Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

संकलित चाचणी -2 PAT चे वेळापत्रक बदलेले ! Star summative 2 Timetable 2024

 STARS अंतर्गत संकलित चाचणी -2 चे वेळापत्रक जाहीर 2024 ! Star summative 2 Timetable 2024 


STARS प्रकल्प मधील SIG २ (improved Learning Assessment systems) २.२ अंतर्गत सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचण्याचे (PAT) आयोजन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यास अनुसरून २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात पायाभूत चाचणी, संकलित मूल्यमापन १ व संकलित मूल्यमापन २ अशा तीन नियतकालिक चाचण्या एकूण दहा माध्यमात घेण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा या तीन विषयांची इयत्ता ३ री ते ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी संकलित मूल्यमापन २ म्हणून सदर चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.


🔰 आमच्या व्हाट्सअप्प ग्रुप मध्ये सहभागी व्हा !

➡️ https://chat.whatsapp.com/JuGoNbNUMWa93F4sc0XVq0


यास अनुसरून राज्यातील इयत्ता तिसरी ते आठवीच्या शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या (विद्यानिकेतन/सराव पाठशाळा, समाजकल्याण विभाग (शासकीय), आदिवासी विकास (शासकीय), जिल्हा परिषद, मनपा, नपा, नप, शासकीय सैनिकी शाळा, कटक मंडळ, एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल) या शाळांमधील विद्यार्थ्याच्या व खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांच्या संकलित मूल्यमापनचे आयोजन ०२ ते ०४ एप्रिल २०२४ या कालावधीत घेण्यात येणार आहेत, यासाठी आवश्यक चाचण्यांचा/ प्रश्नपत्रिकांचा पुरवठा राज्यस्रावरून करण्यात येणार आहे. संकलित मूल्यमापन २ चे खालील प्रमाणे आयोजन करण्यात येणार आहे.

संदर्भ क. २ नुसार दिनांक ०२.०४.२०२४ ते ०४.०४.२०२४ या कालावधीत संकलित मूल्यमापन २ घेण्याचे नियोजन कळविण्यात उडालेले होते. परंतु काही तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन - २ ही दि. ०४.०४.२०२४ ते ०६.०४.२०२४ या कालावधीमध्ये घेण्यात यावी. त्याचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे


💥 संकलित मूल्यमापन 2 नवीन परिपत्रक ( 25 march 2024 )


संकलित मूल्यमापन २ वेळापत्रक 2024 

STARS अंतर्गत संकलित चाचणी -2 चे वेळापत्रक जाहीर 2024 ! Star summative 2 Timetable 2024


* संकलित मूल्यमापन -२ उद्देश

  • १) विद्यार्थ्यांची अध्ययन निष्पती संपादणूक पडताळणे,
  • २) राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) मधील संपादणूकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून कार्यवाही करणे.
  • ३) अध्ययनात मागे असणा-या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याच्या दृष्टीकोनातून कृतिकार्यक्रम तयार करणे व अंमलबजावणीस दिशा प्राप्त होईल,
  • ४) विषयनिहाय अध्ययन निष्पत्तीमधील राज्याची सद्यस्थिती समजण्यास मदत होईल.

💥संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका द्वितीय सत्र 2024


• संकलित मूल्यमापन -२ चे वेळापत्रक 2024

टीप:-१ प्रथम भाषा, गणित व तृतीय भाषा (सर्व माध्यम) या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक घेण्यात यावी, तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसऱ्या दिवशी आपल्या उपलब्ध वेळेनुसार घ्यावी परंतु दिनांक ०६/०४/२०२४ अखेर उपरोक्त विषयांची तोंडी चाचणी घेऊन निकाल अंतिम करावा.

टीप:-२ प्रथम भाषा, गणित (सर्व माध्यम) व तृतीय भाषा इंग्रजी (इंग्रजी माध्यम वगळता सर्व माध्यम्) या विषयांची तोंडी परीक्षा ही त्या-त्या दिवशी लेखी परीक्षेनंतर वैयक्तिक स्वरुपात घेण्यात यावी. तसेच विद्यार्थी संख्या जास्त असेल तर दुसन्या दिवशी उपलब्ध वेळेनुसार घ्यावी.

टीप:-३ प्रत्येक विद्यार्थ्याने इयत्तानिहाय अपेक्षित अध्ययन संपादणूक प्राप्त केली आहे किंवा नाही याची पडताळणी होऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुलभ होण्यास या चाचणीमुळे शिक्षकांना मदत होणार होईल.

टीप:-४ सवर चाचण्या इयत्ता १० वी व १२ वी बोर्ड परीक्षेप्रमाणे नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना याबा अतिरिक्त ताण देऊ नये याची दक्षता घ्यावी, चाचण्यांचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांनी अध्ययन निष्पत्ती किती प्रमाणात प्राप्त केलेल्या आहेत हे शिक्षकांनी लक्षात घेऊन गरजेनुरूप कृतीकार्यक्रमाची आखणी करणे हा आहे.


💥 इ ५ वी निकाल सॉफ्टवेअर २०२३-२४


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !