Type Here to Get Search Results !

बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती 2022 | भाषण निबंध | buddha purnima information in marathi

बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती 2022 wikipedia बुद्ध जयंती - विकिपीडिया |भाषण निबंध | buddha purnima information in marathi |about buddha in marathi | बुद्ध जयंती पौर्णिमा कधी आहे | gautam budhha jayanti information in marathi | buddha purnima 2022 india

बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती 2022

 जय भीम मित्रांनो आज आपण बुद्ध पौर्णिमा या बौद्ध धर्मातील सणा बद्दल मराठी माहिती बघणार आहोत. बुद्ध धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे बुद्ध जयंती, वैशाखी पौर्णिमा किंवा बुद्ध पौर्णिमा असेही म्हंटले जाते .

बुद्ध जयंती बुद्ध पौर्णिमा कधी आहे 2022 

या वर्षी बुद्ध पौर्णिमा जयंती व्रत 16 में 2022 रोजी आहे . 


बुद्ध पौर्णिमा / बुद्ध जयंती  हा बौद्ध धर्मीयांचा सर्वात महत्त्वाचा सण आहे. बुद्ध पौर्णिमा हा सण संपूर्ण जगभरात वैशाख पोर्णिमेच्या दिवशी साजरा करतात, विशेषतः भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

वैशाख पौर्णिमेलाच गौतम बुद्धांचा जन्म तसेच ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत.  आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळेच तर गौतम बुद्धांना जगातील एक महान पुरुष व आपले गुरू मानले जाते.

भारत ,चीन जपान श्रीलंका  चीन, व्हियेतनाम, थायलंड, आणि सुमारे १८० देशां मध्ये  बौद्ध आणि त्यांच्या धर्मीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे आणि या देशातील बौद्ध लोक हा सण  मोठ्या उत्साहात साजरा करतात.


🆕  असा साजरा करायचा आहे "शिवस्वराज्य दिन 2021" माहीत आहे ना?🆕  5 जून जागतिक पर्यावरण दिन भाषण निबंध


🆕  अहिल्याबाई होळकर व्हाट्सअप्प शुभेच्छा संदेश चारोळी


🆕  अहिल्याबाई होळकर जयंती मराठी भाषण


बुद्ध पौर्णिमेला बोधगया या धार्मिक स्थळी जगभरातून बौद्ध अनुयायी ल प्रार्थना करण्यासाठी येत असतात. बोधगया बिहारमधील  हे बौद्ध धर्मानुयायांचे पवित्र स्थान मानले जाते,येथेच  

 बुद्धांनी सत्याच्या शोधासाठी सात वर्ष कठोर तपश्चर्या केली  व बिहारमधल्या बोधगया येथील एका बोधिवृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञानप्राप्ती झाली असे मानले जाते.

जेव्हा भगवान बुद्ध यांना बुद्धत्व प्राप्त झाले तेव्हा वैशाख पौर्णिमा होती आणि  तेव्हापासून या दिवशी बुद्ध पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.

या दिवशी दिल्लीमधील संग्रहालयात असलेल्या बुद्धांच्या अस्थी सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी बाहेर ठेवल्या जातात, तिथेही येऊन लोक प्रार्थना व दर्शन घेतात .

बुद्ध पौर्णिमेला बौद्ध अनुयायी  लुंबिनी, सारनाथ, गया, कुशीनगर, दीक्षाभूमी अशा विविध पवित्र धर्मस्थळांना जाऊन प्रार्थना व पूजा अर्चना करतात. 


🔰  बुद्ध पौर्णिमा शुभेच्छा संदेश


बौद्ध धर्माशी संबंधित विविध सूत्रे, त्रिपिटके यांचे वाचन व पठण केले जाते.

या दिवशी बौद्ध अनुयायी उपवास पकडतात व दानधर्म करून  घरांमध्ये दिवे प्रज्वलित करतात आणि फुलांनी घर सजवले जाते. बौद्ध धर्मग्रंथांचे अखंड वाचन, पठण करतात .

बुद्ध विहारांमध्ये व प्रत्येकाच्या घरांमध्ये  धूप अगरबत्त्या लावला जातो तसेच गौतम बौद्धांच्या मूर्तीवर फळ-फूल चढवले जाते आणि त्यांची दिवा लावून पूजा केली जाते.

या दिवशी विशेष करून बोधिवृक्षाची पूजा केली जाते व त्याच्या फांद्यांवर हार व रंगीत पताका सजवल्या जातात. बोधिवृक्षाच्या मुळांना दूध व सुगंधित पाणी दिले जाते व त्या भोवती दिवे लावतात.

या दिवशी कोणीही मांसाहार करत नाही,

तसेच पक्ष्यांना पिंजऱ्यातून मुक्त केले जाते.


आशा आहे की माहिती आवडली असेल , आवडल्यास शेअर नक्की करा 

बुद्ध पौर्णिमा मराठी माहिती 2022 wikipedia बुद्ध जयंती - विकिपीडिया |भाषण निबंध | buddha purnima information in marathi |about buddha in marathi | बुद्ध जयंती पौर्णिमा कधी आहे | gautam budhha jayanti information in marathi | buddha purnima 2021 india

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आपल्या फेसबुक ला लाईक करा !