Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

रक्षाबंधन [राखी पौर्णिमा २०२२ ] मराठी निबंध व शुभेच्छा | Happy raksha bandhan marathi quotes wishes sms images brother sister

Happy raksha bandhan marathi quotes wishes sms images brother sister | भाऊ बहिणीला राखी पौर्णिमेच्या [ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा 2022 ] मराठी निबंध माहिती 


नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील बहीण भावाचा एकमेव सण ज्या सणांची बहीण भाऊ आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे रक्षाबंधन त्यालाच राखी पौर्णिमा असे म्हणतात त्याची थोडक्यात मराठी माहिती व शुभेच्छा संदेश तसेच भाऊ बहिणींसाठी छान छान whatsapp massage's वाचणार आहोत ! माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा !


रक्षाबंधन [राखी पौर्णिमा 2022 ] (toc)


रक्षाबंधन [राखी पौर्णिमा ] मराठी माहिती निबंध 2022

रक्षाबंधन हा भारत देशातील अत्यंत लोकप्रिय सण आहे विशेषतः महाराष्ट्रात  रक्षा बंधन  सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला खूप आनंदात व  उत्साहात साजरा केला जात असतो. भारतात वेगवेगळ्या भागात  यास वेगवेगळी नावे आहेत. जसे नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, कजरी पौर्णिमा इ.

रक्षाबंधन कधी आहे 2022?

या वर्षी 2022 ला रक्षाबंधन हा सण 11 ऑगस्ट 2022 रोजी आहे !

रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीचा सण आहे. रक्षा म्हणजे रक्षण तर बंधन म्हणजे धागा. रक्षणाचा बांधलेला पवित्र धागा म्हणजेच रक्षाबंधन होय. रक्षाबंधनाच्या दिवशी आपली लाडकी बहीन आपल्या छोट्या किंवा मोठ्या भावाच्या कपाळावर तिलक कुंकू लावून त्याच्या मनगटावर सुंदर अशी राखी बांधते व  भावाला मनोभावे ओवाळते. आपल्या भावाच्या सुखी, निरोगी, आनंदी , दीर्घायुण्यासाठी प्रार्थना करते भाऊही या दिवशी बहिणीला रक्षण करण्याचे वचन देती. प्रत्येक भाऊ-बहिणीच्या दृष्टीने या सणाला अमूल्य महत्व दिले जाते. राखीपोर्णिमेला बहीण भावाच्या आवडीचे गोड पदार्थ बनवून खाऊ घालते व भाऊही आपल्या बहिणीला छान अशी भेटवस्तू देत असतो !

रक्षाबंधन [राखी पौर्णिमा ] इतिहास मराठी

या सणामागे अशीही कथा आहे की, महाभारत कृष्णाने द्रौपदीला बहीण मानून तिचे सदैव रक्षण केल तर , द्रौपदीनेही शिशुपालाच्या वधावेळी श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झाल्यावर क्षणाचाही विलंब न लावता आपल्या साडीचा तुकडा फाढून तो जखमेवर बांधला.


🎀   रक्षाबंधन ला याच वेळी बांधा राखी !

❤️ हे गिफ्ट कधीही देऊ नये नक्की बघा व्हिडिओ 


➡️https://youtu.be/yJpebftLzfA


〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

रक्षाबंधन [राखी पौर्णिमा ] महत्त्व 

आज बाजारात अनेक प्रकारच्या मनोवेधक राख्या मिळतात. प्रत्येकजण आपआपल्या परीने राख्यांची  खरेदी करतो. इंटरनेटच्या माध्यमातून आज ऑनलाईन राखी पाठवली जाते. आज रक्षाबंधन हा ' सण फक्त भावा-बहिणींपुरताच मर्यादित राहिला नाही तर गुरु-शिष्य, आई-वडील, चुलत भाऊ-बहीण, मानलेला भाऊ. बहीन इ. नात्यामध्येही साजरा केला जात आहे . थोडक्यात आज रक्षाबंधन सणाचा विस्तार इतर नात्यांमध्येही होताना दिसून येत आहे, ही आनंदाचीगोष्ट आहे. रक्षाबंधन ला आता आई-वडिलांना सुद्धा मुली  मुले राखी बांधून त्यांच्य पालन पोषण व रक्षणाची जबाबदारी घेतात. त्यामुळे भविष्यात वृद्धाश्र संख्या कमी होईल. शिष्य गुरुंना राखी बांधून त्यांच्या विचारांच्या रक्षणाची जबाबदारी घेतात झाडे-झुडपे यांना हल्ली राखी बांधली जात, जेणेकरून वृक्षतोड कमी होवून वृक्षप्रेम वाढेल.

आजच्या विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात रक्षाबंधन हा पवित्र सण आपले आगळेवेगळे अस्तित्व राखून आहे. रक्षाबंधन हा सण शील, स्नेह, पवित्रतेचे रक्षण करणारा सण आहे. तो मनापासून प्रत्येकाने जपला तर निश्चितच भविष्यात अत्याचार, बलात्कार, वृद्धाश्रम वाढ, भेदभाव अशा अनेक समस्या कमी होतील.


raksha bandhan quotes in marathi

राखी बांधून हातात,बहिण ओवळे भावाला..भरून साखर तोंडात जीव लावेल भावाला... निराळ्या मायेचा झरा ,कायम असाच भरलेला..वाहत राहो निखळपणे ,शुभेच्छा बहिण-भावाला...!!! राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

raksha bandhan quotes for sister in marathi

थोडी लढणारी थोडी भांडणारी ,थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी,मस्ती करणारी एक बहीण असते !तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते…रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

raksha bandhan quotes for brother in marathi 2022

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे ,भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..राखी शिवाय काही नाही माझ्याकडे ,म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..हीच आहे माझी इच्छा ,भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! बहिणीला राखी पौर्णिमेच्या [रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा] 

ताई तू सासरी गेली ,पण मी तुला विसरलो नाही,तुझ्या आठवणीत रडतो,रक्षाबंधनाची वाट पाहतो…राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

raksha bandhan wishes for brother in marathi

रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा ,वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..दादा तू नेहमी आनंदात रहा,यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा…राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

Happy Rakshabandhan दादा !

दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,नवीन आला विचारांचा वारा.. नाही केले रक्षण माझे तरी चालेल,राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…Happy Rakshabandhan दादा !

ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

ताई खर सांगू का ? मी कधी तुझे रक्षण केले नाही ! तूच माझे रक्षण करत आली,माझ्यावर संकट येऊ नये म्हणून देवाकडे साकडे घालत आली,राखीचे महत्त्व तूच जाणले ,तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !
🆕happy raksha bandhan wishes in marathi

राखी बांधून हातात ,बहिण ओवळे भावाला..भरून साखर तोंडात जीव लावेल भावाला... निराळ्या मायेचा झरा कायम असाच भरलेला..वाहत राहो निखळपणे शुभेच्छा बहिण-भावाला...!! राखी पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

raksha bandhan message in marathi

बंध हा प्रेमाचा, नाव ज्याचे राखी, बांधीते भाऊराया आज तुझ्या हाती,औक्षिते प्रेमाने, उजळुनी दीप ज्योती, रक्षावे मज सदैव, आणि अशीच फुलावी प्रीती, बंध असूनही, बंधन हे थोडेच, या तर हळव्या रेशीम गाठी…

raksha bandhan marathi quotes

एक गोष्ट Commit करायला गर्व वाटतो कि, Girlfriend पेक्षा माझ्या Sister..मला जास्त जीव लावतात… रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताईला !


सणाचे नाव रक्षा बंधन ( राखी पौर्णिमा 2021 )
रक्षा बंधन 2022 date कधी आहे (तारिख) रक्षा बंधन 11ऑगस्ट 2022 तारखेला आहे
नारळी पौर्णिमा कधी आहे 2022 नारळी पौर्णिमा 11 ऑगस्ट 2022 तारखेला आहे
रक्षाबंधन काय आहे ? रक्षा बंधन हिंदू धर्मातील बहीण भावाचा एक सण आहे.
टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !