Type Here to Get Search Results !

🌺 मार्गशीर्ष गुरुवार 2022 श्री महालक्ष्मी व्रत पूजा विधी मराठी महालक्ष्मी व्रत पूजा कशी मांडावी साहित्य 2022 | margashirsha guruvar vrat puja vidhi sahitya marathi

🌺 मार्गशीर्ष गुरुवार 2022 श्री महालक्ष्मी व्रत पूजा विधी मराठी महालक्ष्मी व्रत पूजा कशी मांडावी साहित्य 2022 | margashirsha guruvar mahalaxmi vrat puja vidhi sahitya marathi pdf


मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची पूजा कशी करावी साहित्य कोणते लागते व मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची मांडाणी कशी करावी तसेच मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताचे उद्यापन विसर्जन कसे करावे याची थोडक्यात मराठी मध्ये सांगणार आहे  तसेच मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताचे साहित्य कोणते लागणार हे सांगणार आहे तसेच तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देणार आहे जसे की मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत कुमारिकेने गर्भवती महिलेने करावे का? मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी पहिला गुरुवार चे व्रत नाही केले तर परत करता येते का? मासिक पाळी मध्ये गुरुवारचे महालक्ष्मी व्रत कसे करावे व दाखवणार आहे त्यामुळे लेख पूर्ण व काळजीपूर्वक वाचा.तुम्हां सर्वांना मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा.


महालक्ष्मी गुरुवार व्रत पूजा विधी साहित्य 2022(toc)

🌺 मार्गशीर्ष गुरुवार पूजा विधी साहित्य व संपूर्ण माहिती चा व्हिडिओ नक्की बघा 


➡️ https://youtu.be/oj0MlVssNYY

🌺 मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रत पूजाविधी मराठी 2022 | margashirsha guruvar mahalaxmi vrat puja vidhi in marathi pdf ( pooja kashi karvai marathi ) 2022 PDF

मार्गशीर्ष पहिला दुसरा तिसरा व चौथा गुरुवार ची महालक्ष्मी व्रताची पूजा कशी करावी व मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची मांडाणी कशी करावी साहित्य काय काय लागते याची थोडक्यात मराठी मध्ये महिती सांगणार .

 1. श्री महालक्ष्मी मातेची कृपाप्रसादी प्राप्त करुन मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्या करीता आदीकाळापासून हे व्रत आहे. 
 2. या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे परंतु जर कोणत्याही कारणास्तव जर मार्गशीर्ष मासी व्रत करण्यास जमले नाही, तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी. 
 3. व्रताचे उद्यापन करावयाच्या दिवशी सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना घरी बोलवून त्यांच्यांत महालक्ष्मीस्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा व त्यांना हळदीकुंकू लावावे. मग पूजा, आरती, कहाणी विधीपूर्वक करून प्रसाद म्हणून एकेक फळ व महालक्ष्मी व्रतकथा पोथीची एक प्रत प्रत्येकीला द्यावी. पुरुषांनी हे व्रत करताना स्त्री किंवा कुमारिकांच्या हातावर हळदीकुंकू वाहून त्यांना महालक्ष्मीस्वरूप जाणून मनोभावे नमस्कार करावा. 
 4. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिधा-वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्याला नमस्कार करावा. सायंकाळी गाईची पूजा करून गोग्रास द्यावा. 
 5. व्रत करणाऱ्या स्त्री-पुरुषांनी मनाने आनंदी व शरीराने शुद्ध-स्वच्छ असावे. 
 6. गुरुवारी-व्रताचे दिवशी श्री महालक्ष्मी मातेची पूजा-आरती- कहाणी करताना शांत चित्त व आनंदी वृत्ति असावी. सर्वांशी प्रेमाने व गुण्यागोविंदाने वागावे तसेच प्रसन्न राहावे. 
 7. जर काही कारणामुळे आपणांस व्रताचे दिवशी पूजा-आरती-कहाणी करणे शक्य नसेल, तर दुसऱ्याकडून करवून घ्यावी. उपवास मात्र स्वतः करावा. 
 8. व्रताचे दिवशी दिवसभर उपवास करावा व रात्रौ पूजा-आरती झाल्यावर श्री महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवून कुटुंबियांसमवेत मिष्टान्न भोजन करावे. दुपारी फळे, दूध वगैरे घ्यावे. निराहार राहू नये.


🎯 मार्गशीर्ष पहिल्या गुरुवारच्या हार्दिक शुभेच्छा संदेश 2022


 मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रताची पूजेची मांडणी स्थापना कशी करावी |मार्गशीर्ष गुरुवार श्री महालक्ष्मी व्रताची पूजा कशी करावी साहित्य कोणते लागणार मराठी margashirsha guruvar mahalaxmi vratachi mandani pooja kahi karvai 2022

मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताचे उद्यापन विसर्जन कसे करावे याची थोडक्यात मराठी मध्ये सांगणार आहे व दाखवणार आहे त्यामुळे लेख पूर्ण व काळजीपूर्वक वाचा.

 1. घरात पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख (म्हणजे मातेचं मुखारविंद पूर्व किंवा उत्तर सन्मुख असणे) स्थापना करावयाची आहे. त्याप्रमाणे जागा सुनिश्चित करुन स्वच्छ करावी व ती जागा शेणाने- शक्यत: गाईच्या शेणाने सारवून रांगोळीने स्वस्तिक काढून त्यावर चौरंग किंवा पाट ठेवून सभोवती रांगोळी काढावी व मध्यभागी थोडे तांदुळ किंवा गहू वर्तुळाकार पसरून त्यावर हळद-कुंकू वाहावें. 
 2. एक तांब्याचा तांब्या (कलश) स्वच्छ करून त्यात पाणी भरून पैसा (१) रुपया), १ सुपारी व थोड्या दुर्वा घालाव्या व तोंडावर पाच तऱ्हेच्या झाडांच्या पाच डहाळ्या किंवा पाच झाडांची पाने रचून त्यावर नारळ (शेंडी वर करून) ठेवावा. 
 3. कलशाच्या बाहेरच्या अंगाला सर्व बाजूंना हळदी-कुंकवाची बोटे ओढावी व सजविलेला तांब्या, चौरंग-पाटावर पसरलेल्या तांदळाच्या किंवा गव्हाच्या वर्तुळावर मधोमध ठेवणे व श्री महालक्ष्मीमातेचे चित्र किंवा प्रतिमा (मूर्ती) व स्फटिक श्रीयंत्र असल्यास चित्र न ठेवता त्यांची स्थापना करावी. त्यासमोर विडा, खोरे, खारीक, बदाम व इतर फळे, खडीसाखर किंवा गूळ ठेवून शेजारी गणेश स्वरूपी सुपारी मांडावी व जवळ १। रुपया (नाणं) ठेवून तोच उद्यापनापर्यंत पूजनास घ्यावयाचा व उद्यापनानंतर तिजोरीत-कपाटात सांभाळून ठेवावा. 
 4. पूजेची संपूर्ण मांडणी केल्यानंतर स्वत: आचमन करून श्री महालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करावी. (स्नान, हळदीकुंकु, फुले वाहून, अगरबत्ती-धूप ओवाळून नमन करणे व नैवेद्य अर्पण करून प्रार्थना करणे हेच पंचोपचार पूजा होय.) नैवेद्यासाठी केळे किंवा यथाशक्ति इतर फळे ठेवून एका वाटीत कच्चे दूध अवश्य ठेवावे. 
 5. मग श्री महालक्ष्मीव्रताची कथा भक्तिभावाने वाचून पश्चात् 'श्रीमहालक्ष्मी माहात्म्य' वांचणे किंवा अडचण असल्यास दुसऱ्याकडून वाचून घेऊन आपण श्रवण करावे. 
 6. नैवेद्य दाखवून झाल्यावर श्रीमहालक्ष्मी मातेसमोर हात जोडून बसावे व या पोथीत दिलेले 'श्री महालक्ष्मी नमनाष्टक' म्हणून मनांतल्या मनात आपली इच्छा देवीला सादर करून ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करावी व आरती म्हणून अगरबत्ती (धूपारती) व नीरांजन ओवाळावे व श्रीमहालक्ष्मी मातेला साष्टांग नमस्कार घालावा. 
 7. रात्री श्रीमहालक्ष्मी मातेची पंचोपचार पूजा करून गोड मिष्टान्नांचा महानैवेद्य देवीला अर्पण करून गायीसाठी वेगळे काढून सर्व कुटुंबियांसह आनंदाने, प्रसन्नचित्ताने भोजन करावे. 
 8. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान केल्यावर तांब्यातील पाने किंवा डहाळे घरांत निरनिराळ्या पाच ठिकाणी ठेवणे व तांब्यातील पाणी समुद्रात, नदीत, विहीरीत, तलावात किंवा तुळशी वृंदावनात ओतावे. नंतर पूजा केलेल्या ठिकाणी हळदकुंकू वाहून श्रीमहालक्ष्मी मातेचे स्मरण करून नमस्कार करावा.

आशा आहे की तुम्हांला मार्गशीर्ष पहिला दुसरा तिसरा व चौथा गुरुवार ची महालक्ष्मी व्रताची पूजा कशी करावी व मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची मांडाणी कशी करावी तसेच मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताचे उद्यापन विसर्जन कसे करावे याची थोडक्यात मराठी मध्ये माहिती आवडली असेल तसेच मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताचे साहित्य कोणते लागणार हे सांगणार आहे तसेच तुमच्या काही प्रश्नांची उत्तरे देणार आहे जसे की मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रत कुमारिकेने गर्भवती महिलेने करावे का? मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी पहिला गुरुवार चे व्रत नाही केले तर परत करता येते का? मासिक पाळी मध्ये गुरुवारचे महालक्ष्मी व्रत कसे करावे या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील माहिती आवड्यास नक्की कळवा .


🌺 FAQ-

Q.मार्गशीष महिना गुरुवार व्रत कधी सुरू होणार आहे 2021?
Ans- मार्गशीष महिना गुरुवार व्रत 24 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होणार आहे.
Q.मार्गशीष महिना पहिला गुरुवार कधी आहे 2022?
Ans- मार्गशीष महिना पहिला गुरुवार 24 नोव्हेंबर 2022 रोजी आहे.
Q.मार्गशीष महिना शेवटचा गुरुवार कधी आहे 2022?
Ans- मार्गशीष महिना शेवटचा गुरुवार 22 डिसेंबर 2022 रोजी आहे.


☸️ हे पण वाचा -

🆕 श्री महालक्ष्मी ची आरती मराठी lyrics

🆕 मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी ची व्रत कथा pdf

🆕 गणपती ची आरती मराठी lyrics

🆕 दुर्गा देवीची आरती मराठी lyrics


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !