Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

जागतिक आरोग्य दिन माहिती मराठी | जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य भाषण निबंध | Jagtik arogya din 2021 theme slogen marathi information

 जागतिक आरोग्य दिन माहिती मराठी | जागतिक आरोग्य दिन घोषवाक्य slogen भाषण निबंध | Jagtik arogya din 2021 theme. World Health Day 2021 Marathi information

जागतिक आरोग्य दिन थीम 2021 मराठी माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन थीम 2021 काय आहे याविषयी माहिती बघणार आहोत.

जगभरात पाळल्या जाणाऱ्या काही विशेष दिवसांना जागतिक दिवस, जागतिक दिन ,आंतरराष्ट्रीय दिवस किंवा वैश्विक दिन असं म्हटलं जातं.

 जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?

 त्यातलाच जगभरात साजरा करण्यात येणारा दिवस म्हणजे जागतिक आरोग्य दिन !  आज  7 एप्रिल आजचा दिवस हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने जाणून घेऊया आरोग्य म्हणजे नेमकं काय .

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक सामाजिक आणि संतुलनाची स्थिती या रोगामध्ये असंतुलन झालं तर रोग जडतात जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक मानसिक दृष्ट्या सक्षम असते ते आरोग्यसंपन्न आहेत असं म्हणायला हरकत नाही.

जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो ?

जगातील सर्वच लोकांच्या केवळ आरोग्यविषयक  रोग व त्यावरील उपाय यांच्या कडे लक्ष न पुरवणे तर त्यांच्या शारीरिक व मानसिक, व सामाजिक आरोग्याचाही विचार करून त्यांना योग्य ते कार्य करणे व त्यांना मदत करणे हे आरोग्य संघटनेचे प्रमुख कार्य आहे. आणि त्यासाठी WHO जीकी युनोचीच एक शाखा आहे तिने जगातील 192 देशांनी मिळून  जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी ७ एप्रिल १९४८ रोजी जागतिक आरोग्य संमेलन घेतले. या संमेलनात आपल्या आरोग्य समस्या सर्वांनी मिळून  सोडवावी असे ठरवण्यात आले. विभिन्न वंशांच्या लोकांच्या समस्या वेगळ्या असल्या तरी सर्व  मानवाच्या आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समानच आहेत. आणि तेव्हापासूनच म्हणजे  7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जावा असे ठरवले.

जागतिक आरोग्य संघटनाची ( WHO ) कार्य 

  • वैद्यकीय क्षेत्रात लावणाऱ्या शोधांना मदत पुरवणेरो
  • रोगांवर नियंत्रण व त्याचे निराकरण करण्यासाठी मदत करणे 
  • गरीब लोकांना आरोग्यविषयक सुविधा पुरवणे 
  • लोकांना आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यावी यासाठी जनजागृती करणे

दर वर्षी संघटने तर्फे एक थीम निवडली जाते व त्याविषयी वर्षभर विविध स्पर्धा ,कार्यक्रम, चर्चा , परिसंवाद, शॉर्ट फिल्म्स व टीव्ही मार्फत लोकांमध्ये आरोग्य विषयक जनजागृती केली जाते. 

Jagtik arogya din 2021 theme | world health day theme 2021 |जागतिक आरोग्य दिन 2021 थीम

"Building a fairer - healthier world" means to build a fairer, healthier world.

जागतिक आरोग्य दिन 2021 या वर्षीची थीम 'एक सुसंस्कृत आणि निरोगी जग बनविणे' ही आहे.

मानसिक आरोग्य चांगले असण्याची लक्षणे 

  1. मन शांत असणे 
  2. इतरांसोबत जुळवून घेता येणे  
  3. मनावर ताबा असणे  
  4. जीवनातले ताणतणाव काळजी सहन करण्याची क्षमता असणे 

मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे 

  • योग्य आणि पुरेसा आहार घेणे  
  • स्वतःची व परिसराची स्वच्छता ठेवणे 
  • धूम्रपान मद्यपान करणे टाळावे 
  • नियमित व्यायाम करावे व काळजी करू नये 
  • जास्त मिठाचे व जास्त गोड पदार्थ खाऊ नये 
  • नियमित 7 तास झोप घ्या

मागील वर्षी पासून जगावर आलेले कोरोना नावाचे संकट व त्याच्यावर आपण कसा विजय मिळवायचा त्यासाठी who नेहमी मार्गदर्शन करत आहे ,लोकांना सोशल डिस्टन्स ठेवणे ,मास्क लावणे ,सॅनिटांझर चा वापर करणे याची जनजागृती साठी जागतिक आरोग्य संघटना महत्वाचे काम करत आहे त्यामुळे तुम्हींही काळजी घ्या आनंदी राहा आणि निरोगी राहा


🔰 हे ही वाचा 👉 

➡️ गुढीपाडवा मराठी माहिती निबंध

 ➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण

⏭️ जागतिक आरोग्य दिन थीम मराठी माहिती

⏭️ ईस्टर  संडे का साजरा केला जातो ?

⏭️ 1 एप्रिल - एप्रिल फुलचा इतिहास मराठी भाषण

⏭️ 2 एप्रिल - गुड फ्रायडे मराठी भाषण

⏭️ 20 मार्च - जागतिक चिमणी दिवस मराठी भाषण

⏭️ 22 मार्च - जागतिक जल दिन मराठी भाषण

⏭️ 23 मार्च - शहीद दिवस मराठी भाषण

⏭️ 28 मार्च - होळी सण मराठी भाषण

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !