Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

शिक्षक दिन मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळी शायरी | Happy Teacher day speech bhashan 2021

शिक्षक दिन मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन चारोळी शायरी | 5 september Happy Teacher day speech bhashan essay nibandh marathi 2021 pdf #ThankATeacher


नमस्कार विद्यार्थी व शिक्षक मित्रांनो आज 5 सप्टेंबर शिक्षक दिवस 2021 ची मराठी माहिती निबंध व चारोळी थोडक्यात सांगणार आहे याचा उपयोग तुम्ही मराठी हिंदी इंग्रजी भाषण किंवा निबंध मध्ये करू शकता तसेच #ThankATeacher या उपक्रमात सहभागी होण्यासाठी तसेच शिक्षक दिनासाठी सूत्रसंचालन करते वेळेस सुद्धा तुम्हांला नक्कीच उपयोग होईल !

शिक्षक दिन 2021 माहिती (toc)


शिक्षक दिन भाषणाची सुरवात प्रस्ताविक - 


 गुरुर्ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ।।

दिगगजांच्या कलागुणांनी नटलेल्या अन् कृतज्ञतेच्या भावनांनी बहरलेल्या या संस्कारपीठावर विराजमान असलेल्या सर्वच उपस्थितांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो...

विद्यार्थ्यांना ज्ञानाची नवी दृष्टी देऊ समाजाला योग्य दिशा देणा-या माझ्या तमाम गुरुजनांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रणाम. कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, 'गुरुजनंवर्ग व माझ्या बालमित्रांनो. आज ५ सप्टेंबर म्हणजेच 'शिक्षकदिन' शिक्षकांचा त्यांच्या कार्याबद्दल गुणगौरव करण्याचा दिवस.

[शिक्षक दिन चारोळी 1]

गुरूबद्दल सांगायचे झाल्यास...

जो द्रव्य वाढवितो 
तो काळजी वाढवतो, 
परंतु जो विद्या वाढवितो,
तो मान वाढवतो. 
हे कार्य फक्त शिक्षकच करतो.

स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती व राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शिक्षकदिन हा दिवस सर्व देशामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

1962 साली ते राष्ट्रपतीपदावर विराजन झाले होते. तेव्हा काही शिष्य आणि प्रशंसकांनी त्यांना त्यांचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याची परवानगी मागितली. माझा जन्मदिवस शिक्षक दिनाच्या रुपात साजरा करणं माझ्यासाठी गौरवास्पद आहे असं त्यावेळी राधाकृष्ण यांनी सांगितलं.

शिक्षक दिनाच्या दिवशी देशाचे राष्ट्रपती, राज्याच राज्यपाल ते गावातील मान्यवर मंडळी मोठ्या उत्साहाने शिक्षकांचा गुणगौरव करत असतात.

शिक्षक दिन' म्हणजे चिंतनाचा दिन होय. शिक्षका हा शब्द जरी तीन अक्षरांचा असला तरी या तीन अक्षरी शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. शि' म्हणजे शिल. 'क्ष' म्हणजे क्षमा आणि 'क' म्हणजे कला ज्याच्याकडे शिल, क्षमा, कला यांचा त्रिवेणी संगम आहे तोच खरा शिक्षक होय. शिक्षक म्हणजे लाखो विद्यार्थाचे भवितव्य घडविणारा खरा शिल्पकार आहे.



☣️ शिक्षक दिन चारोळी 2

थोडक्यात माझ्या शिक्षकांसाठी दोन ओळी
“प्रेमाचे शब्द, स्नेहाचा स्पर्श,
आपुलकीची नजर, कौतुकाची थाप,
सदैव मदतीचा हात, असे आहेत आमचे गुरुजी खास.

भारतीय परंपरेमध्ये प्राचीन काळापास शिक्षकांना खूप मोलाचे व आदराचे स्थान आहे.  परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. आज समाज बदलतो आहे. या बदलत्या सामाजिक परस्थितिला सामोरे जात असताना शिक्षण पद्धतीही बदलत आहे आणि शिक्षकांची भूमिकाही बदलत आहे. शिक्षकांनी शिकवायचे आणि विद्यार्थ्यांनी ऐकायचे ही शिक्षण पद्धत कालबाह्य होत आहे.

विद्यार्थ्यांना शिकवण्या ऐवजी शिकण्यासाठी प्रवृत्त करून पोषक वातावरण निर्माण करणे व योग्य वेळी त्याला साहाय्य करणे अशी नवीन भूमिका शिक्षकांनी घेणे गरजेचे आहे. त्यामुळेच शिक्षकांचे आपल्या कार्यातील स्थान बदलत आहे.

जीवनात येणा-या आव्हानांना समर्थपने तोंड देण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा विकास होणे गरजेचे आहे.


शिक्षक दिन शायरी - चारोळी साठी येथे क्लिक करा




हिंदीमध्ये एक सुविचार आहे 'फटे हुए दूध को देखकर वही आदमी 'निराश होता है; जो फटे हुए दूध॑से पनीर बनाना नही जानता.

आपल्या वर्गामध्ये विविध बुद्धिमत्तेची, वेगवेगळ्या आवडी निवडीची व विविध सुप्तगुण असणारी मुले असतात. केवळ लिहिता वाचता येणे म्हणजे शिक्षण नव्हे. तो एक शिक्षण प्रक्रियेचा भाग आहे.

विद्यार्थ्यांमधील कला गुणांना वाव देख त्यांचे सुप्त गुण ओळखून त्या सुप्त गुणांच उपजत शक्तींचा विकास करून त्याला. समर्थपणे जीवन जगण्यास प्रवृत्त करणारे शिक्षकच श्रेष्ठ ठरत असतात:

आज विविध क्षेत्रातील ज्ञानाचा प्रस्फोट झालेला आहे. क्रीडा, संगीत, कला, कौशल्प विकास अशा विविध क्षेत्रात अनेक शिक्षक आपले योगदान देऊन सकस समाज निर्मितीत

आपला मोलाचा सहभाग नोंदवत आहेत. अशा कर्तृत्ववान शिक्षकांचा आपण सन्मान करायला हवा, त्यांच्या चरणी लीन व्हयला हवे.


🆕 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी येथे क्लिक करा


शिक्षक दिन समारोप

शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन
गुरू घेऊनि माझा भार ! 
शिकविती पोटतिडिकीने फार !! 
आयुष्याच्या वळणावर आज ! 
गवसला मज बोधवृक्षाचा पार !!

शिक्षण प्रक्रियेत कार्य करत असताना विद्यार्थ्यांत राष्ट्रभक्ती, समाजसेवाभाव निर्माण करून त्यांच्या सर्वांगीण विकासास हातभार लावून त्यांचे जीवन उजळून टाकणा-या गुरु जनाच्या चरणी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन.  जय हिंद !

शिक्षक दिन शायरी - चारोळी साठी येथे क्लिक करा

🔯 शिक्षक दिन मराठी सूत्रसंचालन. pdf

🔜.  Download 

⚜ शिक्षक दिन हिंदी सूत्रसंचालन. pdf


✳ शिक्षक दिन इंग्रजी सूत्रसंचालन. pdf


❇ शिक्षक दिन सूत्रसंचालन चारोळी. pdf




⚛ शिक्षक दिन मराठी भाषण .pdf







☸ शिक्षक दिन हिंदी भाषण.pdf





⚛ शिक्षक दिन इंग्रजी भाषण. pdf








🔯 शिक्षक दिन कविता. pdf




🔯 शिक्षक दिन नारे घोषणा.pdf




☸ शिक्षक दिन भाषण अप्रतिम विडिओ



🆕. शिक्षक दिन फलक लेखन 

  फलक लेखन pdf डाउनलोड करा


आमची शिक्षक दिवसाची मराठी माहिती भाषण निबंध सूत्रसंचालन Teacher day information speech bhashan essay nibandh marathi 2021 pdf
कसे वाटली तुम्हांला माहिती आवडल्यास नक्की शेअर करा !


दिनाचे नाव शिक्षक दिन 2021
शिक्षक दिन कधी साजरा करतात? दर वर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा केला जातो.
शिक्षक दिवस का साजरा केला जातो ? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून साजरा केला जातो
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते? डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती व दुसरे राष्ट्रपती होते.

🔶 हे पण वाचा >

🆕 सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त मराठी भाषण निबंध

🆕 राष्ट्रीय शिक्षण दिन मराठी माहिती

🆕 बैल पोळा सण मराठी निबंध व्हाट्सअप्प शुभेच्छा संदेश

🆕  TET च्या 50 सराव प्रश्नपत्रिका संच

🆕. TET Syllabus marathi 2021

शिक्षक दिन शायरी - चारोळी साठी येथे क्लिक करा




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !