Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

संत गाडगेबाबाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Sant gadge baba jayanti quotes in marathi

संत गाडगेबाबाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Sant gadge baba jayanti quotes in marathi


नमस्कार मित्रांनो आज 23 जानेवारी 2022 आज राष्ट्रीय संत थोर समाज सुधारक संत गाडगे बाबा महाराज यांची जयंती तुम्हा सर्वांना संत गाडगेबाबा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त काही शुभेच्छा संदेश मराठी मध्ये बघणार आहोत त्यात तुम्ही व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर शेअर चॅट वर शेअर करून व्हाट्सअप स्टेटस ठेवू शकता


संत गाडगेबाबा यांची जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 

ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे आधुनिक सत्पुरुष! जय गाडगेबाबा!!जय गोपाला!

गाडगेबाबा जयंती च्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

देव माणूस आणि संत माणूस होऊन जगण्यापेक्षा माणूस म्हणूनच मानवतेची आयुष्यभर सेवा करण्यात धन्यता मानणारे संत गाडगे महाराज यांना कोटी कोटी प्रणाम

gadge baba jayanti quotes in marathi

'तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी' असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत गाडगेबाबा यांची जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 


 

🚩 मराठी भाषा दिन मराठी भाषण माहिती



✡️ Sant gadge baba quotes in marathi

कणकण करुनी कोटी केले, कण न खर्चिला स्वहितासाठी, वणवण फिरुनी कणकण झिजले, बाबा दुःखी जनतेसाठी... गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला...थोर समाजसुधारक संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा..!


🌍 राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश


sant gadge baba jayanti quotes in marathi

झाडूने परिसर आणि कीर्तनाने मनं साफ करणारे संत गाडगे महाराज यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन


✡️ Total 100 - 10th Practice papers 2021-22 pdf download


sant gadge baba jayanti wishes in marathi

स्वच्छतेविषयीची प्रत्येक कृती, देई आरोग्यास गती अज्ञान, अंधश्रध्दा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे संत गाडगे महाराज यांची आज जयंती त्यांना विनम्र अभिवादन !



☸️ संत गाडगेबाबा जयंती भाषण मराठी


✡️ sant gadge baba jayanti status marathi

देव मानसाच्या मनात राहतो देवळात फक्त पूजाऱ्याचे पोट असते. संत गाडगे महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा

संत गाडगे महाराजांनी जनतेला कोणता उपदेश दिला

देवासाठी पैसा खर्च करू नका. तोच पैसा शिक्षणाला द्या. मंदिराची भर करू नका. जो विद्यार्थी हुशार आहे, तो पैसा त्याला द्या. धर्मकृत्य करण्यासाठी नाही, विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा.

sant gadge baba jayanti status sharechat

मरण संगळ्यांचा काटा काहाडणार पन किर्ती मरत नाही मुलांना शिकविल्याशिवाय राहू नका कुत्रंही हानायची ज्याच्या अंगात ताकद नाही त्याले देव का म्हणता नवस करून बाईला मुलं होत असतील तर बाईला नवरा करायची गरज काय... संत गाडगेबाबा

 gadge baba jayanti wishes in marathi

देव कुठं आहे ?? - संत गाडगेबाबा. देव माणसात आहे. आपल्या सभोवताल चालता बोलता नाचता विठ्ठल दिसत असताना देवळात जायचेच कशाला? देव काय देवळात बसलाय वाटतं? जिकडं नजर टाकावी तिकडं तो अपरंपार भरलेला आहे. पोथ्या पुराणात चमत्कार, नवस रग्गड लिहिले आहेत. खरंखोटं आपण समजून घेतलं पाहिजे. उगाच मेंढय़ांमागे मेंढय़ासारखं जाण्यात काय अर्थ???



☸️ संत गाडगे बाबा विचार

खूप दिवसापूर्वी संत गाडगेबाबा सांगून गेले कि, देव देवळात नसून माणसात आहे म्हणूनच तर मंदिरात असणार्या देवाने देशाला संकटात टाकून स्वताचे दार बंद करून ठेवले आणि माणसात असणार्या देवाने हॉस्पिटल उघडे करून ठेवले


संत गाडगे बाबांचा दशसूत्री संदेश |  संत गाडगे बाबा कविता

भुकेलेल्यांना अन्न - तहानलेल्यांना पाणी उघड्यानागड्यांना-वस्त्र गरीब मुलामुलींना शिक्षणासाठी मदत बेघरांना आसरा - अंध, अपंग रोगी यांना औषधोपचार बेकारांना रोजगार - पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना अभय गरीब तरुण-तरुणींचे लग्न - दुःखी व निराशांना-हिंमत हाच खरा धर्म. !

Gadge Maharaj Jayanti 2022 Quotes marathi

कुठल्याच देवाचा उजेड पडत नाही, दिव्याचा उजेड पडतो. आणि म्हणूनच देवळात उजेड पाडण्यासाठी, दिवा लावावा लागतो. जो देव, स्वताःच्या घरात उजेड पाडू शकत नाही, तो देव तुमच्या जीवनात कसा उजेड पाडणार.



☸️ संत गाडगे बाबा फोटो hd | sant gadge baba jayanti photo

शाळा पडू द्या,लेकरं मरू द्या पण..मंदिरं बांधा बापहो..सोन्याचा कळस चढवा त्यावर, उद्याचं भविष्य दडलंय ना त्यात.. बाजारात विकत मिळणारी मूर्ती जर माणसाच्या जीवनात सुखसमृद्धी आणत असेल तर..विकणारा काय खुळा आहे का? का मूर्ती घडवणारा खुळा आहे ? तो स्वतःचे भले करण्याऐवजी बाजारात देव मांडून त्याचा व्यापार कशाला करील.. हे कधी कळणार माझ्या बांधवांना..? - संत गाडगेबाबा


✡️ हे पण वाचा > 

✡️ संत गाडगेबाबा जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !