Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

तुळशीची आरती मराठी मध्ये २०२२ | Tulsi vivah chi aarti marathi lyrics pdf 2022 | tulsi vivah aarti marathi

तुळशीची आरती मराठी मध्ये २०२२ | Tulsi vivah chi aarti marathi lyrics 2022 | tulsi vivah aarti marathi

नमस्कार आज आपण दिवाळीनंतरचा सन म्हणजे तुळशी विवाह,  दिवाळीनंतर द्वादशीपासून आपण तुळशी विवाह करत असतो. यावर्षी तुळशी विवाह दिनांक 05 नोव्हेंबर 2022 पासून तुळशी विवाह ला सुरुवात होणार असून 08 नोव्हेंबर 2022 तारखेपर्यंत करता येणार आहे . तुळशी विवाह साठी आपल्याला तुळशीचे मंगलाष्टके व तुळशीची आरती Tulsi vivah chi aarti marathi lyrics pdf) आवश्यक असते तसेच तुळशी विवाह म्हटलं की तुळशीला लागणारे साहित्य पूजा विधी मुहूर्त बघून तुळशीचे विवाह आपण लावत असतो. चला तर आपण तुळशी विवाह साठी लागणारी तुळशीची आरती कोणती असते व लिहिलेली वाचता येणारी आरती बघणार आहोत.


🌱 तुळशीची आरती मराठी लिहिलेली pdf lyrics | Tulsi chi aarti marathi lyrics pdf | Jay dev jay dev jay maye tgulsi 2022


जय देव जय देवी जय माये तुळशी ।

निज पत्राहुनि लघुतर त्रिभुवन हे तुळशी ॥ धृ. ॥

 
ब्रह्मा केवळ मूळीं मध्ये तो शौरी ।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारीं ॥
सेवा करिती भावें सकळहि नरनारी ।
दर्शनमात्रें पापें हरती निर्धारी ॥ जय देवी. ॥ १ ॥

शीतल छाया भूतल व्यापक तूं कैसी ।
मंजिरिची बहु आवड कमलारमणासी ।
सर्व दलविरहित विष्णू राहे उपवासी ।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ॥ जय देवी. ॥ २ ॥

अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।
तुझे पूजनकालीं जो हें उच्चारी ॥
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।
गोसावीसुत विनवी मजला तूं तारी ॥ ३ ॥

🌱 तुळशीची आरती pdf मध्ये डाऊनलोड करा



 अशाप्रकारे आज आपण तुळशी विवाह ची आरती बघितली असून सदर आरती आपण युट्युब वर सुद्धा बघू शकता व युट्युब वर व्हिडिओ बघून आपण तुळशीची आरती लिहून घेऊ शकता धन्यवाद


🌱 तुळशी विवाह आरती दाखवा व्हिडिओ

https://youtu.be/--D0M4Cgm_s






FAQ

Q.तुळशी विवाह कधी व केंव्हा आहे ?

Ans: तुळशी विवाह दिनांक पाच नोव्हेंबर 2022 पासून सुरु होऊन आठ नोव्हेंबर 2022 पर्यंत लावता येणार आहे

Q.तुळसी विवाह मुहूर्त 2022 ?

Ans:  तुलशी विवाहाची शुभ मुहूर्त आज 05 नोव्हेंबर संध्याकाळी 05:35 ते 07 वाजेपर्यंत करावी .

Q.तुळशी विवाह आरती कोणती आहे pdf ?

ANS : "जय देवी जय देवी जय माये तुळशी" ही तुळशी विवाह साठी तुलशीची आरती आहे.


🔰 हे पण वाचा

🆕 श्री महालक्ष्मी ची आरती मराठी lyrics

🆕 तुळसी विवाह मंगलाष्टके व आरती pdf

🆕 गणपती ची आरती मराठी lyrics

🆕 दुर्गा देवीची आरती मराठी lyrics

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !