Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

10 वी श्रेणी विषयांची परीक्षा शाळा स्तरावर घ्या - बोर्डाकडून प्राप्त झाल्या मार्गदर्शक सूचना |SSC BOARD EXAM EVALUATION 2021

10 वी श्रेणी विषयांची परीक्षा शाळा स्तरावर घ्यायची बोर्डाकडून प्राप्त झाल्या मार्गदर्शक सूचना |SSC BOARD EXAM EVALUATION 2021 IN GRADE SUBJECT 

10th maharashtra board Evaluation 2021


 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा एप्रिल मे २०२१ ही दहावीची परीक्षा covid-19 च्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे द्वारे रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याचे परिपत्रक सुद्धा  महाराष्ट्र शासनाने काढले आहे . बोर्डामार्फत आजच (२जून 2021) त्याबाबत ऑफिशियल परिपत्रक काढण्यात आले आहे , त्यामध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे की श्रेणी विषयाची परीक्षा तोंडी परीक्षा आपल्याला आपल्या शाळा स्थरावर घ्यायचे आहे त्याचे मार्गदर्शक तत्वे या परिपत्रकात दिलेली आहे त्यानुसार आपल्याला कार्यवाही करायची आहे ,आता नवीन पद्धती नुसार आपल्याला त्या विद्यार्थ्यांचे श्रेणी विषयाचे  मूल्यमापन कसे करायचे आहे ते थोडक्यात आपण समजून घेऊया.

 

💗 राष्ट्रीय बेस्ट फ्रेंड्स डे शुभेच्छा संदेश     

 

🆕 इ 10वीच्या विद्यार्थ्यांना इ 9वी मध्ये किती गुण टाकले सरल प्रणालीत ते चेक करा !


🆕 असा साजरा करायचा आहे "शिवस्वराज्य दिन 2021" माहीत आहे ना?


🆕 अखेर 12वी महाराष्ट्र बोर्ड परीक्षा रद्द !


SSC BOARD EXAM EVALUATION 2021 IN GRADE SUBJECT . 
आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाचे मूल्यमापन -

विद्याथ्र्यांसाठी असलेले आरोग्य व शारीरिक शिक्षण विषयाची परीक्षा दोन्ही सर्वात न घेता एकाच म्हणजे दिवतीय सत्रात घ्यावी. प्रात्यक्षिक व लेखन कार्य प्रत्येकी ५० गुणांची परीक्षा घेऊन मिळालेल्या १०० गुणांपैकी प्रचलित पदधतीनुसार श्रेणी देण्यात यावी.


दर वर्षी आपण 10 वी च्या नियमित मूल्यांकन पध्दत अश्या प्रकारे करत होतो

प्रथम सत्र

प्रात्यक्षिक कार्य - ५० गुण 

लेखन कार्य - ५० गुण

दिवतीय सत्र

प्रात्यक्षिक कार्य - ५० गुण 

लेखन कार्य - ५० गुण

याप्रमाणे परीक्षा घेऊन

प्रथम सत्र - 100 गुण

द्वितीय सत्र - 100 गुण

एकूण - 200 गुण

रूपांतरित - 100 गुणा मध्ये रुपांतरीत करत होतो 


परंतु या वर्षी आपल्याला एकच परीक्षा घायची आहे 

प्रात्यक्षिक कार्य - ५० गुण 

लेखन कार्य - ५० गुण

एकूण गुण - १०० गुण

आणि या 100 गुणांच्या आधारे त्यांना श्रेणी द्यायची आहे !


अधिकृत परिपत्रक डाउनलोड करा(download)



ज्या विद्यार्थ्यांचे लेखन कार्य अपूर्ण राहिले आहे त्यांचेकडून उशिरात उशिरा १० जूनपर्यंत जमा करून घ्यावे

प्रात्यक्षिक परीक्षेसाठी अभ्यासक्रमानुसार १० घटकांपैकी कोणत्याही ०५ घटकांची निवड करावी. दिव्यांग विद्यार्थ्यासाठी प्रात्यक्षिक परीक्षा न घेता लेखन कार्य पूर्ण करून घ्यावे व प्रचलित पद्धतीनुसार त्यांना श्रेणी (H) देण्यात यावी.

सदर विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा व लेखन कार्य इ. घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित माध्यमिक शाळांना राहिल. त्यामुळे सदर परीक्षेचे शालेय स्तरावर आयोजन करून त्याचे मूल्यांकन विभागीय मॅडळाकडे जमा करावे.

कोविड-१९ ची परिस्थिती पाहता सर्व शासन नियमांचे पालन करुन मुख्याध्यापक शिक्षकांनी परीक्षेचे आयोजन करावे. संबंधित विषय

10वी परीक्षा मार्गदर्शक सूचना :- 

 कमीत कमी विद्याथ्र्यांच्या बॅचेस करून शारीरिक अंतर ठेवून गटागटाने प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात याव्यात. कॉमन साहित्याचा वापर टाळून वैयक्तिक स्वरूपाच्या क्षमता प्रात्यक्षिके घेण्यात यावीत. 

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रात्यक्षिक परीक्षेसाठी लागणारे शक्य होईल ते साहित्य विद्याथ्र्यांनी स्वतः आणण्याचा प्रयत्न करावा. उदा. स्किपिंग रोप, योगा मॅट / सतरंजी इ.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !