Type Here to Get Search Results !

संविधान दिन भाषण मराठी निबंध 2022 | samvidhan divas Bhashan nibandh marathi|

भारतीय संविधान दिन भाषण मराठी निबंध 2022 सूत्रसंचालन| samvidhan  divas Bhashan nibandh marathi| constitution day information speech essay in marathi


नमस्कार आज 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन आजच्या महान दिवसासाठी आपणासाठी संविधान दिन भाषण मराठी मधर तसेच त्याचा उपयोग संविधान दिन निबंध सूत्रसंचालन साठी करू शकता , माहिती आवड्यास नक्की कंमेंट्स करून कळवा , सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !


संविधान दिन भाषण मराठी (toc)


 संविधान दिन 2022 वर भाषण निबंध | samvidhan diwas divas Bhashan nibandh marathi


आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल मित्र मैत्रिनींनो आज मी तुम्हांला 26 नोव्हेंबर संविधान दिन विषयावर दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही कृपया शांततेत ऐकावे ही नम्र विनंती.

दलितांचे ते तलवार होऊन गेले ,
अन्याया विरुद्ध प्रहार होऊन गेले
 होते ते एक गरीबच पण या जगाचा कोहिनूर होऊन गेले,
 जग खूप रडवीत होता त्यांना पण ते या जगाला घडवून गेले,
अरे या मूर्खाना अजून कळत कस नाही, 
वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा त्यांनी या भारताचे संविधान लिहून गेले.


होय मित्रांनो ज्या बाबासाहेबांना या देशात शिकण्यासाठी पुस्तक दिले जात नव्हते, त्याच बाबासाहेबांनी एक असे पुस्तक लिहले कि, त्याच पुस्तकावर आज हा भारत देश चालतो....ते म्हणजे भारतीय संविधान!

सुरुवातीला एकूण ३८९ सदस्य पैकी फाळणीनंतर २९९ सदस्यांनी १०८२ दिवसांनी म्हणजे  दोन वर्षे, ११ महिने आणि १८ दिवसांत जवळपास १२००० पानांचे महान असे संविधान लिहिले. भारतीय संविधानात एकूण १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या  मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. 

संविधान दिन दरवर्षी २६  नोव्हेंबर रोजी भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.  १९४९ साली या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली.  भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक कोटी लोकांनी अथक परिश्रम केले आणि त्यांच्या कष्टाचे आणि संघर्षाचे फळ म्हणजे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले.  देशाच्या स्वातंत्र्यानंतर, देशाला एक मजबूत संविधान प्रदान करण्याचे सर्वात मोठे काम होते, ज्याचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला होता.  जगातील विविध देशांच्या राज्यघटनेतील विशेष गोष्टी भारतीय संविधानात मिसळून सशक्त आणि न्याय्य प्राप्त झाल्या आहेत. 

 संविधान सभेचे सदस्य भारतातील राज्यांच्या विधानसभांच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे निवडले गेले.  जवाहरलाल नेहरू, डॉ. भीमराव आंबेडकर, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आदी या विधानसभेचे प्रमुख सदस्य होते. 


 29 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात आली आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.  जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद आदी या विधानसभेचे प्रमुख सदस्य होते.

 26 नोव्हेंबर 1949 मध्ये, म्हणजेच या दिवशी भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली.  डॉ भीमराव आंबेडकर यांनी दोन वर्षे 11 महिने 18 दिवसात संविधान तयार करून राष्ट्राला समर्पित केले.  आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे संविधान मानले जाते.  26 जानेवारी 1950 पासून भारतीय राज्यघटना लागू करण्यात आली.  भारत सरकारने 2015 मध्ये प्रथमच "संविधान दिन" साजरा केला.  डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि संविधानाचे महत्त्व सर्वत्र पसरवण्यासाठी "संविधान दिन" साजरा केला जातो.


🆕 संविधान दिन सूत्रसंचालन रांगोळी फलक लेखन घोषणा मराठी

Download All PDF

💥 संविधान दिन फलक लेखन pdf 

🎆 संविधान दिन रांगोळी डिजाईन

🆕 संविधान दिन सूत्रसंचालन pdf


तुम्हांला माहीत आहे का की राज्यघटनेचा मसुदा तयार करताना टंकलेखन किंवा छपाईचा वापर केलेला नाही. भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले. तसेच आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.भारतीय संविधानाची मूळ संसदेच्या वाचनालयातील हिलियम भरलेल्या बॉक्समध्ये ठेवलं आहे.

शेवटी एक च म्हणतो- 

घटना अशी लिहिली की 

सूर्य चंद्र असे पर्यंत मिटणार नाही...

 ऋण  बाबासाहेबांचे या जन्मांत फिटणार नाहीत.

🔘 जय भीम 🔘

 संविधान दिन भाषण मराठी , संविधान दिन निबंध माहिती आवड्यास नक्की कंमेंट्स करून कळवा , सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

भारतीय संविधान मराठी pdf, भारतीय संविधान उद्देशिका मराठी, भारतीय संविधान मराठी माहिती 


✡️ हे पण वाचा >

🆕  संकलित मूल्यमापन प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  NAS च्या 100 सराव प्रश्नपत्रिका pdf

🆕 इ 10 वी प्रश्नपेढी संच सरावा साठी !

🆕  जलसुरक्षा पुस्तक व त्याचे मूल्यमापन 2021

🆕  आकारिक मूल्यमापन चाचणी 1 प्रश्नपत्रिका 1 ली ते 10 वी 2021-22 pdf

🆕  सण 2021-22 कमी झालेला 25 टक्के अभ्यासक्रम pdf

🆕 सेतू अभ्यासक्रम चाचणी रिझल्ट शिट डाउनलोड करा

🆕 सेतू अभ्यासक्रम pdf सर्व इयत्ता व सर्व विषयाच्या pdf

🆕 वार्षिक नियोजन 2021 - 22 मराठी सर्व इयत्तेचे pdf


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !