

22 मार्च 2021 जागतिक जल दिन मराठी माहिती भाषण निबंध सूत्रसंचालन | jagtik jal din 2021 information speech in marathi | world water day quotes : 

jagtik jal din bhashan in marathi


नमस्कार आज मी तुम्हांला जागतिक जल दिन भाषण | jagtik jal din bhashan in marathi , information quotes kavita यांची थोडक्यात माहिती सांगणार आहे .

प्रस्तावना : 

 आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील  गुरुजनवर्ग, आणि जमलेल्या माझ्या वर्गमित्रांनो..

काय उपयोग तुमच्या पैशांचा, 

आणि सोन्याच्या नाण्याचा, 

जेव्हा नसेल तुमच्याकडे 

एकही थेंब पाण्याचा...

थेंबे थेंबे तळे साचे!

पाणी म्हणजे जीवन आणि या जीवसृष्टीच्या मूलभूत गरजा पैकी एक म्हणजे पाणी. सर्व सजीव शृंखला पाण्या भोवती गुंतलेली आहे, पाणी नाही तर तिचा देखील काही उपयोग होऊ शकत नाही, म्हणून असे पाण्याचे महत्त्व जगाला पटवून देण्यासाठी 22 मार्च हा   दिवस संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक जल दिन म्हणून साजरा करावा असे सांगितले आणि लगेच 22 मार्च 1993 हा पहिला जागतिक जल दिन भारतात साजरा करण्यात आला.  या अनुषंगानं महाराष्ट्र शासनाच्या वतीने 16 ते 22 मार्च दरम्यान जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे .याचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक नागरिकाला शुद्ध पाणी मिळावे ,पाण्याच्या स्रोताचे संरक्षण करणे ,जनप्रबोधन करून जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून देणे , जलयुक्त शिवार अभियान ,विहीर पुनर्भरण तंत्र तसेच पाण्याचा अपव्यय टाळा हा यामागचा उद्देश.

world water day slogan 2021 :

डोळ्यातून पाणी येऊ नये म्हणून 

काळजी घेता तशी काळजी

नळातून पाणी वाया जाऊ नये 

म्हणून घ्या.

  पृथ्वीवर 71 टक्के पाणी असलं तरी पिण्यायोग्य पाणी फारच कमी आहे बहुतांश पाणी समुद्रात आहे जे पिण्या योग्य नाही त्यात अनेक क्षार मिसळले आहेत पिण्या योग्य असणाऱ्या पाण्यातील बहुतांशी पाणी दोन्ही ध्रुव आणि हिमालय आदि पर्वतात गोठलेले आहे, जागतिक हवामानाचा विचार करता ते पाणी वापरणं फारसे योग्य नाही परिणामी उपलब्ध पाण्यापैकी जेमतेम तीन ते चार टक्के पाणी प्रत्यक्षात वापरता येतात आणि मानव पाणी फारच गैर प्रकारे वापर करत आहे,  जर पाणी अश्याच प्रकारे प्रदूषित झालं तर मानवच नव्हे तर समस्त प्राणी सृष्टी धोक्यात येऊ शकते.

जरा विचार करा...

जगातील 80% लोक आजही शुद्ध पाण्यापासून वंचित आहेत.

४ प्राथमिक शाळांमागे एका शाळेत, मुलांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ती मुले अस्वच्छ पाणी पितात किंवा तहानलेली राहतात.

दरवर्षी, पाच वर्षाखालील ७०० मुले, जुलाब-हगवण-डायरिया यासारख्या अशुद्ध पाण्यामुळे होणाऱ्या आजाराने मरतात.

त्यामुळेच आपण पाणी वाचवण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यात माणसांची पाण्याकडे पाहण्याची मानसिकता बदलायला पाहिजे,

💥 होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

world water day quotes : 

काय उपयोग तुमच्या पैशांचा, 

आणि सोन्याच्या नाण्याचा, 

जेव्हा नसेल तुमच्याकडे 

एकही थेंब पाण्याचा...

 पावसाच्या  पाण्याची साठवणूक कशी करता येईल? भूजलाची पातळी कशी थांबवता येईल ? तलावांमधील आक्रमण थांबवून त्यांचं संवर्धन कसं करता येईल ? पाण्याचा पुनर्वापर कसा होईल ? पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल ?पाण्याचा सरकारीकरण कसं थांबवता येईल ? याचे जनप्रबोधन करून जलसाक्षरतेचे महत्त्व पटवून ठेवूया !

 प्रत्येक गोष्टीसाठी पाणी हे लागतात पाण्याचा वापर करणे आपण थांबवू शकत नाही पण पाण्याच्या सुयोग्य वापर यामुळे पाणी पाठवू शकतो उद्याची तहान भागवण्यासाठी.

शेवटी एवढेच म्हणेन ...

आपण पाणी वाचवु शकतो,

 पण बनवू शकत नाही.

आजोबांनी नदीत पाणी पहिले... 

वडिलांनी विहिरीत पहिले...

मी नळात पहिले... 

माझ्या मुलांनी बाटलीत पहिले...

पुढची पिढी कुठं बघेल.... 

हा विचार करा... त्यामुळे

पाणी वाचवा देश वाचवा !


🔰 हे ही वाचा 👉 

⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण

⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण

⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण

⏭️ 28 मार्च - होळी सण मराठी भाषण


भाषण आवडल्यास व्हाट्सएपवर नक्की च शेअर करा 👇


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !