Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश मराठी माहिती निबंध भाषण | kojagiri purnima wishes in marathi 2021

 कोजागिरी पौर्णिमा मराठी माहिती निबंध भाषण | kojagiri purnima wishes in marathi 2021 

 

कोजागिरी पौर्णिमा इतिहास कथा  व महत्त्व 2021


अश्विन शुद्ध पौर्णिमेला कोजागती पौर्णिमा म्हणतात. कोजागर्ती या संस्कृत शब्दाचे मराठीत रुपांतर आहे कोजागिरी. या पौर्णिमेला नवरात्र पौर्णिमा, अश्विनी पौर्णिमा, शरद पौर्णिमा, नवान्न पौर्णिमा अशी अनेक नावे आहेत.   महालक्ष्मी या दिवशी दूध आटवून त्यात पिस्ते, बदाम, केशर, , चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन 'को जागर्ति' (म्हणजे कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला ' कोजागिरी पौर्णिमा' म्हणतात. घराघरातून कोजागर्ती म्हणजेच कोण जागं आहे हे पहाण्याकरिता येत असते. जागं रहाणं म्हणजे केवळ न झोपणे असा अर्थ अभिप्रेत नसून जागरुकता अभिप्रेत आहे. जर मनुष्य जागरुक राहिला तर कोणतेही संकट त्याच्यावर येणार नाही आणि सुखसमृद्धीने तो संपन्न राहील. हा या व्रतातील बोध होय.या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो.

या दिवशी लक्ष्मी आणि इंद्र यांचे ऐरावतांसह पूजन करुन केशर युक्त दुधाचा प्रसाद वाटला जातो. रात्री जागरण करुन लक्ष्मीची आराधना केली जाते. या दिवशी ज्येष्ठ अपत्याच्या आयुष्य वृद्धी करीता औक्षण करावयाचे असते.


कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | kojagiri purnima chya hardik shubhechha 2021


प्रकाश चंद्राचा, आस्वाद मसाले दुधाचा आनंदाने साजरा करू, सण कोजागिरी रात्रीचा ! *कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*


kojagiri purnima wishes in marathi 2021


आला शरद ऋतू, आभाळात चंद्रासह चांदणं मसाले दुधाचा प्याला हाती, सारीकडे आज सणाचा आनंदी आनंद ! *कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*


kojagiri purnima wishes in marathi 2021


कोजागिरी म्हणजे क्षण उल्हासाचा, आनंदाचा आणि वैभवाचा.... *कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*


kojagiri purnima quotes in marathi 2021


"मस्त ऋतू शरद अन चंद्रासावें चांदणे मधुर गोरस प्याला हाती मन धुंद होई आनंदाने ! *कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!*


kojagiri poornima quotes in marathi 2021


हे दूध केशरी, कोजागिरीचे खास वेलची, बदाम अन पिस्ते खारे साथ प्रार्थितो शरद पौर्णिमा शंभर, अशा निवांत *कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!*


kojagiri purnima messages in marathi


शरदाचे चांदणे, आणि कोजागिरीची रात्र.. चंद्राच्या मंद प्रकाशात, जागरण करू एकत्र.. दूध साखरेचा गोडवा, नात्यांमध्ये येऊ दे.. आनंदाची उधळण, आपल्या जीवनी होऊ दे आपल्या सर्वांना *कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!*


sharad purnima wishes in marathi


कोजागिरी म्हणजे जागरूकता वैभव, उल्हासाचा आणि आणि आनंदाचा उत्सव, शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरूप समन्वयाची अनुभूती... *कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!*


kojagiri purnima status marathi


आज कोजागिरी पौर्णिमा..आज आकाशातल्या चंद्रासाठी सर्वच जागतात. मी आणि तू सुद्धा..पण एरव्ही मात्र आकाशातला चंद्र बिचारा एकटा जागा राहतो. आणि माझा जमिनीवरचा चंद्र मात्र रोज मला जागवतो..!! *कोजागिरीच्या सर्वांना गोड गोड शुभेच्छा..!*


kojagiri purnima status marathi download


मनी चांदणे पडे ज्या क्षणी प्रसन्नता ती खरी ॥ प्रत्येकाने मनी जपावी । प्रसन्न कोजागिरी ॥ दूध मसाला, आटीव केशरी । हवे कुणाला इथे? प्रेमाच्या बोलांनी केवळ । कोजागिरी बहरते ॥ येई लक्ष्मी घरी दारी । दाराला नसता कडी ॥ ठेवा दारे उघडी ॥ दारा सोबत मनाची सुद्धा सर्व मित्र, मैत्रिणींना, कोजागिरी पौर्णिमेच्या अगणित हार्दिक शुभेच्छा.


कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा मराठी मध्ये


अधिरले श्वास सारे रूप पाहता साजणा, चकोर तू तेजोमय प्रेमात पडती ललना..श्रेष्ठ दर्शन आश्विनात पूनवेची बात खास कोजागर्ती लक्ष्मी हाक चांदव्यात मुग्ध आस , मैफिल झड़े सुरांची सोहळा होई ऑगळा कसे वाजतील बारा टिपू आनंद वेगळा...स्निग्ध दुग्धास आळवू केशर मैव्यास घालून सखींच्या सहवासात ते प्राशू बिंब पाहून..अस्थमाच्या रोगींसाठी आयुर्वेद म्हणे जाग चंद्रप्रकाश पिऊनी निरोगी आरोग्य राख.


हे पण वाचा - 


FAQ
Q. 2021 कोजागिरी पौर्णिमा कधी आहे ?
Ans. कोजागिरी पौर्णिमा 19 ऑक्टोबर 2021 ला आहे.
Q. कोजागिरी पौर्णिमा म्हणजे काय ?
Ans.  महालक्ष्मी साठी या दिवशी दूध आटवून त्यात पिस्ते, बदाम, केशर, , चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन 'को जागर्ति' (म्हणजे कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला ' कोजागिरी पौर्णिमा' म्हणतात.
Q. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध का बनवतात ?
Ans . कोजागिरी पौर्णिमेला चंद्र सूर्याच्या सर्वात जवळ असतो त्यामुळे चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर पडल्याने आणि तोच प्रकाश दुधा मध्ये पडल्याने आपल्याला असणारे जुनाट रोग नष्ट होतात अशी मान्यता आहे तसेच या पौर्णिमेपासून पावसाळा संपून हिवाळ्याची चाहूल लागते आणि शरीराला गरमी ची आवश्यकता असते म्हणून कोजागिरीला मसाला दूध करण्याची प्रथा आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !