Type Here to Get Search Results !

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी | dr babasaheb ambedkar jayanti speech and information in marathi

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण | dr babasaheb ambedkar jayanti speech and information in marathi |डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  जयंती 2021 मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन  इतिहास व कार्य विचार . Latest information

डॉ बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधुंनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठी भाषण बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचा इतिहास व डॉक्टर बाबासाहेब यांचे कार्य याविषयी थोडक्यात माहिती बघणार आहोत माहिती आवडल्यास नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण मराठी

 जमिनोधस्त झालेल्या मानवतेचे पुन्हा उत्खनन करुन

 ज्ञान,जिद्द नि त्यागाने नवक्रातीचा हिमालय उभा करणाऱ्या

 विश्ववंदनिय परमपूज्य महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या

 जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला कोटी कोटी शुभेच्छा !

सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजनवर्ग व येथे उपस्थित सर्व भीमपुत्रांनो...

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चे कार्य 

   मानवी हक्कांचे कैवारी, जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडित , राजनीतिज्ञ , लेखक, समाज सुधारक ,स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे जनक, दीन दलितांच्या जीवनाला जखडलेल्या गुलामगिरीच्या शृंखला तोडगारा महायोध्दा, उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची ज्योत पेटवणारा प्रकाशसूर्य तसेच स्वतःच्या अलौकिक विद्वत्तेचा वापर समाजहितासाठी करणारा  ,अस्पृश्यता मिटनवण्यासाठी चंदनापरिस आपला जीव झिजवणारे , आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, समतेसाठी सत्याग्रह करणारे आणि भारताचे एक अमूल्य रत्न ज्यांना महामानव म्हणून संबोधले जाते असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज मी भाषणास सुरुवात करीत आहे.बाबासाहेब आंबेडकर बालपण

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते . भिमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना "अस्पृश्य' म्हणून मानहानी स्विकारावी लागली. पण ते मुळीच खचले नाहीत, त्यांनी अस्पृश्य दीन दलितांचा उध्दार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले.

   बाबासाहेब इ चौथीची परीक्षा पास झाल्यावर त्यांना  केळुस्कर गुरुजींनी लिहिलेले 'भगवान बुद्धाचे चारित्र्य' हे पुस्तक वाचण्यास दिले, पुस्तक वाचून  भीमराव खूप प्रेरित झाले. आणि त्यांनी आपल्या वडिलांना विचारले आम्हांला बौद्ध साहित्याचा परिचय वाचण्यास का दिला नाही ?  फक्त रामायण महाभारता हेच ग्रंथ का वाचण्यास दिले त्यात  शूद्र अस्पृश्यांची नालस्ती केली आणि  ब्राह्मण आणि क्षत्रिय यांचा गौरव . वडीलांनी भीमराव यांना सांगितले की आपण अस्पृश्य जमातीचे असल्यामुळे तुला न्यूनगंड होण्याची शक्यता आहे . आणि रामायण महाभारत ग्रंथ वाचनाने हा न्यूनगंड दूर होईल असे मला वाटले.कर्ण - द्रोण हे  किती उंचीपर्यंत पोहोचली हे पाहण्यासारखे आहे तसेच वाल्मीकी हे कोळी असून रामायणाचा कर्ता झाले . 

    वडिलांच्या या उत्तराने बाबासाहेबांचे समाधान झाले नाही. महाभारतातील एकही व्यक्ति बाबासाहेबांच्या मनाला भुरळ घालू शकली नाही आणि येथूनच बाबासाहेबांचा बुध्दांकडील प्रवास सुरु झाला.

🔘 हे पण वाचा > 

➡️. रामाचा पाळणा मराठी lyrics and mp3

बाबासाहेब आंबेडकर विचार

   भिमरावांनी आपले उच्य शिक्षण बडोदा सरकारची शिष्यवृत्ती घेऊन अमेरिकेतील कोलेबिया विद्यापीठातून व इंग्लंड मधील विद्यापीठातून घेतले . नंतर ते मायदेशी परतले. त्यानी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा " हा जबरदस्त संदेश दिला. गोरगरीब, दीनदलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी अनेक आंदोलने व सत्याग्रह केले.

देशप्रेमापुढे ज्याने स्वतः च्या विश्रांतीचा त्याग केला ,

माणसाला स्वाभिमान शिकवला,

ज्यांनी आम्हांला संकटाशी सामना करणे शिकवले,

असा या आकाशात एकमेव तारा बाबासाहेब होता."

   डॉ बाबासाहेबांनी सामाजिक भेदभाव व उच्च नीच भेदभावाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृती" या ग्रंथाचे जाहीररीत्या दहन केले. नाशिकमधील काळाराम मंदिरामधे दीनदलितांना प्रवेश मिळावा म्हणून सत्याग्रह केला महाडच्या चवदार तळ्यावर दीनदलितांना पाणी भरण्याचा हक्क मिळवून दिला. समाजाने धिक्कारलेल्या समाजासाठी ते आशेचा किरण ठरले. मुकनायक हे पाक्षिक व बहिष्कृत भारत है साप्ताहिक तर समता हे वृत्तपन्न सुरू करून त्यांनी समाजप्रबोधनाचे बहूमल्य कार्य केले.स्त्री शिक्षणाचा सदैव पुरस्कार केला.

असा हा अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या महामानव ज्ञानसवांदी तपस्वी, अमोध वकृत्वाचा व कुशल नेतृत्वाचा धनी युगप्रवर्तक डॉ बाबासाहेब आंबेडकर डिसेंबर १९५६ रोजी काळाच्या गेले. जरी ते आपल्यात नसले तरी त्यांचे विचार लाखो लोकोना स्फूर्ती, चैतन्य देत आहेत.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे सुविचार

शेवटी एवढेच म्हणेन ....

कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,

फक्त बाबासाहेबाचा जन्म ,आम्हाला न्याय देऊन गेला.. 

जनावरासारखे होते जीवन, तो माणूस बनवून गेला.. 

आम्ही होतो गुलाम, आम्हाला बादशाह बनवून गेला...

जय भिम!

आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मराठी भाषण बाबासाहेबांचे विचार बाबासाहेबांचा इतिहास व डॉक्टर बाबासाहेब यांचे कार्य याविषयी थोडक्यात माहिती वाचली माहिती आवडल्यास नक्की कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.


🔰 हे ही वाचा 👉 

⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण

➡️ गुढीपाडवा मराठी माहिती निबंध

 ➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

⏭️ जागतिक आरोग्य दिन थीम मराठी माहिती

⏭️ ईस्टर  संडे का साजरा केला जातो ?

⏭️ 1 एप्रिल - एप्रिल फुलचा इतिहास मराठी भाषण

⏭️ 2 एप्रिल - गुड फ्रायडे मराठी भाषण

⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण

⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण

⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषणटिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.