रामाचा पाळणा बाळा जो जो रे | श्री राम पाळणा| रामाचा जन्माचा पाळणा मराठी|ramacha palna kulbhushana|ram palna in marathi lyrics|2022
ramnavmicha palana|ram palna in marathi lyrics,
रामाचा पाळणा मराठी ramacha palna lyrics pdf 2022
पहिल्या दिवशी बोलली लिला
दशरथ राजाला पुत्र हो झाला
कौसल्या मातेने झोका हा दिला
जो बाळा जो जो रे जो ॥१॥
दुसऱ्या दिवशी नवल बाळाचे
जशी खुलली कळी कमळाची
प्रसूत झाली त्या वेळेशी
जो बाळा जो जो रे जो ॥२॥
तिसऱ्या दिवशी वदली गंगा
नका बायांनो हो करु दंगा
दशरथ राजाला जाऊनी सांगा
जो बाळा जो जो रे जो ॥३॥
चवथ्या दिवशी वदली उमा
बाळाच्या रुपाची लागेना सीमा
ऐसी बोलली महादेव भीमा
जो बाळा जो जो रे जो ॥४॥
पाचव्या दिवशी पाची कल्लोळ
बाळ जन्मले रुप सावळ
राम निघाला रावणाचा काळ
जो बाळा जो जो रे जो ॥५॥
सहाव्या दिवशी बोलली तारा
आला सोनार आपुल्या घरा
बाण धनुष्य रामाला करा
जो बाळा जो जो रे जो ॥६॥
सातव्या दिवशी धनुष्य टाकिले
लक्ष्मण अवतार शोधिले
यातून एक युग लोटले
जो बाळा जो जो रे जो ।।७।।
🔰 हे पण वाचा >
✡️ अक्षय तृतीया मराठी माहिती 2021
🆕 श्री हनुमान चालीसा मराठी lyrics
हनुमान जयंती मराठी महिती व पूजा विधी 2021
आठव्या दिवशी सखी वदली
सीता रामाची रावणाने नेली
मारुतीरायाने लंका जाळली
जो बाळा जो जो रे जो ॥८॥
नवव्या दिवशी बोलली भागा
बायांनो तुम्ही चरणांशी लागा
दान चुड्याचे रामाला मागा
जो बाळा जो जो रे जो ॥९॥
दहाव्या दिवशी बोलला गजा
संगे घेऊन वानर फौजा
बिभीषणा केला लंकेचा राजा
जो बाळा जो जो रे जो ॥१०॥
अकराव्या दिवशी अकरावा रंग
ब्रम्हा विष्णूला लागला छंद
पाचही हत्यारे रामाच्या संग
जो बाळा जो जो रे जो ॥११॥
बाराव्या दिवशी जना बोलली
लक्ष्मणाला शक्ती लागली
पहाड आणाया गेला मारुती
जो बाळा जो जो रे जो ॥१२॥
तेराव्या दिवशी नंदीवर बसले
देशोदेशी वानर धाडिले
रामाने मारुतीला स्वराज्य दिले
जो बाळा जो जो रे जो।।१३।।
चौदाव्या दिवशी कहाणी सारी
बिजली बत्तीचा प्रकाश भारी
तेहतीस कोटी देव जमले दरबारी
जो बाळा जो जो रे जो ॥१४॥
पंधराव्या दिवशी अवतार बदले
कृष्ण पांडव पुढे निघाले
कंस मामाला त्यांनी वधिले
जो बाळा जो जो रे जो ||१५||
सोळाव्या दिवशी सोळावा केला
गुरु वसिष्ठ विद्या बोलला
धन्य रामाचा पाळणा गाईला
जो बाळा जो जो रे जो ॥१६॥
रामाचा पाळणा बाळा जो जो रे| श्री राम पाळणा| रामाचा जन्माचा पाळणा मराठी|ramacha palna kulbhushana|ram palna in marathi lyrics|ramnavmicha palana|ram palna in marathi lyrics
रामाचा पाळणा दाखवा मराठी
🔘 हे पण वाचा >
🔰हनुमान जयंती मराठी महिती व पूजा विधी 2021
➡️. रामाचा पाळणा मराठी lyrics and mp3
⏭️ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी अप्रतिम भाषण
➡️ गुढीपाडवा मराठी माहिती निबंध
➡️ महात्मा ज्योतिबा फुले जयंती मराठी भाषण