Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी लहान मुलांसाठी | prajasattak din marathi bhashan 2023

प्रजासत्ताक दिन भाषण मराठी लहान मुलांसाठी | prajasattak din marathi bhashan 2023 PDF


नमस्कार आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी माहिती  बघणार आहोत त्याचा फायदा प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषण  ( prajasattak din marathi bhashan ) देण्यासाठी उपयोग करू शकता तसेच प्रदान करण्याची प्रसंचालन कविता चारोळ्या करण्यासाठी सदर लेखाचा उपयोग करू शकता चला तर प्रजासत्ताक दिनाच्या भाषणाला सुरुवात करूया प्रजासत्ताक दिनाचे छोटे भाषण असून लहान मुलांसाठी नक्कीच उपयोग होईल.


प्रजासत्ताक दिन भाषण मराठी



प्रजासत्ताक दिन भाषण संग्रह(toc)


प्रजासत्ताक दिनाचे भाषण मराठी | prajasattak din marathi bhashan 2023 pdf


माननीय अध्यक्ष महोदय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या देशबांधवानो

आज 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करत आहोत. प्रत्येक भारतीयासाठी हा दिवस अभिमानाचा सन्मानाचा आणि उत्साहाचा आहे. या मंगलदिनी तुम्हा सर्वाना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेक क्रांतीकायानी आपल्या जीवाची आहुती दिली त्या सर्व वीरांना वंदन करुया. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचा कारभार सुरळीत चालावा, नागरीकांना सुख- समाधानाचे शांततेत जगता यावे यासाठी देशाला संविधानाची गरज होती डो बाबासाहेब आंबेडकर यांनी नेमलेल्या संविधान समीतीने २ वर्ष ११ महिने १८ दिवसाच्या कालावधीत संविधान तयार केले. 26 जानेवारी १९५० रोजी देशात संविधात्राची अंमलबजावनी झाली व देश प्रजासत्ताक म्हणून साधीत करण्यात आला आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा उंचा रहे हमरा ||



२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन भाषण मराठी | 26 january speech in marathi for small child


'आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. आदरणीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजण वर्ग, ग्रामस्थ आणि माझ्या विदयार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

आजचा दिवस आपल्या प्रत्येकासाठी अभिमानाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. आजच्या दिवशी म्हणजेच 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाने संविधान स्विकारले आणि खऱ्या अर्थाने देशात प्रजासत्ताक राज्य सुरू झाले.

'गुलामगिरी संपली, झाले गणराज्य !

'सत्ताधारी बनले चालक जनता झाली मालक' 

प्रजासत्ताक म्हणजे प्रजेने निवडलेली सत्ता कोणाला सत्तेवर बसवायचे आणि कोणाला सत्तेवरून खाली खेचायचे हे ठरवण्याचा अधिकार प्रजेला प्राप्त झाला. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकास समानतेचा दर्जा मिळवून दिला. प्रत्येकास विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळाले. न्याय, समानता व बंधुता प्रस्थापित झाली. संविधाना. मुळेच आज आपला देश जगातील सर्वात मोठी व सशक्त लोकशाही असलेला देश बनला आहे.

आज आपण सुखा-समाधाने जे प्रजासत्ताक राज्य उपभोगत आहोत त्यामांगे हजारो क्रांतिकारकांचे बलिदान आहे हे विसरून चालणार नाही. देशासाठी अमर झालेल्या सर्व हुतात्म्यांना त्रिवार नमन करूया "आणि देशाची एकता व शांतता अधिक वृद्धींगत करण्याचा दृढ निश्चय करुया.

जय हिंद जय भारत! धन्यवाद.....


26 जानेवारी भाषण मराठी | 26 January bhashan marathi PDF


"ऐ मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी

जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी" 


ज्यानी या देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून आपलं अमूल्य योगदान दिले त्या सर्व ज्ञात आणि अज्ञात देशभक्तो ना कोटी कोटी प्रणाम करतो. या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे उपस्थित गुरुजन आणि विद्यार्थी मित्रहो, आज मी प्रजासत्ताक दिनाविषयी बोलणार आहे. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची म्हणजेच लोकांची सत्ता होय देश स्वातंत्र्य झाल्यानंतर देश कसा चालवावा, सामान्य माणसाला न्याय मिळवावा, देशात समता मिळवावी म्हणून  घटना समितीची निर्मिती केली धर्म, जात, पंथ, गरीब,श्रीमंत हा भेदभाव न करता सर्वांना समान न्याय व कर्तव्य त्याची जाणीव घटनेतून करून दिली. यालाच आपण संविधान म्हणतो, आणि त्याचा स्वीकार २६ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आला या घटनासमितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोलाचे योगदान दिले म्हणून त्यांना घटनेचे शिल्पकार असे संबोधित केले जाते.

संविधानाने आपणाला खरे स्वातंत्र्य दिले आहे. हे हे स्वातंत्र अबाधित घेण्यासाठी आपणाला हक्कासोबत प्रामाणिक पणे कर्तव्ये पार पाडावी लागतील. कारण देशभक्तांनी सांगून ठेवले आहे,

" अब तुम्हारे हवाले वतन साथियों"

जय हिंद जय महाराष्ट्र



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !