Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

दत्त जयंतीचा पाळणा मराठी २०२२ | dattacha palana lyrics in marathi Pdf 2022

दत्त जयंतीचा पाळणा मराठी २०२२| dattacha palana lyrics in marathi Pdf 2022


भगवान श्री दत्तात्रेयजींची जयंती दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरी' केली जाते. यावर्षी श्री दत्तात्रेय जयंती 7 डिसेंबर 2022 रोजी बुधवारी आहे. महाराष्ट्रात दत्त जयंती मोठ्या उत्साहाने  साजरी केली जाते. भगवान दत्तात्रेय हे समधर्मी देवता आहेत आणि त्यांना त्रिमू म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अवतार मानले जाते.

दत्त जयंतीच्या दिवशी महत्त्वाचा असतो तो दत्त जयंतीचा पाळणा व आज आपण या लेखांमध्ये दत्त जयंतीचा पाळणा मराठी मध्ये घेऊन आलो आहोत या पाळण्याच्या आधारे आपण दत्त जयंतीच्या दिवशी श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय यांचा पाळणा म्हणून जन्मोत्सव साजरा करू शकता तसेच पाळणा म्हटल्यानंतर श्री दत्तांची आरती सुद्धा आपल्याला म्हणावी लागते त्यासाठी आरती सुद्धा आम्ही लेखांमध्ये उपलब्ध केलेली आहे. चला तर दत्त जयंतीच्या पाळणा मराठी मध्ये लिहिलेल्या स्वरूपात बघूया. तुम्हा सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🌺 दत्तजयंतीसाठी दत्तजन्म दत्ताचा पाळणा मराठी dattacha palana lyrics in marathi Pdf

dattacha palana lyrics in marathi Pdf 2022🌺 श्री दत्तजन्माचा पाळणा 🌺

जो जो जो जो रे श्रीदत्ता बाळा निज निज आता ॥धृ॥

 पीठापुरवासी द्विजपत्नी । पतिव्रता गुणखाणी । 

भिक्षेलागी तू मध्यान्ही । येसी तिच्या सदनी । 

भिक्षा तुज घाली ती रमणी । करिसी तिजला जननी । 

प्रेमें तुज निजवी ती सुमना । श्रीपादा गुरुनाथा ।। जो ।। १ ।।

अंबानामक ती विप्रसती । पुत्र तिचा मंदमती । 

जनापवादे ती खिन्न अति । प्राण त्यजाया सजती । 

पाहूनी निजचित्ती कळवळसी । शनिप्रदोषा कथिसी । 

ठेविसी शिरी त्याच्या निज हस्ता। सुत होय महाज्ञाता ।। जो. ।। २ ।। 

सर्वेश्वर देवा कुरवपुरी। रजक तुझी भक्ती करी । 

प्रसन्न होसी वा कृपानिधी । बसविसी त्या राजपदी । 

मार्गी चोरांनी द्विजवर्या । वधितां तुज आली दया । 

धावत आलासी जशी माता । वाचविले निजभक्ता । । जो. ॥ ३ ॥

 भक्तासाठी तू भूमिवरि । होसी नरतनुधारी । 

घेऊनि दीनाचा कैवार । हरला अवनीभार । 

झाले श्रम भारी तुजलागी । आता निज सुख भोगी

होई बहु हर्ष दत्तसुता । प्रेमे तव गुण गातां । जो. ॥४ ॥
🌺 दत्त जयंतीचा पाळणा मराठी - 2 ( dattacha palana lyrics in marathi Pdf


जो जो जो जो रे सुकुमारा । दत्तात्रया अवतारा ॥धृ॥

कमलासन विष्णू त्रिपुरारी । अत्रिमुनीचे घरी ।

सत्त्व हरु आले नवल परी । भ्रम दवडिला दुरी ॥१॥

प्रसन्न त्रिमूर्ति होऊनी । पुत्रत्वा पावुनि ।

हर्ष झालासे त्रिभुवनी । राहे ॠषिचे सदनी ॥२॥

पालख बांधविला सायासी । निर्गुण ऋषिचे वंशी ।

पुत्र जन्माला अविनाशी । अनसूयेचे कुशी ॥३॥

षट्दश नामासी आधार । दत्तात्रय अवतार ।

कृष्णदासासी सुख थोर । आनंद होतो फार ॥४॥
🌺दत्ताचा पाळणा मराठी - 3 ( datta jayanti  palana lyrics in marathi Pdf )


जो जो जो रे जो जो जो जो । तूं मी ऐसे उमजो ।।धः।।

प्रेम पालख दत्तात्रयाः । हालविती माता अनसूया ।।

बोधुनि निजरूप समजाया । भवभ्रम ही उडवाया ।।जो.।।१।।

रजोगुणी तूं ब्रह्मया । श्रमलासी तान्हया ।।

सुखे निज आतां सखया । धरि रे स्वरूपी लया ।।जो.।।२।।

तमोरूप तूं सदाशिव । विश्रांती घे देवा ।।

धरि रे स्वरूपी तूं भावा । संहारिता विश्व ।।जो.।।३।।

विष्णु सात्त्विक तूं अहंकार । दैत्यांचा संहार ।।

करितां श्रमलासी अपार । आतां समजे सार ।।जो।।४।।

ऐसा आनंदे पाळणा । मालो गातसे जाणा ।।

सद्गुरु कृपे आपण । दत्ता निरंजना ।।जो.।।५।।


🌺 दत्ताची आरती मराठी lyrics PDF download

Click here to Download


🌺 दत्ताचा पाळणा मराठी lyrics PDF download

Click here to Download


🌺 दत्ताची आरती दाखवा विडिओ

https://youtu.be/aDShcdlN0i8🆕 दत्त जयंती आरती मराठी


FAQ 

Q. यावर्षी 2022 दत्त जयंती कधी आहे?

Ans - यावर्षी दत्त जयंती दिनांक 7 डिसेंबर 2022 रोजी आहे

Q. दत्त जयंती ची आरती मराठी मध्ये कुठे मिळेल

Ans- दत्त जयंती ची आरती मराठी लिरिक्स व पीडीएफ मध्ये www.marathibhashan.com या वेबसाईटवर मिळेल

Q.दत्त जयंती हा सण कोणत्या महिन्यात असतो 

Ans-  जयंती हा सण डिसेंबर महिन्यामध्ये किंवा मार्गशीष महिन्याच्या पौर्णिमेला असतो

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !