Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

सरदार वल्लभभाई पटेल मराठी निबंध भाषण | sardar vallabhbhai patel marathi nibandh bhashan

सरदार वल्लभभाई पटेल मराठी निबंध भाषण व सूत्रसंचालन चारोळी | sardar vallabhbhai patel marathi mahiti 2021


नमस्कार विद्यार्थी व शिक्षक बंधुंनो आज आपण sardar vallabhbhai patel information in marathi ज्याचा उपयोग निबंध व भाषण साठी नक्कीच होईल.


सरदार वल्लभभाई पटेल भाषण व शुभेच्छा (toc)


सरदार वल्लभभाई पटेल जयंती 2021 मराठी निबंध भाषण


भारतीय एकता व अखंडतेचे प्रतीक आधुनिक भारताचे निर्माते महान क्रांतिकारक ,एक राजनेता थोर स्वतंत्र सेनानी व भारताचे पहिले उपपंतप्रधान राष्ट्रीय ऐक्याचा महामेरू ज्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ  आज स्टॅच्यू ऑफ युनिटी  हा जगातील उंच पुतळा उभारला आहे असे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम!

   आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजनवर्ग माझ्या बालवीरांनो ...ज्या प्रमाणे दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवान श्रीकृष्णानी बंदिवासात असलेल्या वासुदेव आणि देवकीच्या पोटी जन्म घेऊन दुष्टांचा नाश केला व  बंदीखान्यात असलेल्या आपल्या माता-पित्यांची सुटका केली. त्याचप्रकारे दृष्ट ब्रिटिशांच्या तावडीतून व गुलामगिरीच्या साखळदंडांनी बांधलेल्या भारत मातेला ब्रिटिशांच्या  बंदिवासातून सुटका करण्यासाठी अनेक तेजस्वी पुत्रांनी जन्म घेतला व  भारतमातेची बंदिवासातून सुटका करण्यासाठी त्यांनी प्राण पणाला लावले आणि तिची दास्यातून सुटका केली अशाच एका तेजस्वी पुत्राचे नाव 'सरदार वल्लभभाई पटेल' भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, स्वातंत्र्याचे संरक्षण, संवर्धन करण्यासाठी ज्यांनी आपले जीवन खर्ची घातले .

देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी ते तन-मन आणि धनाने झिजले. बार्डोलीचे सरदार वल्लभभाई आपल्या कार्यकर्तृत्वाने 'भारताचे पोलादी पुरुष' बनले.

अशा या तेजस्वी पुरुषाचा जन्म गुजरातमधील करमसद या खेडेगावी ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी एका शेतकरी कुटुंबातील लेवा पटेल समाजामध्ये त्यांच्या मामांच्या नडियाद (गुजरात) येथील घरी झाला. त्यांचे पूर्ण नाव वल्लभभाई झवेरभाई पटेल असे होते. त्यांचे वडील झवेरभाई हे खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. वल्लभभाई पटेल यांच्या आईचे नाव लाउबा होते .वल्लभ भाई पटेल हे झवेरभाई व लाडबा यांचे चौधे पुत्र होते. सोमाभाई, नसिंहभाई व विठ्ठलभाई ही वल्लभभाईची मोठी भावंडे होती तसेच काशीभाई नावाचा धाकटा भाऊ व दहीबा नावाची धाकटी बहीण होती.



🆕वल्लभभाई पटेल यांचा विवाह वयाच्या १८ व्या वर्षी जवळच्या गावातील १२-१३ वर्षांच्या झवेरबा यांच्यासोबत झाला वल्लभभाई पटेल हे मॅट्रीकची परीक्षा वयाच्या २२ व्या वर्षी उत्तीर्ण झाले. त्यांनी पुढील शिक्षण घेत असताना इतरांकडे पुस्तके मागून आणि कुटुंबापासून दूर राहून वकीलीची परीक्षा पास झाले. वल्लभभाई व झवेरबा यांना १९०४ मध्ये मणीबेन आणि १९०६ मध्ये डाह्याभाई अशी दोन अपत्ये झाली. वल्लभभाई पटेल हे पेशाने वकील होते. वकीली करत असताना ते महात्मा गांधीजींच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद व बारडोली गावच्या खेडूतांना संघटित करून त्यांनी ब्रिटीश अत्याचारा विरुद्ध सत्याग्रह केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली. वल्लभभाई पटेल हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक महत्वाचे नेते होते. 'भारत छोडो' आंदोलनात ते आघाडी वर होते.

सरदार वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. त्यांनी पाकिस्तानातून आ लेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतिस्थापने करिताही त्यांनी कार्य केले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी हिंदुस्थाना तील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानाचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुत्स दोगरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच त्यांच्या या कार्याबद्दल ते भारताचे लोहपुरूष म्हणूनच ओळखले जातात. 



🆕सरदार वल्लभभाई पटेल हे एक भारतीय राजकीय व सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंधीकरणात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे महान कार्य व योगदानाबद्दल त्यांना भारतीय महिलांनी 'सरदार' या पदवीने सन्मानित केले. सरदार वल्लभभाई पटेल यांना 'सरदार' व भारताचे 'लोहपुरुष' म्हणून आजही ओळखले जाते. अशा या थोर अशा महापुरुषाचे १५ डिसेंबर १९५० रोजी निधन झाले.

शेवटी जाता जाता एवढेच म्हणेन ...

भारताला तोडण्या साठी 

इंग्रज, निजाम आणि जिन्न रडला होता ..

कारण माझा एकटा राजा लोहपुरुष 

सरदार पटेल नडला होता..!


धन्यवाद जयहिंद जय महाराष्ट्र ! 🍂



sardar vallabhbhai patel quotes wishes in marathi  सरदार वल्लभभाई पटेल जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी व्हाट्सअप्प स्टेटस


भारताला तोडण्या साठी इंग्रज, निजाम आणि जिन्न रडला होता... कारण माझा एकटा राजा लोहपुरुष सरदार पटेल नडला होता...!


🍂सरदार वल्लभभाई पटेल जयंतीच्या व राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 


स्वतंत्र्य भारताच्या एकसंघतेसाठी महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली आणि त्यांच्या स्मृतीप्रित्यार्थ आज 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पूर्णाकृती पुतळा उभारला आहे असे लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल व यांस जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! राष्ट्रीय एकता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !



🔅 सरदार वल्लभभाई पटेल जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी


सरदार वल्लभभाई पटेल भारत राचे लोहपुरुष महान क्रांतिकारी व एक राजनेता थोर स्वतंत्र सेनानी अश्या धूर व्यक्तिमत्वाच्या देशभक्ताच्या जयंती निमित्त त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन


भारताचे पहिले उपपंतप्रधान राष्ट्रीय ऐक्याचा महामेरू लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम!



🔶 हे पण वाचा >

🆕 राष्ट्रीय शिक्षण दिन मराठी माहिती
🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf
🆕  NAS च्या 100 सराव प्रश्नपत्रिका pdf
🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !
🆕  जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021
🆕  आकारिक मूल्यमापन चाचणी 1 प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf
🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf
🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा
🆕 सेतू अभ्यासक्रम pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf
🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf


FAQ-

Q.सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरूष का म्हणतात?

Ans- सरदार वल्लभभाई पटेल यांनी हिंदुस्थाना तील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानाचे भारतात विलिनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. सरदार वल्लभभाई पटेल यांनी मुत्स दोगरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून संस्थाने भारतात विलीन केली. म्हणूनच त्यांच्या या कार्याबद्दल ते भारताचे लोहपुरूष म्हणूनच ओळखले जातात

Q.सरदार वल्लभभाई पटेल यांना सरदार ही पदवी कोणी दिली ?

Ans - सरदार वल्लभभाई पटेल हे एक भारतीय राजकीय व सामाजिक कार्यकर्ते होते त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंधीकरणात त्यांनी मोठे योगदान दिले. त्यांचे महान कार्य व योगदानाबद्दल त्यांना भारतीय महिलांनी 'सरदार' या पदवीने सन्मानित केले. 

Q.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म व मृत्यू कधी झाला ?

Ans.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोबर १८७५ रोजी व मृत्यू १५ डिसेंबर १९५० रोजी झाला.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !