Type Here to Get Search Results !
WhatsApp Group Join Now

महात्मा गांधी पुण्यतिथी भाषण मराठी | निबंध | mahatma gandhi bhashan marathi nibandh pdf

महात्मा गांधी पुण्यतिथी भाषण मराठी | महात्मा गांधी जयंती भाषण निबंध| mahatma gandhi bhashan marathi | mahatma gandhi nibandh marathi pdf


नमस्कार आज आपण महात्मा गांधी जयंती किंवा पुण्यतिथी निमित्त मराठी मध्ये भाषण कसे द्यायचे ते थोडक्यात बघणार आहोत तसेच महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती मराठीत बघणारा वाचणार आहोत याचा उपयोग आपण महात्मा गांधी यांच्या विषयी मराठीत निबंध किंवा महात्मा गांधी यांच्या विषयी दहा ओळी माहिती इतरांना सांगण्यासाठी चा नक्कीच उपयोग होईल त्याला तर महात्मा गांधी मराठी भाषण सुरु करूया ..


महात्मा गांधी पुण्यतिथी भाषण | mahatma gandhi bhashan marathi ( Mahatma gandhi speech in marathi ) pdf


महात्मा गांधी पुण्यतिथी जयंती भाषण प्रास्ताविक - 

सर्वप्रथम स्वराज्य या संकल्पनेचे निर्माते छत्रपती शिवराय यांना मानाचा मुजरा, स्वराज्य व स्वातंत्र्य करीता आयुष्यभर लढा देणारे थोर राष्ट्रपुरुष भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी, आणि आधुनिक काळात स्वराज्य ही संकल्पना संविधानाच्या रुपाने सत्यात उतरविणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन. I

आदरणीय अध्यक्ष महोदय व व्यासपीठावर विराजमान सन्माननीय प्रमुख अतिथी, तसेच उपस्थित सर्व मान्यवर,

महात्मा गांधी चारोळ्या कविता मराठी - 

“दे दी हमें आझादी । 

बिना खड्ग बिना ढाल | 

साबरमती की संत । 

तुने कर दिया कमाल ।। 

तुने कर दिया कमाल ।।” 

हे वाक्य ऐकल्याबरोबर आपल्या डोळयासमोर उभे राहतात ते म्हणजे महात्मा गांधी. सत्य आणि अंहिसा या मार्गाचा अवलंब करून भारताला स्वांतत्र्य मिळवून देण्याचे कार्य महात्मा गांधी यांनी केले. साधी राहणी व उच्च विचारसरणी याचे उत्तम उदाहरण म्हणजेच महात्मा गांधीजी होय.

"उनके मीठे थे वादे, और मजबूत थे इरादे, 

वो अहिंसा पुजारी, वो स्वेत वस्त्र धारी, 

उनकी लंबी सी लाठी, सुदृढ कद और काठी, 

इरादे बुलंद थे तूफान हो या अंधी, 

दुनिया कहे इन्हें महात्मा गांधी।"

भारतमातेचे थोर सुपुत्र, भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार तसेच जगाला अहिंसेचा महान संदेश देणारे गांधीजी हे वंदनीय युगपुरूष होते. ते आपल्या कर्तृत्वामुळे महात्मा, राष्ट्रपिता अशा पदापर्यंत पोहचले.

महात्मा गांधीजींचा जन्म २ ऑक्टोंबर १८६९ रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते.

त्याच्या वडिलांचे नाव करमचंद तर आईचे नाव पुतळाबाई हे होते. गांधीजींनी मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढील शिक्षण इंग्लंडमध्ये घेतले तिथे ते खूप अभ्यास करून बॅरिस्टर बनले पुढे भारतमातेची सेवा करण्यासाठी आपल्या मायदेशी परतले.

एकदा जा जेव्हा एका खटल्यासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले, तेंव्हा तिथे मोठ्या संख्येने भारतीय मजूर हजर होते. त्यांना इंग्रज लोक अपमानास्पद वागणूक देत होते. गांधीजींनाही अशीच वागणूक इंग्रजांनी दिली. त्यामुळे गांधीजींनी अन्यायाविरूध्द लढण्याचे ठरवले. त्यासाठी सत्य व अहिंसेचा चातुर्याने त्यांनी वापर केला. साधी राहणी व उच्च विचार या तंत्राचा वापर करून गांधीजींनी गोरगरीब जनतेच्या मनात आदराचे स्थान मिळवले. खेड्याचा विकास, सूतकताई, स्वदेशी, दलितांचा उध्दार, स्वच्छता, स्वावलंबन याकडे लक्ष दिले.

सत्याग्रह, नि: शस्त्र प्रतिकार आणि असहकार आंदोलनाचा स्वीकार करून गांधीजींनी भारतीय जनतेचे ऐक्य, बळ वाढवले. इंग्रजासमोर आव्हान निर्माण केले. त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला; पण गांधीजींनी हार मानली नाही. आपला लढा चालूच ठेवला. चले जाव, भारत छोड़ो अशा घोषणा देत इंग्रजांना त्यांनी सळो की पळी करून सोडले.

पुढे गांधीजींच्या सत्य व अहिंसेपुढे मान झुकवून इंग्रजांनी हार पत्करली. सत्य व अहिंसा हाच माझा धर्म मानणाऱ्या गांधी - जींचा विजय झाला. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. गांधीजींचे स्वतंत्र भारत देशाचे स्वप्न साकार झाले. पण दुर्देवाने ३० जानेवारी १९४८ रोजी एका असंतुष्टाने, या थोर महात्म्याची गोळी घालून हत्या केली. गांधीजी जरी आज आपल्यात नसले तरी त्यांचे कार्य, विचार प्रत्येक भारतीयास सदैव प्रेरणा देत राहील हे मात्र नक्की ।

अहिंसक मार्गाने सत्याग्रह करून आपल्यावर होणार या अन्यायाचा प्रतिकार करून जुलमी राजवट आपण दूर करू शकतो असा आत्मविश्वास सर्व जगताच्या मनात निर्माण करणार या राष्ट्रपिता म. गांधी यांच्या चरणी माझा कोटी कोटी प्रमाण.

जय हिंद जय महाराष्ट्र !

आशा आहे की महात्मा गांधी जयंती पुण्यतिथी विषयी भाषण निबंध सूत्रसंचालन कविता चारोळ्या ह्या तुम्हाला नक्कीच आवडले असतील माहिती आवडल्यास व्हाट्सअप फेसबुक वर नक्की शेअर करा आणि कमेंट करा.

🆕 महात्मा गांधी जयंती भाषण सूत्रसंचालन

🆕 प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये

FAQ -

Q.महात्मा गांधी यांचा जन्मदिन कोणत्या तारखेला साजरा करण्यात आला? 

Ans- 2 ऑक्टोबर

Q. महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव काय आहे?

Ans- मोहन दास करमचंद गांधी

Q. गांधीजींनी साबरमती आश्रम कोठे स्थापन केला?

ANS- अहमदाबाद (१९१७ मध्ये)

Q. गांधीजींनी कोणाला गुरू मानले?

Ans : गोपाळ कृष्ण गोखले

Q. गांधीजींना महात्मा ही पदवी कोणी दिली?

Ans : रवींद्रनाथ टागोर


✡️ हे पण वाचा > 

🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध

🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध

🆕 फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका मराठी भाषण नक्की वाचा

🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !
🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

आपल्या फेसबुक ला लाईक करा !