Type Here to Get Search Results !

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2022-23 भाषण सूत्रसंचालन घोषवाक्य मराठी माहिती |Shala pravesh utsav 2022 bhashan sutrasanchalan Ghoshvakya Marathi

शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2022-23 भाषण सूत्रसंचालन घोषवाक्य मराठी माहिती |Shala pravesh utsav 2022 bhashan sutrasanchalan Ghoshvakya Marathi | praveshotsav karyakram 2022-23


जून महिना आला की चाहूल लागते  शाळा सुरू होण्याची , दरवर्षी 14 जून किंवा 15 जून शाळा सुरू होण्याची तारीख ठरलेली असते , शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे शिक्षक स्वागत करत असतात त्यांना विविध गिफ्ट ,रांगोळी ,भोजन देऊन , शाळेच्या पहिल्या दिवशी विविध खेळ , स्पर्धेचे आयोजन केले जाते ,त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसापासून शाळेची आवड निर्माण होते , त्यालाच शाळा प्रवेश उत्सव असे म्हटले जाते परंतु मागील वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शाळा प्रवेशोत्सव हा आपल्याला ऑनलाईनच साजरा करायचा आहे त्यासाठी आपण शाळेच्या पहिल्याच दिवशी झूम मीटिंग द्वारे किंवा गुगल मिट द्वारे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन स्वागत करायचे आहे. 

शाळा प्रवेश उत्सवासाठी लागणारे भाषणे घोषणा सूत्रसंचालन घोषणा रांगोळी त्यांचा संग्रह केला आहे याचा उपयोग तुम्हाला नक्कीच शाळा प्रवेशोत्सव 2022 साठी होईल.


शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2022-23 भाषण सूत्रसंचालन घोषवाक्य रांगोळी


नमस्कार प्रवेश उत्सव 2022 च्या ऑनलाइन प्रवेश उत्सव कार्यक्रमांमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत !

सुस्वागतम ...सुस्वागतम ...सुस्वागतम...

विद्यार्थी हा शाळेचा आत्मा असतो, आणि शाळा ही विद्यार्थी मनाच्या आवाजाचा कानोसा आपल्या सर्वांच्या ही नकळत घेत असते,  एवढेच नव्हे तर हीच शाळा त्याच्या स्पर्शासाठी आतुरलेली व आसुसलेली असते .

आज शाळेचा पहिला दिवस आणि हाच तो क्षण की ज्या शाळेतील प्रत्येक वर्ग देखील तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे परंतु तुम्हाला माहीतच आहे मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही  covid-19 मुळे आपली शाळा प्रत्यक्षात भरता येणार नाही यावर्षीही सुद्धा आपल्याला ऑनलाईनच शाळा भरावयाची आहे

आणि त्यामुळेच आज आपण शाळेचा पहिला दिवस - शाळा प्रवेशोत्सव 2019 ऑनलाईन साजरा करतात आहोत

आम्हाला माहीत आहे  तुम्हालाही शाळेत प्रत्यक्ष येण्याची चाहूल लागली आहे , कधी शाळेत जाईल आणि कधी आपल्या बेंचवर जाऊन बसेल असं वाटत असेलच ना ...?

त्या साठी मी एवढेच म्हणेन

कधी हसवते रडवते  

लावी आई बापापरी लळा 

 अनमोल संस्काराचे धडे 

प्रिय आम्हाला आमची शाळा...


🆕 आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने द्वारे केली जाणार आहे.शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम 2020-21 दीपप्रज्वलन व्हिडीओ  सुख दुःखाचा छायेतून कळते 

जसे सार अवघ्या जीवनाचे 

आत्मा कार्यक्रमाचा दर्शविते 

तसे हे महत्त्व प्रस्ताविकाचे...

आपल्या शाळेचे मुख्याध्यापक यांना मी विनंती करतो की आजच्या प्रवेश उत्सवाचे प्रास्ताविक करून मुलांना पहिल्या दिवशी च्या ऑनलाईन शुभेच्छा द्यावे.

आज शाळेचा पहिला दिवस आनंद व उत्साहाने तुमची सर्वांची मने  ओथंबून वाहत आहेत. नवे मित्र, नव्या मैत्रिणी नवी पुस्तके, नवे वर्गशिक्षक या सर्वच नवख्या अनुभवास सामोरे जाण्यास व नव्या जुन्या मित्र मैत्रिणींच्या भेटीसाठी आपण आतुरलेले आहात. यावर्षीच्या नवीन संकल्पपूर्तीच्या तुम्हां सर्वांना शुभेच्छा.

सर्व विद्यार्थ्यांचे नाव घेऊन त्यांना गुलाबपुष्प देवून (फोटो दाखवून )विद्यार्थ्यांचे नाव घेऊन त्यांचे स्वागत करावे.

शाळा प्रवेशाच्या दिनी अशा टाळ्या कडाडल्या 

निष्पन्न भिंतीही शाळेच्या जणू आज सचेतन झाल्या


रंगीबेरंगी मनामनांनी 

अशी शाळा ही भरली 

जणू शब्दररुपी फुलपाखरे ही चोहीकडे विखुरली 

शब्द, शब्द कविता झाल्या 

अंक, अंक झाले पाढे 

गुरुजनांच्या मायेने

 हृदय ज्ञानमंदिर झाले


🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf


शाळा प्रवेशउत्सव आभार !!

ज्ञानकुंभ रिता करुनी 

संस्कारांचे ज्ञान दिले 

बोधामृत पाजून ज्ञानाचे 

आम्हा उपकृत केले 

तुम्ही पाठीराखे आमुचे 

सदा तुमचाच आधार 

आशिष असू द्यावे शिरी 

स्विकारूनी हे आभार

व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी वेळात वेळ काढून आपला बहुमूल्य वेळ आमच्या चिमुकल्यांच्या / विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी देऊन अनमोल मार्गदर्शन केल्याबद्दल मी विद्यालयाच्यावतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व आपले असेच मार्गदर्शन सदैव आम्हाला लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

आपल्या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होईल. ( अध्यक्षीय परवानगीने कार्यक्रमाची सांगता करावी...... धन्यवाद !! )


( सूचना - सदरील सूत्रसंचालन हे आमचे मित्र ....गिरीष दारुंटे सरांनी तयार केलेले आहे त्याचे मनपूर्वक आभार )


शाळा प्रवेशउत्सव 2022 भाषण pdf
शाळा प्रवेशउत्सव 2022 सूत्रसंचालन pdf
शाळा प्रवेशउत्सव फलक लेखन pdf

शाळा प्रवेशउत्सव रांगोळी pdf

शाळा प्रवेशउत्सव घोषवाक्य मराठी pdf


Click here to Download PDF (download)🆕 आंतरराष्ट्रीय योग दिन 2021 मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन

🆕 इ 10 वी सर्व परिशिष्ट Excel Sheet सॉफ्टवेअर

🆕 इ 10वीच्या विद्यार्थ्यांना इ 9वी मध्ये किती गुण टाकले सरल प्रणालीत ते चेक करा !

🆕 इ 10 वीच्या श्रेणी विषयाच्या परीक्षा घ्याव्या लागणार ! बोर्डामार्फत आल्या सूचना

🔰  दहावी ची मूल्यमापन पद्धती समजून घ्या सोप्या भाषेत

🔰  11वी प्रवेशप्रक्रिया कशी असेल नक्की वाचा !

➡️ इ 1 ली ते 9 वी 2021 रिझल्ट सॉफ्टवेअर नक्की डाउनलोड करा

➡️ 9 वी रिझल्ट बनवा 10 मिनिटांत !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !