आंतरराष्ट्रीय जागतिक साक्षरता दिवसाची मराठी माहिती भाषण निबंध घोषवाक्य कविता इतिहास व थीम 2021 | jagtik saksharta din mahiti marathi 2021 | world international literacy day marathi eassy theme speech
नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच असेल की आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी 8 सप्टेंबरला संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात असतो. जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्याची सुरुवात 1966 साली झाली, जेव्हा युनेस्कोने दरवर्षी 8 सप्टेंबर रोजी 'जागतिक साक्षरता दिवस' साजरा करण्याचे ठरवले जेणेकरून लोकांमध्ये शिक्षणाविषयी जागरूकता वाढेल आणि जगभरातील लोकांचे लक्ष वेधले जाईल.
जागतिक साक्षरता दिन माहिती मराठी (toc)
आंतरराष्ट्रीय जागतिक साक्षरता दिवसाची थीम 2021 कोणती आहे?
संपूर्ण जगभरात मागीलवर्षी पासून कोरोना महामारी पसरली असल्याने, यावेळी सुध्दा कोरोना संदर्भात च 2021 ची थीम आहे, या वर्षी 2021 ला आंतरराष्ट्रीय जागतिक साक्षरता दिवसाची थीम ही "Literacy for a human-centred recovery: Narrowing the digital divide" ( साक्षरता दिन थीम 2021 "मानवी-केंद्रित पुनर्प्राप्तीसाठी साक्षरता: डिजिटल विभाजन संकुचित करणे" आहे.).
पहिला आंतरराष्ट्रीय / जागतिक साक्षरता दिवस कोणी व कोठे सुरू केला (इतिहास )?
जरी साक्षरता दिन साजरा करण्याची घोषणा 26 ऑक्टोबर 1966 रोजी करण्यात आली होती, परंतु त्याची कल्पना सर्वप्रथम इराणच्या तेहरान येथे झालेल्या शिक्षण मंत्र्यांच्या जागतिक परिषदेच्या वेळी आली. ही परिषद 1965 साली आयोजित करण्यात आली होती, ज्यात निरक्षरता संपवण्यासाठी जगभरात जागरूकता मोहीम चालवण्यावर चर्चा झाली.
🆕 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस का साजरा केला जातो?
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्याचे मुख्य उद्दीष्ट वैयक्तिक, सामुदायिक आणि सामाजिकदृष्ट्या साक्षरतेचे महत्त्व लोकांना पटवून देणे व या दिवसाद्वारे, जगभरातील लोकांना शिक्षणाबद्दल जणजागरूक केले जाते, जेणेकरून ते त्यांचे भविष्य चांगले बनवू शकतील. तसेच मानवी विकास आणि समाजासाठी त्यांचे हक्क जाणून घेण्यासाठी आणि त्यांना साक्षरतेकडे वळवण्यासाठी आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा केला जातो. भारत किंवा देश-जगातील दारिद्र्य निर्मूलन करणे, बालमृत्यू कमी करणे, लोकसंख्या वाढ नियंत्रित करणे, लिंग समानता साध्य करणे इत्यादी वाढणे खूप महत्वाचे आहे. निरंतर शिक्षण प्राप्त करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कुटुंब, समाज आणि देशाप्रती त्यांची जबाबदारी समजून घेण्यासाठी साक्षरता दिवस साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय समुदायासाठी प्रौढ शिक्षण आणि साक्षरतेच्या दराकडे लक्ष वेधण्यासाठी हा दिवस खास साजरा केला जातो.
जागतिक आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवसाचा उद्देश
साक्षरता दिवस शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो,साक्षरता हा मानवी हक्क आहे. हे केवळ वैयक्तिक सक्षमीकरणाचे साधन नाही तर मानवी आणि सामाजिक विकासाचे एक प्रमुख साधन आहे. दारिद्र्य निर्मूलन, लोकसंख्या वाढ थांबवणे, बालमृत्यू कमी करणे, लैंगिक समानता प्राप्त करणे तसेच विकास, शांतता आणि लोकशाही राखण्यासाठी साक्षरता महत्वाची भूमिका बजावते.
🆕 हरतालिका आरती मराठी lyrics pdf
साक्षरतेच्या बाबतीत भारताचा कितवा नंबर आहे?
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या (NSO) आकडेवारीवर आधारित अहवालानुसार, भारतातील साक्षरता दर 77.7 टक्के आहे. जर आपण देशातील ग्रामीण भागाबद्दल सांगायचे झाल्यास तेथील साक्षरता दर 73.5 टक्के आहे तर शहरी भागात हा आकडा 87.7 टक्के आहे.
भारतातील कोणते राज्य सर्वात जास्त साक्षर आहे?
साक्षरतेच्या बाबतीत देशातील अव्वल राज्य केरळ आहे, जिथे 96.2 टक्के लोक साक्षर आहेत. आणि आंध्र प्रदेश या बाबतीत सर्वात कमी क्रमांकावर आहे. तेथील साक्षरता दर फक्त 66.4 टक्के आहे.
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस कसा साजरा केला जातो?
या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये लेखन, व्याख्यान, भाषण, कविता, क्रीडा, निबंध, चित्रकला, गाणे, गोलमेज चर्चा, चर्चासत्र असे कार्यक्रम आयोजित केले जातात. 'आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन' रोजी शिक्षक भाषण देतात. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाशी संबंधित समस्यांवर टीव्हीवर कार्यक्रम दाखवले जातात, या दिवशी अशा संस्थांना पुरस्कृत केले जाते जे देश आणि जगातील लोकांना शिक्षित करण्यासाठी कार्यरत आहेत.
जागतिक आंतरराष्ट्रीय साक्षरता घोषवाक्य मराठी 2021 [ world international literacy day slogan quotes wishes in marathi ]
1. सुख समृद्धीचा झरा; शिक्षण हाच मार्ग खरा.
2. पाठशाला असावी सुंदर; जेथे मुले मुली होती साक्षर.
3. मुलगा मुलगी एक समान; द्यावे त्यांना शिक्षण छान.
4. जबाबदार पालकाचे लक्षण; मुलांचे उत्तम शिक्षण.
5. शिक्षणाने मनुष्य साक्षर होतो व अनुभवाने तो
शहाणा होतो.
6. एकाने एकास शिकवावे.
7. जो राहे निरक्षर, तो फसे निरंतर.
8. साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा.
9. गिरवू अक्षर, होऊ साक्षर.
10. शिक्षणात काट कसर नको. काटकसरीचे शिक्षण
मात्र हवे.
International literacy day quotes wishes slogans in marathi
11. स्वाभिमान जागृत करून सन्मानाने जगवत ते
शिक्षण.
12. मनुष्याच्या सहनशक्तीचा आविष्कार म्हणजे खरे
शिक्षण.
13. विद्येने नम्रता आणि नम्रतेने विद्या शोभून दिसते.
14. विद्येविना मनुष्य पशू आहे.
15. ज्यामुळे स्वाभिमान जागृत होतो ते खरे
शिक्षण होय.
16. विद्या ही संकटकाळी साथ देणारे शस्त्र आहे.
17. एक एक अक्षर शिकूया - ज्ञानाचा डोंगर चढूया .
18. वाचाल तर वाचाल.
19. साक्षरतेचा एकच मंत्र- शिक्षण देणे हेच तंत्र.
20. देणं समाजाचं फेडावं - काम शिक्षणाच करावं.
saksharta din slogan in marathi
21. साक्षरतेचा एकच संदेश - अज्ञान संपून सुखी
होईल देश.
22. एकाने शिकवूया एकाला; साक्षर करूया जनतेला.
23. देशाचा होईल विकास; घेवूनी साक्षरतेचा घ्यास.
24. होईल साक्षर जन सारा; हाच आमचा पहिला नारा.
25. ज्योतीने ज्योत पेटवा; साक्षरतेची मशाल जगवा.
26. आधी विद्यादान; मग कन्यादान.
27. राहू आपण एकोप्याने; देश घडवू शिक्षणाने.
28. माता होईल शिक्षित; तर कुटुंब राहील सुरक्षित.
29. नर असो व नारी; चढा शिक्षणाची पायरी.
30. अक्षर कळे संकट टळे.
दिनाचे नाव | आंतरराष्ट्रीय जागतिक साक्षरता दिन 2021 |
---|---|
जागतिक साक्षरता दिन कधी असतो? | जागतिक साक्षरता दिन 8 सप्टेंबर ला दर वर्षी साजरा केला जातो |
जागतिक साक्षरता दिन थीम 2021 कोणती आहे | Literacy for a human-centred recovery: Narrowing the digital divide |
पहिला जागतिक साक्षरता दिन कोणी व कधी साजरा केला | पहिला जागतिक साक्षरता दिवससर्वप्रथम इराणच्या तेहरान येथे 1966 मध्ये साजरा करण्यात आला |