नेताजी सुभाष चंद्र बोस मराठी भाषण | नेताजी सुभाष चंद्र बोस निबंध मराठी माहिती |Netaji subhash chandra bose speech in marathi | Netaji subhash chandra bose speech in marathi
नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण मराठी | सुभाष चंद्र बोस निबंध | चारोळी कविता सूत्रसंचालन |Netaji subhash chandra bose bhashan marathi
नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण प्रस्तावना
तुम मुझे खून दो, मै तुम्हे आजादी दूंगा
नारा देऊन पुकारले नेताजींनी जनतेला !
जमवून शूर-वीर भारत भू - च्या पुत्रांना
हादरा दिला जुलमी इंग्रजी सत्तेला
ज्या सुभाषबाबूंनी मोठ्या पगाराच्या, भौठ्या पदाच्या नौकरीवर पाणी सोडून देशसेवेत वाहून नेले,ज्यांनी ब्रिटिशांच्या शत्रुदेशांशी संपर्क करून जागतिक स्तरावरून स्वातंत्र्यासाठी अथक प्रयत्न कैले, आजही राष्ट्रीय नारा म्हणून ओळखला जातो जो 'जय हिंद' हा नारा प्रथम ज्यांनी दिला, ज्यांनी महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधले असे गांधीजींच्याच शब्दांत देशभक्तांचे देशभक्त' असे महान क्रांतिकारक सुभाष चंद्र बोस यांच्या विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांततेचा ऐकावे ही नम्र विनंती
आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, आदरणीय व्यासपीठ, वंदणीय गुरुजनवर्ग आणि असंख्य क्रांतिकारकांच्या देशभक्तीच्या आणि बलिदानाच्या संस्कारांनी पवित्र अशा भारतभुमीत जन्मलेले माझ्या बंधू आणि भगिणींनो,
भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पराक्रमी इतिहासात डोकावले तर काही असामान्य महापुरूषांची नावे काही क्षणात डोळ्यांसमोर येतात यांपैकी एक महान नाव म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस.. आपल्या प्रभावी विचारांनी, तेजस्वी वक्तृत्वाने आणि लढाऊ बाणा अंगिकारत ब्रिटिश राजवटीला सळो की पळो करून सोडणारे एक वादळी व्यक्तिमत्त्व म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस...अशा तेजस्वी आणि त्यागी सुभाषबाबूंच्या जीवनकार्याला कोटी कोटी प्रणाम
नेताजी सुभाष चंद्र बोस माहिती मराठी
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ रोजी ओरिसा प्रांतातील कटक या शहरात झाला.लहानपणापासूनच ते अन्यायाविरुद्ध बंडखोर आणि लढाऊ स्वभावाचे होते. देशभक्ती सुभाषबाबूंच्या नसानसांत संचारलेली होती. कॉलेजमध्ये इंग्रजी शिकवित असताना एका प्राध्यापकाने भारतीयांविरुद्ध काही अपशब्द वापरले हे ऐकून देशभक्त सुभाषबाबूंचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्या स्वभावानुसा प्राध्यापकांना जाब विचारला, त्याविरूद्ध संप केला आणि देशाविषयीचे प्रेम कृतीतून दाखवून दिले. या कारणामुळे त्यांना कॉलेजमधून काढूनही टाकले होते.महाविद्यालयीन जीवनात घडलेली ही घटना त्यांच्या भावी देशकार्यातील भुमिका स्पष्ट करणारीच ठरली.
त्यांनी कलकत्यातील आपले शिक्षण पूर्ण केल्या. नंतर पुढील उच्च शिक्षण इंग्लंडला घेतले. त्यांनी कुशाग्र बुद्धिमत्ता व कठोर परिश्रमाला अभ्यासाची जोड दिली. त्यामुळे ते आय.सी.एस. परीक्षा पास झाले. त्यांनी इंग्रजांची नोकरी पत्करली पण त्यात त्यांचे मन रमले नाही. तेथील नोकरी सोडून ते मायदेशी परतले. मायदेशी आल्यानंतर गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यचळवळीत भाग घेतला. स्वातंत्र्यचळवळीत भाग घेण्यासाठी आपल्या नोकरीचा राजीनामा देणारे ते पहिले आय.सी.एस. अधिकारी होते.
इतिहासात चर्चेतून कुठलाही
फारसा मोठा फरक झालेलानाही.
स्वातंत्र्य दिले जात नाही तर ते घेतले जाते.
त्याच्यासाठी किंमत द्यावी लागते
आणि ती किंमत म्हणजे रक्त.'
हे विचार होते सुभाषबाबूंचे.
भारत देशाला स्वतंत्र करण्यासाठी काँग्रेसबरोबर त्यांनी अनेक चळवळीत भाग घेतला. त्याच्यांवर क्रांतिकारी विचारांचा प्रभाव होता. त्यांनी जनतेसमोर केलेली भाषणे म्हणजे पेटत्या मशाली होत्या. सुभाष बाबूंनी स्वतंत्र 'आझाद हिंद सेना' स्थापन केली. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने व आदराने नेताजी म्हणू लागली. नेताजींनी झाशीची राणी' नावाचे स्त्री सैनिकांचे पथकही उभारले. त्यांनी दिलेली 'जय हिंद' ही घोषणा आज सर्वतोमुखी झाली आहे.
नेताजी सुभाष चंद्र बोस भाषण मराठी समारोप
पण बंधू भगिणींनो,
सुभाषबाबूंनी इतके महान देशकार्य करूनही काही कृतघ्न लोकांमुळे त्यांना शेवटची काही दशके स्वतःच्याच देशात स्वतःची ओळख लपवून जगावे लागले.ही फार मोठी खेदाची आणि अपमानकारक गोष्ट आहे आपल्या देशासाठी!!
१८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान प्रवास करीत असताना त्यांच्या विमानाला अपघात झाला. स्वातंत्र्य सेनानी सुभाषबाबूंची स्वातंत्र्याच्या होमकुंडात आहुती पडली. प्रखर बुध्दीमत्ता, साहस, अलौकिक देशभक्ती हे सुभाषबाबूंचे गुण भारतीय जनतेच्या मनात कायमचे कोरले गेले. पुढे दोन वर्षांनी देश स्वतंत्र झाला; पण देशासाठी जीवाचे रान करणारा हा सूर नेता कायमचा आपल्याला दुरावला.
आशा आहे की सुभाष चंद्र बोस मराठी भाषण निबंध सूत्रसंचालन कविता चारोळ्या सुरज छान या तुम्हाला नक्कीच आवडले असतील आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा.
💥 नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश विचार व कविता
🆕 24 जानेवारी - राष्ट्रीय बालिका दिन माहिती व शुभेच्छा संदेश
🆕 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये
🆕 प्रजासत्ताक दिनाचे अप्रतिम भाषण मराठी मध्ये
🆕 संविधान दिन अप्रतिम भाषण संग्रह
✡️ हे पण वाचा >
🆕 सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी
🆕 राजमाता जिजाऊ जयंती भाषण निबंध
🆕 भोगी संक्रात सणाची मराठी माहिती भाषण निबंध
🆕 फातिमा शेख पहिल्या मुस्लिम शिक्षिका मराठी भाषण नक्की वाचा
🆕 सावित्रीबाई फुले मराठी भाषण नक्की वाचा !
🆕 सावित्रीबाई फुले जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा