गुढीपाडवा माहिती मराठी |गुढीपाडवा निबंध |Gudi padwa information in marathi | gudi padwa 2024 date marathi maharashtra
नमस्कार मित्रांनो आज आपण हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण म्हणजे गुढीपाडवा का साजरा केला जातो, गुडीपाडवा कधी आहे, गुडीपाडव्याचा इतिहास मराठी माहिती निबंध बघणार आहोत माहिती नक्कीच आवडेल.
गुडीपडवा मुहूर्त पूजा विधी 2024(toc)
गुडीपाडवा माहिती इतिहास मराठी
हिंदू धर्मातील नवीन वर्षाची सुरवातच ही गुडीपाडवा सणा ने होत असते , वसंत ऋतूतील चैत्र महिन्यातील शुक्लपक्ष प्रतिपदेला हा सण दरवर्षी साजरा केला जातो. गुडीपाडवा सणाला संकल्प केला तर तो नेहमी फलदायी होतो असे म्हणतात म्हणून गुडीपाडव्याला संकल्प केला जातो.वर्षातील पहिला सण असल्यामुळे या वर्षीची सुरवात खूप उत्स्फूर्तपणे केली जाते , सकाळीच लवकर उठून अभ्यंगस्नान करून दाराला तोरण लावणे तसेच गुडी उभारून तिची पूजा केली जाते. हा दिवस साडेतीन मुहूर्ता पैकी एक असल्यामुळे या दिवशी लोक बरीचशी खरेदीही करतात , नवीन कपडे खालून गोड पदार्थ करून खाल्ले जातात .
गुडीपाडवा कधी आहे? गुडीपाडवा डेट व पूजा विधी कशी करावी gudi padwa 2024 date marathi
गुडीपाडवा या वर्षी 9 एप्रिल 2024 रोजी असून प्रतिपदा ही 9 एप्रिल रात्री 8 .21 वाजल्यापासून सुरू होणार आहे.
गुढीपाडव्याच्या अर्थ काय आहे?
लाकूड किंवा तोरण असा तेलगू भाषेत गुढीचा अर्थ आहे. तसेच लाकूड उभे करून उभारलेली कुटी किंवा झोपडी यालाच हिंदीत कुडी असे म्हणतात आणि यातूनच गुढी या शब्दाचा उगम झाला असावा असे मानले जाते.
गुडीपाडवा का साजरा केला जातो?
गुढी ही विजयाची व समृद्धीचे प्रतीक म्हणून मानले जाते. प्रभू श्रीराम 14 वर्ष वनवास भोगून तसेच लंकावती रावणाचा पराभव करून प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले म्हणून गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.
गुढी कशी उभारावी ?
सकाळीच लवकर उठून आंघोळ करून जिथे गुढी मांडायची ती जागा स्वच्छ धुवून पुसून घ्या.घराच्या प्रवेशद्वारावर सुबक रांगोळी काढून दरवाजाला तोरण बांधावे.
हे ही वाचा
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
जिथे गुढी ची मांडणी करायची (घरातून बाहेर पाहिल्यास उजव्या बाजूला शक्यतो गुढी मांडावी) ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी ने सुबक असे स्वस्तिक काढावे व त्यावर हळदीकुंकू वाहावे. गुढी साठी एक लाकडी बांबू घेऊन त्याला नवी कोरी साडी किंवा नवे कुठलेही वस्त्र वरच्या टोकाला बांधावे तसेच फुलांचा हार ,आंब्याची पाने ,कडुलिंबाची आणि गाठी लावून त्यावर तांब्याचा तांब्या पालथा घालावा.
अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ नक्की बघा
गुढीची पूजा कशी करावी ?
सकाळी लवकर उठून कडुलिंबाची पाने आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करावी व नवे कोरे कपडे परिधान करावे शास्त्रोक्त पद्धतीने गुढीची मांडणी करावी व नंतर हळदीकुंकू , बेलफुल वाहून नमस्कार करावा , व नंतर गुढीला गूळ व कडुलिंबाच्या झाडाची कोवळी फुले याचा प्रसाद म्हणून गुढीला अर्पण करावा व नंतर घरातील सर्वांनी मिळून तो खावा.याच दिवशी ब्रह्मणे सृष्टीची निर्मिती केली होती म्हणून शेवटी ब्रह्मदेवाला प्रार्थना करावी , हे देवांच्या देवा ब्रम्हदेवा गुढीचा माध्यमातून प्रवाहित होणाऱ्या शक्तीतील चैतन्य आनंद नेहमी टिकून राहू दे आरोग्य संपत्ती संतती सह भरभराती होवो अशी प्रार्थना करावी.संध्याकाळी पुरणपोळी किंवा इतर कोणत्याही गोड पदार्थाचा नैवेद्द दाखवून गुढी उतरावी .
गुढीपाडव्याला का कडुलिंबाचा प्रसाद का खाल्ला जातो ?
गूळ व कडुलिंबाची पाने किंवा नवीन बहर आलेली फुले एकत्र करून खाल्ल्यास पोटाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच रक्त शुद्ध होऊन पोटाच्या सर्व समस्या दूर होतात, आयुर्वेदामध्ये पण गूळ व कडुलिंबाला खूप महत्त्व दिले आहे त्यामुळे त्वचारोग तसेच धान्याला कीड न लागणे हे कडुलिंबाची औषधी गुणधर्म आहेत .
🔰 हे ही वाचा 👉
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
➡️ गुढीपाडवा मराठी माहिती निबंध
➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण
⏭️ जागतिक आरोग्य दिन थीम मराठी माहिती
⏭️ ईस्टर संडे का साजरा केला जातो ?
⏭️ 1 एप्रिल - एप्रिल फुलचा इतिहास मराठी भाषण
⏭️ 2 एप्रिल - गुड फ्रायडे मराठी भाषण
⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण
⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण
⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण