राष्ट्रीय शिक्षण दिन मराठी माहिती निबंध भाषण घोषणा स्लोगन| Rashtriya shikshan din 2022 marathi mahiti nibandh Bhashan |मौलाना आझाद यांची माहिती मराठी
नमस्कार मित्रांनो आज आपण मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणारा राष्ट्रीय शिक्षण दिन 2022 याविषयी मराठी माहिती थीम कोणती या विषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत याचा उपयोग करून आपण छान सा आणि छोट्या शब्दात निबंध ही येऊ शकत व भाषण नाही करू शकता . सर्वांना प्रिय शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
राष्ट्रीय शिक्षण दिन 2022 का साजरा केला जातो ?राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा करतात ?
मौलाना अबुल कलाम आझाद हे स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. 1947 ते 1958 पर्यंत ते भारताचे शिक्षण मंत्री होते. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला, ज्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो.
भारताच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाने सप्टेंबर 2008 मध्ये मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. स्वातंत्र्यानंतर देशाच्या नेत्यांनी शिक्षणाला राष्ट्र उभारणीसाठी महत्त्वाचे बनविण्यासाठी आपले लक्ष शिक्षणाकडे केंद्रित केले. विशेषत: अबुल कलाम यांनी हे उद्दिष्ट साध्य करण्यात प्रमुख भूमिका बजावली.
🎯 शिक्षक दिन मराठी भाषा निबंध सूत्रसंचालन
मौलाना अबुल कलाम आझाद मराठी माहिती कोण होते?
स्वातंत्र्यसैनिक, विद्वान आणि प्रख्यात शिक्षणतज्ञ आणि स्वतंत्र भारताच्या प्रमुख शिल्पकारांपैकी एक होते. सण 1947 ते 1958 पर्यंत देशाचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री होते . त्यांचे खरे नाव अबुल कलाम गुलाम मोहिउद्दीन होते मक्का, हेजझ विलायत, ऑट्टोमन साम्राज्य (आताचे सौदी अरेबिया) त्यांच्या पत्नीचे नाव झुलायका बेगम होते, मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या कार्यकाळात 1951 मध्ये देशातील पहिली भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) आणि 1953 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) ची स्थापना झाली. एआयसीटीईसारख्या संस्था स्थापन करण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
मौलाना आझाद व शिक्षणावर विश्वास
मौलाना आझाद यांनी दर्जेदार शिक्षणावर भर दिला. त्यांचा विश्वास होता की शाळा ही प्रयोगशाळा आहेत जिथे देशाचे भावी नागरिक तयार केले जातात. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण, मुलींचे शिक्षण, १४ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण आणि तांत्रिक शिक्षण यांचा त्यांनी जोरदार पुरस्कार केला.
मौलाना आझाद शैक्षणिक योगदान
क्रांतिकारकांच्या भरतीला चालना देण्याच्या उद्देशाने त्यांनी 1912 मध्ये अल हिलाल हे उर्दू मासिक सुरू केले. मौलाना अबुल कलाम यांनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाचा अभ्यास करून त्यावर 'तर्जुमानुल कुरान' हे पुस्तक लिहिले आहे. 1992 मध्ये त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगीत नाटक अकादमी, ललित कला अकादमी, साहित्य अकादमी तसेच इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन यासारख्या आज देशातील बहुतेक सांस्कृतिक आणि साहित्यिक अकादमी आझाद यांनी स्थापन केल्या आहेत. त्यांच्या कार्यकाळात प्रथम IITs, IISc, स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली.
राष्ट्रीय शिक्षण दिनाचे महत्त्व
राष्ट्रीय शिक्षण दिनी, देशवासियांनी राष्ट्र उभारणीत मौलाना आझाद यांच्या योगदानाचे स्मरण केले. स्वतंत्र भारतात शिक्षण व्यवस्थेचा पाया रचण्यात अबुल कलाम यांच्या योगदानाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी शाळांमध्ये विविध मनोरंजक आणि माहितीपूर्ण चर्चासत्रे, परिसंवाद, निबंध लेखन इत्यादी आयोजित करून साजरा केला जातो. विद्यार्थी आणि शिक्षक साक्षरतेचे महत्त्व आणि शिक्षणाच्या सर्व पैलूंवर चर्चा करतात.
राष्ट्रीय शिक्षण दिन कसा साजरा केला जातो ?
11 नोव्हेंबर रोजी देशभरातील शाळा आणि विद्यापीठांमध्ये निबंध लेखन, वादविवाद आणि इतर स्पर्धा घेऊन साजरा केला जातो.
दिनाचे नाव | राष्ट्रीय शिक्षण दिन 2021 |
---|---|
राष्ट्रीय शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो | जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला, ज्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. |
राष्ट्रीय शिक्षण दिन का साजरा केला जातो | जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी झाला, ज्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 11 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय शिक्षण दिन साजरा केला जातो. |
मौलाना कलाम कोण होते | सण 1947 ते 1958 पर्यंत देशाचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री होते . |
मौलाना आझाद यांनी कोणता ग्रंथ लिहिला | मौलाना अबुल कलाम यांनी इस्लामचा पवित्र धर्मग्रंथ कुराणाचा अभ्यास करून त्यावर 'तर्जुमानुल कुरान' हे पुस्तक लिहिले आहे. |
राष्ट्रीय शिक्षण दिन कसा साजरा केला जातो | 11 नोव्हेंबर रोजी देशभरातील शाळा आणि विद्यापीठांमध्ये निबंध लेखन, वादविवाद आणि इतर स्पर्धा घेऊन साजरा केला जातो. |
मौलाना आझाद यांचा मृत्यू कधी झाला | २३ फेब्रुवारी १९५८ |
☸️ हे पण वाचा
🆕 शिक्षक दिन भाषण व शुभेच्छा संदेश