Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Bail pola wishes in marathi 2023

बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश २०२३ |Bail pola wishes in marathi 2023 |bail pola quotes in marathi


नमस्कार आज आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा सण म्हणजे पोळा 2023 या सणा विषयी मराठी मध्ये माहिती बघणार आहोत तसेच पोळा सणाच्या शुभेच्छा संदेश व्हाट्सअप्प स्टेट्स मॅसेज wishesh marathi quotes बघणार आहोत माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.


पोळा सण माहिती मराठी (toc)


बैल पोळा बेंदूर सण कधी साजरा करतात ?

 श्रावण महिन्यातील सर्वात शेवटचा सण म्हणजे पोळा , पोळा हा सण श्रावण महिन्यातील शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण आमावस्याला पिठोरी आमावस्या ला  साजरा करताना !

या वर्षी 2023 ला बैल पोळा कधी आहे ?

 या वर्षी 2023 ला पोळा हा सण 14 सप्टेंबर 2023 रोजी साजरा केला जानार आहे.  

बेंदूर बैल पोळ्याचे महत्व 

पोळ्याच्या दिवशी बैलांची पूजा केली जाते.  पोळा म्हणजे बैलाच्या पूजेचा दिवस, शोभा, सेवा आणि बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस.या बैलपोळा अर्थात बेंदूर सणाच्या निमित्ताने मुक्या प्राण्यांविषयी आपल्या मनात प्रेम, आपुलकी वाढते. ती आपण चिरंतन ठेवूया. शेतीला पूरक व्यवसाय पशूपालन आहे. आपण सर्वानी त्यांचे महत्त्व ओळखून त्यांना त्रास न देता नेहमी त्यांना आनंदात ठेवूया. त्यांना नेहमी आपण पुरेसे चारा पाणी देवूया.

बैल पोळा सण का साजरा केला जातो ?

 महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. भारत हा शेती प्रधान देश आहे. येथील बहुतांश लोक खेड्यात राहतात. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. इथले जीवन शेतीवरच अवलंबून आहे. या शेती कामात बैलांची मोठ्या प्रमाणात मदत होते. वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या बैल या मुक्या प्राण्यावर भरभरून माया करण्याचा हा दिवस अर्थात बैलपोळा असतो.

 महाराष्ट्रात पोळा दोन दिवस साजरा केला जातो.  मोठा पोळा अमावास्येच्या दिवशी साजरा केला जातो, या दिवशी खऱ्या बैलांची पूजा केली जाते.  दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा किंवा छोटा पोळा साजरा केला जातो, ज्यामध्ये मुले घरोघरी जाऊन लाकडी बैल घेऊन काही दक्षिणा मागतात हा सण विदर्भात खूप थाटामाटात साजरा करतात.

पोळा सण व बैलांचा सजावट शृंगार 

 महाराष्ट्रात शेतीला खूप महत्त्व आहे आणि पोळा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.  यादिवशी आपला बैल सर्व बैलात उठून दिसावा यासाठी शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे त्याचा आनंदाने साजश्रुंगार खरेदी करतात. बैलांना देव मानणारे शेतकरी हळद आणि गरम पाण्याने बैलांचे खांदे शेकतात आणि त्यांची या दिवशी पूजा केली जाते.  संध्याकाळी, कुटुंबप्रमुखांकडून बैलांना विनंती केली जाते, " आज अवतन घ्या, उदया जेवायला या !  असे बोलून बैलांना बोलून अन्नासाठी आमंत्रित केले जाते पोळ्याच्या दिवशी बैलाला गाडीला अथवा नांगराला जुंपले जात नाही तर त्याचे पूजन केले जाते. पोळ्याच्या पहाटे शेतकरी आपल्या बैलांना नदीवर नेऊन त्यांना आंघोळ घालतात.बैलांच्या शिंगाना शिंगोटया बसवितात. त्या शिंगावर वर्नीस किंवा हिंगुळ लाऊन त्यावर बेगड पट्ट्या लावतात. वाखाची किंवा सुताची नवी म्होरकी, नव्या गोंडेदार माताटया, नवा कांडा, नवी वेसण, नवा कासरा, सगळे काही नवे, रंगीत असते.तसेच घाग-या, घुंगुरामाळा,दृष्टमणी बांधले जातात.

कपाळावर बाशिंग बांधतात, गोंडे, झुल, पायात चांडीचे तोडे अशा प्रकारे सजवतात. तसेच गायी म्हशी, वासरे यांनाही सजवले जाते. या दिवशी सर्व जनावरे खूप नटतात. हे दृश्य नयनरम्य भासते.पोळ्याचे महत्त्व शेतकरी वर्गात फार आहे. शेतकरी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो.

पोळ्याच्या दिवशी विशेष नैवेद्द 

  पोळ्याच्या दिवशी बैलांसाठी पुरण पोळी, कढी,  मूग डाळ, आणि भात बनवला जातो. तसेच काही ठिकाणी या दिवशी घरात पुरणपोळी, करंजी, कापणी, शंकरपाळी असे पदार्थ बनवले जातात.. सर्व जनावरांना गोड पुरणपोळी भरवली जाते.


बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी


शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे. तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळ्यात सजू दे. बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा


बैल पोळाच्या हार्दिक मॅसेज मराठी


भारतीय कृषीप्रधान संस्कृतीत मुक्या जनावरांची ही पूजा करावी , अशी शिकवण देणाऱ्या पोळा या सुंदर सणांच्या हार्दिक शुभेच्छा!


Bail pola quotes in marathi 2023


वाडा शिवार सारं । वडिलांची पुण्याई।। किती वर्णू तुझे गुण । मन मोहरून जाई।। तुझ्या अपार कष्टानं । बहरते सारी भई ।। एका दिवसाच्या पूजेनं। होऊ कसा उतराई।।


Bail pola wishes in marathi 2023


सण आला आनंदाचा, माझ्या सर्जा राजाचा! ऋण त्यांचं माझ्या भाळी, सण गावच्या मातीचा!! बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.


Bail pola wallpaper download 


कष्ट हवे मातीला चला जपुया पशुधनाला...बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.


Happy bail pola in marathi 2023


शिंगे घासली, बाशिंगे लावली माढुळी बांधली, म्होरकी आवळली तोडे चढविले, कासारा ओढला घुंगुरमाळा वाजे खळाखळा आज सण आहे बैल पोळा..पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा!


Maharashtra bail polachya hardik shubhechha


नाही दीली पुरणाची पोळी " तरी राग मनात धरनार नाही फक्त वचन द्या मालक मला मि कत्तलखाण्यात मरनार नाही. बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.


Happy pola festival marathi 


कष्टाशिवाय मातीला आणि बैलाशिवाय शेतीला पर्याय नाही. हजारों वर्षांपासून राबराब राबणारा हा बैलराजा . बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा.


Happy Bail pola festival marathi


शेतात राबणाऱ्या तुझ्या अंगाला, आज शांत निजू दे. तुझ्या घामानं फुलणाऱ्या पिकाला, तुझ्या डोळ्यात सजू दे.बैलपोळ्याच्या शुभेच्छा


Bendur bail pola marathi 2023


आज पुंज रे बैलाले फेडा उपकाराचं देनं... बैला, खरा तुझा सन शेतकऱ्या तुझं रीन , बैल पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !


Happy bendur bail pola 2023 marathi


आला आला रे बैल पोळा गाव झालं सारं गोळा सर्जा राजाला घेऊनी सारे जाऊया राऊळा ,बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा



सणाचे नावबैल पोळा 2023
2023 बैल पोळा कधी आहे 14 सप्टेंबर 2023
बैल पोळा कुठे साजरा केला जातोबैल पोळा महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात साजरा करतात
बैल पोळा का साजरा करतातपोळा हा शेतकऱ्यांचा मित्र बैलां विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो

हे पण वाचा ➡️

🆕  8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिवस मराठी निबंध भाषण घोषवाक्य


FAQ
Q.2023 बैल पोळा कधी आहे ?
Ans- बैल पोळा 14 सप्टेंबर 2023 ला आहे.
Q.बैल पोळा कुठे साजरा केला जातो?
Ans- बैल पोळा महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात साजरा करतात.

Q.बैल पोळा का साजरा करतात?

Ans- पोळा हा शेतकऱ्यांचा मित्र बैलां विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो.


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !