Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

इ १० वी १२ वीच्या परीक्षा शुल्क फिस परत मिळवण्याच्या स्टेप्स | 10th 12th fees refund 2021

इ 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सर्व परीक्षा फिस परत| 10th 12th fees refund 2021 | https://feerefund.mh-ssc.ac.in


 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत सन २०२१ मधील इ. १० वी व इ. १२ वी च्या मुख्य परीक्षा शासन निर्णयानुसार (कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली. तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मंडळाने सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) चे परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या रकमेचा परवावा अंशतः करण्यात येत आहे.

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचकडे दाखल जनहित याचिका क. ३९/२०२१ या याचिकेवरील दिनांक २९/०७/२०२१ रोजीचे निर्णयानुसार मा. अध्यक्ष राज्यमंडळ पुणे यांनी सन २०२१ मधील माध्यमिक शालान्त परीक्षा (इ.१०वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा १२वी) या परीक्षेकरिता नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे १० वी साठी रु ५९ व १२ वी साठी रु ९४ परीक्षा शुल्काची रक्कम परत करण्याबाबतचा निर्णय घेतलेला आहे.


परीक्षा फिस परत मिळवण्याचा ऑफिशियल परिपत्रक डाउनलोड करा


Download




यासाठी माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विद्यार्थ्याचा तपशील दिनांक १२/११/२०२९ रोजी ११.०० पासून मंडळाचे 

१) १० वी १२ वी साठी फिस परत मिळण्यासाठी

mahahsscboard.in 

२) १० वी साठी परीक्षा शुल्क परत मिळवण्यासाठी

  https://feerefund.mh-ssc.ac.in 

३) 12 वी साठी परीक्षा शुल्क परत मिळवण्यासाठी

https://feerefund.mh-hsc.ac.in 

या संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदवणे आवश्यक आहे.

सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी यावी.


🔰 दहावी-बारावीचे परीक्षा शुल्क परत मिळवण्यासाठी शाळांनी करावयाच्या पायऱ्या

  1. प्रथम दहावी किंवा बारावीच्या वर दिलेल्या लिंक वर क्लिक करून लॉगिन करायचे आहे . लॉगिन साठी आपल्याला जो आयडी आणि पासवर्ड परीक्षा फॉर्म भरते वेळेस दिलेला आहे त्याच लॉगीन आयडी आणि पासवर्डने लॉगिन करायचे आहे
  2. मुख्याध्यापक प्रिन्सिपल यांचे नाव मोबाईल क्रमांक व ई-मेल ऍड्रेस तसेच शाळेचा अकाऊंट नंबर व इतर माहिती भरायची आहे व मुख्याध्यापक यांच्या सही चा फोटो अपलोड करायचा आहे,
  3. नंतर आपल्याला दहावी किंवा बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची यादी समोर दिसेल, ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा फीस परत मिळवायची आहे त्यावर क्लिक करायचे आहे
  4. नंतर सबमिट बटन वर क्लिक करायचे आहे
  5.   त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची यादी व मुख्याध्यापकाचे प्रतिज्ञापत्र अशी पीडीएफ तयार होऊन ते डाऊनलोड करायची आहे
  6. अशाप्रकारे सदरील पीडीएफ आपण जपून ठेवायची आहे भविष्यात ती दहावी किंवा बोर्ड बारावीचा बोर्ड मध्ये सबमिट करू शकता.

परीक्षा शुल्क परत मिळवण्यासाठी अधिक माहिती साठी youtube वरील व्हिडिओ बघू शकता


सदर व्हिडियो हा जुनाच आहे परंतु परीक्षा फीस मिळण्याची सर्व स्टेप्स सारख्याच असून याचा नक्की तुम्हाला फायदा होईल





☸️ हे पण वाचा

🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  NAS च्या 100 सराव प्रश्नपत्रिका pdf

🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !

🆕  जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021

🆕  आकारिक मूल्यमापन चाचणी 1 प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf

🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा

🆕 सेतू अभ्यासक्रम pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf

🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !