🔖 सावित्रीबाई फुले भाषण मराठी २०२२ savitribai phule marathi bhashan nibandh 2022
भारतात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती म्हणून दर वर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो. 5 सप्टेंबर 1962 रोजी भारतात प्रथमच राष्ट्रीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला. शिक्षका शिवाय चांगल्या करिअरची कल्पनाही करता येत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का भारतातील पहिल्या महिला शिक्षिका कोण होत्या? भारतातील पहिल्या महिला शिक्षिकेचे नाव सावित्रीबाई फुले. यांची आज १९२ वी जयंती . महिलांना शिक्षणाची जाणीव करून देण्याचे काम सावित्रीबाई फुले यांनी केले. सावित्रीबाई फुले त्यांच्या जयंती लाच बालिका दिन असेही म्हटले जाते .आज आपण सावित्रीबाई फुले यांच्या विषयी मराठी माहिती जाणून घेणार आहोत. ज्याचा उपयोग आपण सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मराठीत भाषण (savitribai phule bhashan) सावित्रीबाई फुले निबंध ( savitribai phule nibandh ) कविता चारोळी व सूत्रसंचालन pdf फलक लेखन करण्यासाठी नक्की करू शकता . चला तर मग जाणून घेऊया सावित्रीबाई फुले यांच्यावरील मराठीत भाषण कसे लिहायचे. तुम्हांला सावित्रीबाई फुले त्यांच्या जयंती निमित्त शुभेच्छा.
सावित्रीबाई फुले भाषण मराठी(toc)
सावित्रीबाई फुले यांची माहिती भाषण मराठी - १ savitribai phule speech in marathi pdf - 1
आदरणीय गुरुजन वर्ग आणि मझ्या बाल मित्र व मैत्रिनिनो आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त येथे उपस्थित आहोत. मैत्रिनिनो महिलांना शिक्षणासाठी प्रेरित करणाऱ्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची कहाणी तुम्हाला नक्कीच माहित असेल. ज्यांच्यामुळे आज स्त्रिया शिक्षित झाल्या आहेत, बालविवाहावर बंदी आहे, विधवांवरील अत्याचाराला लगाम आहे. आणि महिलांचे कल्याण आहे.सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या हितासाठी व्यतीत केले आणि समाजातील कुप्रथा समूळ उखडून टाकल्या.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव गावात झाला. त्यांचे जन्मस्थान शिरवळपासून पाच किमी अंतरावर होते. सावित्रीबाई फुले या माता लक्ष्मी आणि वडील खंडोजी नेवासे पाटील यांच्या ज्येष्ठ कन्या होत्या, त्या माळी समाजातील होत्या. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला आणि वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचा विवाह 12 वर्षांच्या ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. सावित्रीबाई आणि जोतिरावांना स्वतःची मुले नव्हती. ब्राह्मण विधवेचा मुलगा यशवंतरावांना त्यांनी दत्तक घेतल्याचे सांगितले जाते.
ज्योतिराव आणि सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि हळूहळू त्यांनी १८ शाळा उघडल्या.
असे म्हणतात की, सावित्रीबाई फुले जेव्हा मुलींना शिकवण्यासाठी शाळेत जात असत, तेव्हा लोक त्यांच्यावर माती, शेण, दगड आणि मलमूत्र फेकत असत, तेव्हा सावित्रीबाई फुले सोबत एक साडी ठेवत असत आणि शाळेत गेल्यावर बदलत असत.
सावित्रीबाई फुले हे स्त्री समाजाचे असे उदाहरण आहे, ज्यांनी पुरुषप्रधान समाजाला हादरा दिला, पोकळ पाया दूर केला, समतेची अशी प्रतिमा मांडली, जिथे महिलांना केवळ सन्मान मिळाला नाही, तर जीवन जगण्याचा नवा मार्ग सापडला. त्यांच्यावर जे काही अत्याचार होत होते त्याविरुद्ध लढण्याचे धैर्य मिळाले.
🏵️ सावित्रीबाई फुले सूत्रसंचालन फलक लेखन pdf
त्यावेळी मुलीचा बालविवाह होत व ती विधवा झाली तर तिचे केस मुंडण करून तिला कोणत्याही सामाजिक कार्यात येऊ दिले जात नव्हते . त्यांच्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी आपल्या घरात विधवांसाठी केअर सेंटर उघडून महिलांना शिक्षित केले आणि अशा समाजाचा पाया घातला जिथे महिलांना समान अधिकार मिळाले आणि जे लोक काल दगडफेक करायचे तेच लोक महिलांचा आदर करू लागले.
असे म्हणतात की त्यावेळी भयंकर प्लेग पसरला, सावित्रीबाई फुले यांनी रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना त्यांनाही प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
🏵️ सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शुभेच्छा संदेश 2023
वाचा ⤵️
नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचे निधन
🎇 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2023
🎯 सावित्री बाई फुले भाषण निबंध मराठी - 2 ( savitribai phule bhashan nibandh )
ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही
बुद्धी असुनही चालत नाही त्यास मानव म्हणावे का ?
ओळखलत का मला मी सावित्री. सावित्राबाई ज्योतीराव फुले सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी नेवासे पाटलांची मी कन्या वयाच्या नव्या वर्षी ज्योतीराव गोविंदराव फुले नावाच्या माणसाशी माझं लग्न झालं हळूहळू माझ्या लक्षात आलं ज्याच्याशी माझं लग्न झालं तो सामान्य माणूस नाही तर लाखो-करोड़ोंना जगण्याची ऊर्जा देणारा क्रांतिसूर्य त्यांना मी शेठजी म्हणायचे फुले घराण्यात आली आणि माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला माझा हात घर-घर कापत होता या थरथरणाऱ्या हाताला शेठजींनी पकडलं आणि पाटीवर लिहायला शिकवलं मी पहिला शब्द शिकली तो म्हणजे शेठजीच.
एकदाची शेठजींची सौ शिकली लिहायला शिकली, वाचायला शिकली आणि शेठजीसारखाच मोठा विचार करायला शिकली १ जानेवारी होय. शनिवार दिनांक १ जानेवारी १८४८ ला पुण्यातील भिडे वाड्यात सर्व धर्मीय मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली भारतीय माणसाने भारतीय माणसांसाठी | सुरु केलेली पहिली शाळा होती ती आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा. शिक्षण हे दूध आहे वाघिणीचं हे वाघिणीचं दूध मी माझ्या लेकरांना देणार होते. शेळपटासारखं जगलात तर काम तमाम होत वाघासारखे जगलात तर नाम होत. कार्य खडतर होतं, जोखमीचं होतं पण शिवरायांच्या मावळ प्रांतातील मावळ्यांचे आम्ही देखील वंशच होतो. घाबरण किंवा कच खाणं आमच्या रक्ताला मानवणारं नव्हतं. सनातनांचा मात्र धर्म बुडाला धर्म बुडाला म्हणून कोल्हेकुई सुरू होती सर्व सामान्य माणसानं शिक्षण घेतल्याने कसाकाय धर्म बुडतो यांचा, इतका तकलादू असू शकतो का धर्म, धर्म माणसासाठी असतो की, धर्मासाठी माणूस.
शेठजी घरोघरी जाऊन मुलीना गोळा करत होते. त्यांच्या आईबापांना समजावत होते पण अक्षराच्या आळ्या होऊन त्या नवर्याच्या जेवणाच्या ताटात पडतात असं म्हणणाऱ्या त्या सनातनी लोकांना ते पटण्यासारखं नव्हत ते शिक्षकांना वाळीत टाकण्याच्या धमक्या देत होते शेठजी विचारात पडले मी शेठजीना म्हणाले,
शेठजी कंचा विचार करताय क्या हाय नव्ह म्या 'शिकविण पोरीना' असं म्हणून मी सुरुवात केली. नेहमीप्रमाणे शाळेत शिकवायला जात असताना अचानक एक माणूस माझ्या समोर आला तो म्हणाला, 'ऐ बाई। कुठे निघालीस आमच्या पोरींना शिकवणं बंद कर तुला तुझी अब्रू प्यारी आहे की शिकवण कदाचित तो विसरला असावा मी खंडोजी नेवासी पाटलांची कन्या आणि ज्योतीराव पहेलवानांची पत्नी होते. मग उचलला हात आणि दिली त्याच्या थोबाडीत त्याक्षणीच त्याला सुनावल आज समोर आलायस थोबाड फुटलय पुन्हा जर माझ्या समोर आलास तर तुझ्या रक्ताने धरती रंगवीन. कसाबसा सावरत तो तिथून निघून गेला मोठ्या आशेने माझे अब्रू हरण बघायला आलेले बघे त्याची बेअब्रू झालेली पाहताच तिथून निमूटपणे निघून गेले. आजपर्यंत माझ्या अंगावर शेण फेकलं मी सहन केल शिव्या दिव्या दगडफेक केली मी गप्प राहिले माझा हात धरून मला दम देतो माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता.
दिवसा मागून दिवस गेले अंधारात उजेड येत होता लोकांना शिक्षणाच महत्त्व कळू लागलं ४ वर्षातच आमच्या १८ शाळा झाल्या पुढे बालहत्या प्रतिबंधाचे काम, बाईला घराबाहेर न पडू देणं, सती जाणं या सर्वांवर आम्ही विरोध केला. आनंद होता तो आयाबाया शिकत होत्या .अश्भयातच भयंकर प्लेग पसरला, आम्हीं रुग्णांची काळजी घेण्यासाठी दवाखाना उघडला आणि लोकांची काळजी घेत असताना मला हि प्लेग झाला आणि 10 मार्च 1897 रोजी माझा मृत्यू झाला.
म्हणून म्हणते स्त्रीला शिकू द्या, विचार करू दया कारण शिक्षणानेच मनुष्यत्व येते व पशुत्व हटते बरं येते ह मी .
जय हिंद जय महाराष्ट्र .
🎯 सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त छोटे भाषण - 3 savitribai phule short speech marathi
"किती भोगले किती सोसले तरीही तिने शिकवले।
स्त्री शिक्षणाचे धडे पुढे तिच्या साऱ्या लेकिंनी गिरवले."
अध्यक्ष महाशय, पूज्य गुरुजनवर्ग व माझ्या सर्व मित्रांनो, आज मी आपणासमोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करत आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ मध्ये सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर वडीलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी झाला. लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहायला- वाचायला शिकवले.
महात्मा फुले व सावित्रीबाईंनी इ.स.१९४८ मध्ये पुण्यातील बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. मुलांना शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगड फेक केली. शेणटी फेकून मारले. तरीही त्या उगमगल्या नाहीत त्यांनी मुलींच्या शिक्षणात प्रांती घडवून आणली. ज्योतिरावांच्या अनेक कार्यात या माऊलीने मोलाचे सहकार्य केले. अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम! धन्यवाद!
🎯 सावित्रीबाई फुले भाषण दाखवा
https://www.youtube.com/shorts/kTFmZe0LQkU
क्रांतिज्योती सावित्री बाई फुले मराठी मध्ये माहिती भाषण - 4 ( savitribai phule bhashan nibandh )
स्त्रियांच्या शैक्षणिक सामाजिक विकासासाठी भारतमातेच्या तेजस्वी इतिहासातील एका तेजस्विनीचा उदय झाला. ती नारीशक्ती ते रत्न म्हणजे सावित्रीबाई. एक आदर्श कन्या, एक आदर्श पत्नी, एक आदर्श शिक्षिका, एक आदर्श समाजसेविका अशा विविधांगांनी ज्यांचे व्यक्तिमत्त्व संपन्न होते अशा सावित्रीबाई फुले यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आजही समाजावर पडलेला दिसतो.
पहिल्या शिक्षिका, ज्ञानाची ज्योत पेटवून स्त्रीयांच्या जीवनात प्रकाशाची वाट दाखविणाच्या, क्रांतिसूर्य ज्योतिबांच्या कार्याला ज्यांची साथ साथ मिळाली अशा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी ०३ जानेवारी १८३६ रोजी झाला.खंडोजी नेवासे पाटील घरी जन्मलेली कन्या रूपागुणाची खाण होती. वडिलांच्या समाजकार्याचा ठसा सावित्री वर पडला होता. वडिलांप्रमाणेच गोर गरिबांविषयी कळवळा, गोरगरिबांचे प्रश्न सोडविण्याची धडपड व योग्य न्यायदान असे गुण सावित्रीमध्ये रुजले होते म्हणूनच म्हणतात ना-
जे का रंजले गांजले, त्यासि म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ।।
त्याकाळी विधवा पुनर्विवाहास मान्यता नव्हती, सतीप्रथा.बालविवाहाची प्रथा रूढ होती केशवपन सारख्या अनिष्ट प्रथांमुळे स्त्रियां ची स्थिती अतिशय दयनीय होती. दिसामासाने वाढणारी सावित्री ७-८ वर्षांची झाली, तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. 'मुलगी हे परक्याचे धन' हे वडिलांनी स्विकारले व वयाच्या ९व्या वर्षी इ.स. १८४० रोजी मोठ्या थाटामाटात आपल्या लाडक्या कन्येचा कन्या -दान समारंभ म. फुलेंच्या बंधातून पार पडला- सावित्रीबाईच्या विवाहांवेळी त्या काहीच शिकलेल्या नव्हत्या,
परंतु त्यांना शिकण्याची विलक्षण आवड होती. ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व स्वतःहून जाणले होते. त्यांनी सावित्रीबाईना स्वतः शिक्षणाचे धडे देण्यास शुरुवात केली. ज्योतिबाच्या रुपाने त्यांच्या आयुष्याचे सोने झाले . सावित्रीबाईंना वाचनाची खूप आवड होती. परंतु वाचता आले नाही याची खंतही होती आणि विवाहानंतर ती इच्छा पूर्ण झाली. शिकण्याची जिज्ञासा ही शिक्षण घेतल्यानंतर ध्येय आप्तीची परिपूर्ती ठरली.
"विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली
नीतीविना गती गेली. गतीविना वित्त गेले
वित्ताविना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले।"
हे ज्योतिबांचे शब्द नेहमी सावित्रीबाईच्या कानावर पडत होते. म्हणूनच सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांचा विद्यादानावर विशेष भर होता. त्यांच्या मते "आळस, परावलंबन वैगेरे दुर्गुण न वाढविण्यास व मनुष्याच्या अंगचे सद्गुण वाढविण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेत तर तो विद्यासन होय."
अज्ञानीनथा जनविदेचा विचार न करता
स्त्री शिक्षणाचा निश्चय करून
ज्योतिबाच्या सावित्रीने पुढे पाऊल टाकले!
संकटांना तोंड दिले न घाबरता
तळमळीने कार्य करून
मागे वळून न पाहता पुढेच याऊल टाकले!
अज्ञान हा माणसाचा शत्रू त्याला दूर करण्यासाठी, स्त्री-पुरुष भेद दूर करण्यासाठी, जातीभेद मिटविण्यासाठी म. फुले यांनी जानेवारी १८४८ रोजी पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरु केली. या शाळेत शिक्षिका म्हणून व मुख्यध्यापिका म्हणून सावित्रीबाई काम करू लागल्या बुद्धिमान, विद्वान असणाऱ्या सावित्रीबाईच्या वाचनाचे, लेखनाचे पडसाद त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्यातून दिसू लागले.
"स्त्री शिक्षणाइतकेच महत्त्वाचे कार्य दीन, दलित, दुबळे यांचा उध्दार करणे, विकास करणे हे होते. आपल्या पतीच्या साथीने दलितोद्धाराचे रणशिंग फुंकले. समाजातील जातीभेद दूर झाला पाहिजे, भेदभाव नष्ट झाला पाहिजे यासाठी जनजागरण केले. स्त्रीमुक्ती आणि दलितोद्धाराचे कार्य करणारी संत म्हणजे आधुनिक युगाची, युगप्रवर्तक क्रांतिज्योति सावितीबाई फुले .
आज महिला स्वयंपाक घरापासून ते संसदेपर्यंत, सायकल रिक्षा चालविण्यापासून ते अंतराळयानापर्यंत सक्षमपणे वावरताना दिसतात स्त्रियांच्या या प्रगतीची कहाणी सावित्रीबाईच्या लेखणीमुळेच झाली आणि आता ही प्रगती कधीच थांबणार नाही, सावित्रीबाईचे बोट सोडणार नाही.
🎯सावित्री बाई फुले कविता चारोळी ( savitribai phule kavita charolya )
माझ्या मनातील भावना मीच खोलते। मी सावित्रीबाई फुले बोलते ॥धृ॥
झेलल्या दगड विटा मिळण्या तुम्हा ज्ञान। हटले नाही धेय्यापासून जरी फेकली अंगावर घाण ॥
आजही ते दुःख मी मनी विषापरी गिळते । मी सावित्रीबाई फुले बोलते ॥ 1॥
उद्देश एकच की तुम्हाला मिळावे ज्ञान । सर्व महिला वर्गाचा व्हावा सन्मान ॥
एका स्त्रीचे दुःख स्त्रीलाच चांगल्याप्रकारे कळते मी सावितीबाई फुले बोलते ॥२॥
परि आता स्त्रीच स्त्रीची वैरीण निघाली । गर्भातच तिने तीची हत्या चालवली ॥
पाहुणी अशी कृती मी दुःखी होऊन अश्रू ढाळते मी साविती बाई फुले बोलते 11311
स्त्रीय आहे या अखिल विश्वाची शाना सर्वांनीच राखावा तीचा मान-सन्मान ॥
तिच्या पायीच संसारी सुख-वैभव खेळते होय, मी सावित्रीबाई फुले बोलते ॥४॥
पूर्ण नाव (Full Name) | सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) |
जन्म दिनांक व स्थळ (date and place of birth) | 3 जानेवारी 1831 नायगांव, सातारा, मुंबई, महाराष्ट्र |
मृत्यु नांक व स्थळ (date and place of death) | 10 मार्च 1897 पुणे, महाराष्ट्र |
पति चे नाव (husband name) | ज्योतिबा फुले (Jyotiba Phule) |
आई व वडील नाव (parent’s name) | लक्ष्मी (आई ), खन्दोजी नैवेसे (वडील ) |
गूगल डूडल (Google Doodle) | 3 जानेवारी 2017 ला 189 जन्मदिवस निमित्ताने डूडल बनवले |
विवाह (Marriage ) | सण 1840 मध्ये ज्योतिराव गोविंदराव फुले सोबत |
त्यांच्या जीवनाचा उद्देश्य (Purpose of life of Savitri Bai Phule) | विधवा विवाह करणे , बालविवाहाची प्रथा नष्ट करणे अस्नपृश्ष्टयता नष्ट करणे , समाजातील जातीभेद दूर, महिलांना शिक्षित करणे |